अमर घटारे,अमरावती|ता. २१ जून २०२४
नापिकी, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम विदर्भात पाच महिन्यात 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या या आत्महत्यांवरुन प्रहारचे नेते बच्चू कडू आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने शेतकरी आत्महत्यांबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी ते मे या महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यात नापिकी, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणामुळे तब्बल 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यामध्ये एकट्या अमरावती जिल्ह्यात143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. यावर खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभा सभागृहात शेतकरी आत्महत्याचा विषय मांडू, असे सांगितले आहे.
तसेच "सरकारच्या योजना फक्त कागदावर आहे व फक्त सरकार घोषणाबाजी करते," अशी टीका खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस- भाजपवर टीका करत स्वामीनाथन आयोग सरकार का लागू करत नाही? असा सवाल उपस्थित करत निवडणूकीत शेतकऱ्यांचे मुद्दे गायब असतात अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.