

अमरावतीत पुन्हा संतापजनक प्रकार
तरुणाच्या संतापजनक कृत्याने परिसरात खळबळ
पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या
अमर घटारे, साम टीव्ही
अमरावतीमधील परतवाडा प्रकरण ताजं असताना आणखी एक संतापजनक प्रकार उघडीस आला आहे. अमरावतीत २२ वर्षीय तरुणाकडून ६५ महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या संतापजनक कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे.
अमरावती परतवाडामध्ये आरोपी अयानने शेकडो तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अयानने केलेल्या कृत्याने संपूर्ण अमरावतीत खळबळ उडाली आहे. अयाननंतर आता आरोपी आमेदने संतापजनक कृत्य केल्याचे उघड झालं आहे. २२ वर्षीय आमेदने एका ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचे उघड झालं आहे. उपचारासाठी परतवाडा येथे जात असलेल्या वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये सोडून देतो, असं सांगितलं. या वृद्ध महिलेला दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यात पुलाखाली त्या वृद्ध महिलेवर अत्याचार केला.
अत्याचारानंतर महिलेने धाडसाने शिरसगाव कसबा पोलिसात तक्रार केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासातून माग काढला. आरोपीने त्या वृद्ध महिलेला गाडीवर बसवतानाचे सीसीटीव्ही व्हिडीओ मिळवले. या सीसीटीव्हीच्या आधारावरून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे .
पुण्यात १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पुण्यात १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या सुरक्षा रक्षकाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी ५ महिन्यांची गरोदर झाली. या प्रकरणी येरवडा लक्ष्मीनगर पोलिसांनी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४२ वर्षांच्या महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार १६ नोव्हेंबर २०२५ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान सुरु होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.