Snake Bite : अमरावतीत खळबळ! सर्प दंशाने ७ जणांचा मृत्यू, तीन महिन्यांत ७३४ रुग्ण

Amravati Snake Bite : अमरावती जिल्ह्यात मे ते जुलैदरम्यान ७३४ सर्पदंशाच्या घटना नोंदल्या असून सात जणांचा मृत्यू झाला. पावसाळ्यात नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन.
Amravati Snake Bite 7 Dead
Amravati Snake Bite 7 Dead AI Images
Published On
Summary
  • अमरावती जिल्ह्यात ७३४ सर्पदंशाच्या घटना

  • सर्पदंशामुळे उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू

  • इर्विन रुग्णालयात सर्वाधिक ३५७ सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार

  • ४३३ विंचूदंशाच्या घटना नोंदल्या

Amravati Snakebite Cases 7 Dead अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७३४ नागरिकांना सर्पदंश झाला असून, उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

पावसामुळे शेतांमध्ये आणि मोकळ्या जागांवर पाणी साचते. तसेच घरांच्या आसपास वाढलेली झुडपे, गवत आणि ओलसर वातावरण यामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढतो. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना तसेच शेतात काम करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Amravati Snake Bite 7 Dead
Shravan Fast : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील इर्विन रुग्णालयात सर्पदंशाच्या सर्वाधिक ३५७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चुरणी उपजिल्हा रुग्णालयात ९६ सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार झाले असून, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Amravati Snake Bite 7 Dead
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, जिल्ह्यात मे ते जुलैदरम्यान ४३३ नागरिकांना विंचूदंश झाल्याचीही नोंद झाली आहे. मात्र, सुदैवाने विंचूदंशामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com