Amravati News: मध्यरात्री मोठी दुर्घटना! गॅरेजमध्ये अग्नितांडव, ३०- ३५ गाड्या जळाल्या; कोट्यावधींचे नुकसान

Amravati Latest News: वरुड शहरातील एका गॅरेजला आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील ३०- ३५ गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Amravati Latest News
Amravati Latest NewsSaamtv
Published On

अमर घटारे, अमरावती|ता. १८ जानेवारी २०२४

Amravati Breaking News:

अमरावती जिल्ह्याच्या वरुड शहरातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. वरुड शहरातील एका गॅरेजला आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील ३०- ३५ गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra Latest News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड शहरातील पांढुर्णा मार्गावर पिंटू कावटकर यांच्या मालकीचे 'पिंटु गॅरेज' नावाचे दुकान आहे. या गॅरेजला गुरूवारी (१८, जानेवारी) रात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने संपूर्ण गॅरेजला वेढा घातल्याने ३०- ३५ गाड्या जळून खास झाल्या.

या दुर्घटनेत मालक पिंटु कावटकर यांचे जवळपास ३ कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग नेमकी कशी लागली? आग अपघाताने लागली की मुद्दामहून लावण्यात आली? याबाबत आता उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मालक पिंटू कावटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Latest News
Parbhani Crime News : 3 महिन्यांपूर्वी पळून जाऊन केलं लग्न, आज प्रेयसीलाच संपवलं; प्रियकराने पाेलिसांना सांगितली स्टाेरी

फटाक्यांच्या कारखान्यात आग, २३ कामगारांचा मृत्यू

थायलंडमधील (Thailand Fire News) सुफान बुरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी (१७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Amravati Latest News
Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घराची ACB कडून झाडाझडती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com