

- अमर घटारे
Amravati News : अमरावती जिल्ह्यात डोळे येण्याची साथ सुरू झाल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज डोळे आलेत (conjunctivitis) अशा तक्रारी घेऊन सुमारे 50 रुग्ण येताहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. (Maharashtra News)
अमरावती जिल्ह्यात सध्या सर्वत्र डोळे येण्याची (कंजक्टिव्हायटीस) साथ सुरू आहे. डोळे येणे याला असे आय फ्लू देखील म्हटले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण बदलामुळे सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले असतानाच आता डोळे येण्याच्या साथीमुळे अमरावतीकर हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र विभागात कंजक्टिव्हायटीसचे दररोज सरासरी 40 ते 50 रुग्ण येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन दिली आहे. कंजक्टिव्हायटीस म्हणजेच डोळे येण्याचा आजार असून हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे एकापासून तो दुसऱ्या व्यक्तीला जडण्याची शक्यता अधिक असते अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
यामुळे नागरिकांना डाेळ्यांच्याबाबत काही तक्रारी जाणवल्यास त्यांनी तपासणी करून उपच्यार घ्यावेत असे वैद्यकीय अधिकारी यांनी नमूद केले. दरम्यान डाेळे येणे यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.