गडकरी, पेंढारकरांच्या कलाकृतींवर बंदी? महाराजांची बदनामी,साहित्यावर बंदी? मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Amol Mitkari Demand to Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत सोशल मिडीयावर पोस्ट लिहिल्या जात आहेत . त्यावरुन राजकारण तापलंय.
Amol Mitkari demand to Chief Minister Devendra Fadnavis
Amol Mitkari demand to Chief Minister Devendra FadnavisSaam Tv News
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, पोस्ट अशा गोष्टी होत आहेत. त्यावरुन राजकारण तापलं आहे. यावरुनच आता विधान परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूरावर आणि कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीये. कोणी केलीये मागणी पाहूया.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत सोशल मिडीयावर पोस्ट लिहिल्या जात आहेत . त्यावरुन राजकारण तापलंय. दरम्यान विधान परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं, चित्रपट अशा कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी केलीये. याबाबत मिटकरींनी काय मागणी केलीये पाहूया.

Amol Mitkari demand to Chief Minister Devendra Fadnavis
Satish Bhosale : रसरशीत बिर्याणी, मिनरल वॉटर; 'आका'नंतर 'खोक्या'ला VIP ट्रीटमेंट? काय आहे प्रकरण?

अमोल मिटकरींची मागणी काय?

- बेबंदशाही, राजसंन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते नाटकांवर बंदी घाला

- मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांना हद्दपार करा

- पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश व्हावा

- तिथीचा वाद मिटवण्यासाठी शासनानं अभ्यासमंडळ स्थापन करावं

मुळात राज्याला थोर साहित्य परंपरा लाभलेली आहे. याच साहित्यिकांच्या कल्पनेतून अनेक अजरामर कलाकृतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला आणि जगभर नावलौकिक मिळवला. गडकरींचं राजसंन्यास असो वा शिवछत्रपती आपल्या चित्रपटातून घराघरात पोहोचवणारे भालजी पेंढारकर असो. प्रत्येक ऐतिहासिक कलाकृती ही त्या त्या कलाकाराच्या कल्पनाशक्तीतून प्रकटलेली साहित्यनिर्मिती असते तो प्रत्यक्ष इतिहास नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने साहित्यावर बंदी घातली गेली तर एक काळ गाजवलेल्या साहित्यकृती कायमच्या स्मृतीतून नष्ट होतील आणि लेखकाचं कल्पना स्वातंत्र्यच साखळदंडात बांधलं जाईल, आणि त्यानंतर जन्माला येणारी बेबंदशाही अधिक घातक असेल.

Amol Mitkari demand to Chief Minister Devendra Fadnavis
Kunal Kamra : तुला कापून टाकू; कुणाल कामराच्या टीकेवरून शिंदे गटात भडका, फोनवरून तब्बल ५०० धमक्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com