मुलीच्या तक्रारीनंतर पालकांनी तिला आधार देण्याऐवजी तिलाच गुन्हेगारासारखी वागणुक दिली तर...आपण कोणत्या समाजात राहतोय... असा प्रश्न निर्माण होतो..याला कारण ठरलयं...अमरावतीच्या वरुड तालुक्यात घ़डलेली घटना...
16 वर्षांच्या मुलीवर कुणी तरी वाईट नजरेने पाहिलं..
तिने भीतीपोटी ही गोष्ट आईला सांगितली.... तिला वाटलं आई-वडील त्या व्यक्तीची तक्रार करतील... पण घडलं उलटचं....मुलीनं हे घरी सांगितल्यावर जन्मदात्या आईंनं आणि सावत्र वडिलांनी मुलीलाच जबर मारहाण केली. एव्हंढच नाही तर पुन्हा आपल्या मुलीवर वाईट नजर पडू नये, म्हणून चक्क तिचे केसच कापून टाकले आणि तिला घरात डांबून ठेवलं... मात्र, मुलीनं हिंमत दाखवत थेट पोलिस स्टेशन गाठलं... आणि आपल्या आई आणि वडिलांविरोधात तक्रार दाखल केली...
पोलिसांनी पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी आपल्याच आई-वडीलांच्या या कृत्यानं तरुणीला चांगलाच मानसिक धक्का बसलाय... सध्या मुलीचा ताबा बाल कल्याण समितीकडे दिला आहे.. वरुडची ही घटना फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही, तर तो समाज व्यवस्थेचा पराभव आहे. देशात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असतानाच काळजीपोटी का असेना पण अशा पद्धतीनं केस कापून मुलीला विद्रुप करणं कितपत योग्य आहे...एकीकडे महिला सबलीकरण, महिला सुरक्षेसाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणतयं... मात्र दुसरीकडे एका कुटुंबाला आपल्या मुलीला समाजापासून सुरक्षित ठेवण्यासाठी डांबून ठेवावं लागत असेल तर पुरोगामी महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेला निघालाय.. ..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.