Beed News : आष्टी नगराध्यक्ष निवड बिनविराेध, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लाेष

आमदार सुरेश धस यांनी जिया बेग यांचे अभिनंदन केले.
beed, ashti nagar panchayat
beed, ashti nagar panchayatsaam tv
Published On: 

Ashti Nagarpanchayat News : बीड जिल्ह्यातील आष्टी येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी जिया बेग यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत गुलालाची उधळण करत जल्लोष केला. (Maharashtra News)

beed, ashti nagar panchayat
Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

बीड (beed) जिल्ह्यातील आष्टी नगरपंचायत भाजपचे आमदार सुरेश धस (Mla Suresh Dhas) यांच्या ताब्यात आहे. या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष काेण हाेणार याची चर्चा आष्टीत हाेती.

beed, ashti nagar panchayat
Buldhana ST Bus Accident: बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात, ५५ प्रवाशांची बस घाटात उलटली, मदतकार्य सुरू

आज नगराध्यक्षपदासाठी निवडणुक घेण्यात आली. या पदासाठी भाजपच्या जिया बेग यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिया बेग यांची निवड झाल्याचे जाहीर केले. जिया बेग यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. भाजप (bjp) आमदार सुरेश धस यांनी देखील बेग यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.