अरोरांची राज्यसभेसाठी फिल्डिंग? भुजबळ अस्वस्थ, कोल्हेंचा मोठा दावा

NCP Merger Buzz: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठा दावा केलाय...हा दावा काय आहे... आणि मंत्री छगन भुजबळ कोणत्या गोष्टींमुळे अस्वस्थ असल्याचं कोल्हे का म्हणालेत..
NCP MP Amol Kolhe makes a major claim regarding Rajya Sabha nomination amid fresh political speculation in Maharashtra
NCP MP Amol Kolhe makes a major claim regarding Rajya Sabha nomination amid fresh political speculation in MaharashtraSaam Tv
Published On

अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता..यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात होते..त्यात आणखी एका मोठ्या दाव्याची भर पडलीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय..ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी आणि ओबीसींचा आवाज बुलंद कऱण्यासाठीच मंत्री छगन भुजबळांना दादा राज्यसभेवर पाठवणार होते असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय...तर भुजबळांची दिल्लीत जाण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगालवाय.

दुसरीकडे कोल्हे फक्त भुजबळांबाबत वक्तव्य करुनच थांबले नाहीत... तर त्यांनी आणखी एक मोठा दावा केलाय. दादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा हे राज्यसभेसाठी फिल्डिंग लावत असल्याचा दावाही कोल्हेंनी नाव न घेता केलाय. खरंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं नरेश अरोरांच्या डिजाईन बॉक्स या कंपनीला निवडणूक रणनीतीचं काम दिलं होतं..

त्यामुळे अरोरा चर्चेत आले होते.. एवढंच नाही तर रोहित पवारांनीही निवडणूक रणनीतीकाराच्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्यावरुन दादा आणि त्यांच्या पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचा दावा केला होता.. आता राज्यसभेच्या निमित्तानं अरोरा पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत नरेश अरोरांची वर्षी लागणार की पार्थ पवारांची याबाबत उत्सुकता आणखीनच वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com