सचिन जाधव
पुणे : द्रौपदी मुर्मू यांची काल राष्ट्रपतिपदी निवड झाली आहे. द्रौपदी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्यावर येत्या २५ जुलै रोजी त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी स्नेहभोजन शाकाहारी ठेवावे, अशी मागणी शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन ई-मेल द्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह यांना पाठवण्यात आले आहे. ( Draupadi Murmu News In Marathi )
राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मंडळींना शाही भोजन आयोजित असते. ग्लोबल वॉर्मिग तसेच पर्यावरण हानीला मांसाहार कारणीभूत असल्याने शाकाहारचा प्रसार व्हावा, म्हणून ही मागणी गंगवाल यांनी केली आहे.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले , 'येत्या २५ तारखेला आपल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपतिपदाच्या शपथ घेणार आहेत. त्यानिमित्त एक मोठं स्नेहभोजन दिलं जातं. देशविदेशातील लोक त्यासाठी येतात. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यानिमित्त आयोजित केलेले भोजन हे शाकाहारी करावं, अशी आमची मागणी आहे. स्वत: मुर्मू या शुद्ध शाकाहारी आहेत. मुर्मू या शाकाहाराच्या पुरस्कार करतात. त्यांच्या जीवनाला अध्यात्माची बैठक आहे'.
'नरेंद्र मोदी, अमित शाह, पियुष गोयल असे अनेक केंद्रीय मंत्री आज शुद्ध शाकाहारी आहेत. शाकाहाराचा प्रचार संपूर्ण जगात होत आहे. कोरोनाच्या काळात शाकाहाराचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. चीनमध्ये २० टक्के लोक हे शाकाहारी झाले आहेत. पर्यावरणाचा संरक्षण करण्यासाठी शाकाहाराचा प्रचार भारतातून व्हावा,अशी माझी इच्छा आहे.
भारताच्या राष्ट्रपतींनी हा शाकाहाराचा संदेश जगाला दिला, तर फार मोठा बदल होईल. त्यामुळे अहिंसेचा संदेश जगभर देऊ शकू. म्हणून ही मागणी मुर्मू यांना करत आहेत. त्या आमच्या मागणीचा विचार करतील. त्या राष्ट्रपती भवनावर होणाऱ्या शाही भोजनात शाकाहाराचा पुरस्कार करतील', असेही ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.