Sujay vikhe Patil: अमोल कोल्हेंनी शेती विचार न करता अभिनयावर लक्ष द्यावं: सुजय विखे-पाटील

Sujay vikhe Patil: खासदार सुजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी नेते अमोल कोल्हे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना टोला मारलाय. दोन्ही नेत्यांनी भाजपवर टीका केली होती, त्या टीकेला सुजय विखे-पाटील यांनी उत्तर दिलंय.
Sujay vikhe Patil
Sujay vikhe Patilsaam Tv
Published On

Amol kolhe vs Sujay vikhe Patil:

खासदार अमोल कोल्हे माझे मित्र आहेत आणि उत्कृष्ट कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी शेतीवर विचार न करता अभिनयावर लक्ष केंद्रित करून अभिनय करावा असा सल्ला देत खासदार सुजय विखे पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या टीकेला उत्तर दिलं. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे आलेल्या असताना तिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी काहीच बोलले नाही अशी टीका केली होती.(Latest News)

यावेळी सुजय विखे- पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर ही जोरदार टीका केली. महायुतीवर संकट आहे म्हणून सध्या माहिती मिळावे घेत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली होती. मात्र पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना आव्हान दिले असून बाळासाहेब थोरात यांनी दक्षिणेत एक तरी मेळावा घेऊन दाखवावा संगमनेरमधून तुम्हाला गाड्या आणण्याची वेळ येऊ नये असा टोलाही लगावला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगरला उद्या महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेळाव्याला पारनेरचे आमदार निलेश लंके उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. तर मी सुद्धा लोकसभेला निवडणूक लढणार असल्याच लंके यांनी म्हटलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतरही निलेश लिंक यांनी आपली भूमिका कायम ठेवलीय. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या सभेला निलेश लंके उपस्थित राहणार का? याची चर्चा सध्या जिल्हा सुरू आहे. मात्र महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधींना आम्ही आमंत्रण दिलाय. तर प्रत्येकाने येण्याचा होकार दिला असून काही लोकांना अपरिहार्य कारण झालं तर त्याची बातमी होण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार सुजय विखे यांनी दिलीय.

Sujay vikhe Patil
Amol Kolhe On Ajit Pawar: 'दगा देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार?', अमोल कोल्हे यांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com