amravati News: राष्ट्रगीतावर लग्न अन् संविधान पत्रिकेचे वाटप; सामूहिक विवाह सोहळ्याची होतेय सर्वत्र चर्चा
अमर घटारे, प्रतिनिधी...
Amravti News: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. हा क्षण अगदी खास व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. ज्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या ही आगळ्या वेगळ्या सामुहिक सोहळ्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. काय आहे या खास लग्नाची गोष्ट, चला जाणून घेवू.
याबाबत अधिक माहिती अशी की, लग्न म्हटले की खर्च आलाच. आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलीचा बाप हा आयुष्यभर कमाई करून एक पुंजी जमा करून ठेवतो. तर वेळप्रसंगी कर्ज काढतो.यात शेतकऱ्यांना शेतमजुरांना कर्ज परतफेड न केल्याने आत्महत्या करायला लागते.
अशाच गरीब शेतकरी शेतमजूर कामगार, अनुसूचित जाती जमाती ओबीसी ,या सर्व जातीय व आंतरजातीय जोडप्याचा सामूहिक विवाहाचे आयोजन संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केला. सध्या या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
या लग्नाची खास बाब म्हणजे यावेळी यामध्ये 70 जोडप्यांचा विवाह राष्ट्रगीताला साक्षी ठेवून हा विवाह पार पडला. या मध्ये नवरदेवाची वाजत गाजत बँड बाजा सह वरात काढण्यात आली. यावेळी सर्व वधू-वरांना संविधान पत्रिकेचे वाटप सुद्धा करण्यात आले या उपक्रमाची संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चा होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.