Amit Shah News
Amit Shah Saam tv

Amit Shah : ७ कोटी घर, मोफत सिलिंडर,धान्य, रेल्वे स्टेशन; अमित शहांनी भर सभेत वाचला विकासाचा पाढा

Amit Shah Latest News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Published on

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात देशातील विकासकामांचा पाढा वाचला. ७ कोटी घर, मोफत सिलिंडर, धान्य, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो सेवांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांच्या हस्ते महाआवस योजनेच्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. महाआवास अभियान पोस्टर प्रकाशन करण्यात आलं. यावेळी लाभार्थींना मंजुरी पत्रक देण्यात आलं. अमित शहा यांच्या हस्ते पत्रक देण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं.

अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे

देशात पहिल्यांदा असा प्रसंग घडला आहे. एका वेळी २० लाख लाभार्थ्यांना घरे देण्यात आली आहेत.

अनेकदा सरकारने आश्वासन दिल्यानंतर पूर्ण व्हायला वेळ लागतो, पण मुख्यमंत्र्यांच्या टीमने काम केलं.

राहुल गांधी म्हणत होते की, सरकार बँकेचं खातं उघडून देतं. मात्र, त्यावर काय देणार, पण आता १० लाख लोकांना एका क्लिकवर पहिला हप्ता जाईल.

आता सिलिंडर पण देणार आहोत. विकसित भारत करायचा आहे. नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांनी घरे देण्याचा संकल्प केला. सर्वात जास्त घरे महाराष्ट्राला दिली आहेत.

घरासोबत शौचालय, लाईट, सिलिंडर धान्य देण्याचे काम केले आहे. आता १३ लक्ष घरे दिली, आता २० लक्ष घरे देण्याचे काम करत आहेत.

कोणत्याही पंतप्रधानांनी ७ कोटी घर,सिलेंडर, धान्य, २५ कोटी लोकांना गरिबीतून वर काढण्याचं काम केलं नाही.

राज्यात नरेंद्र मोदी यांनी अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे काम केली आहेत. सिंचन,जलयुक्त शिवाराचं अनेक कामं सुरू आहेत.

देशात आणि राज्यात अनेक विकास काम सुरू आहेत. रेल्वे स्टेशन नवीन होत आहेत. नागपूर, पुणे मेट्रो काम होत आहे

अटल सेतूसह इतर काम करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.

अमित शहा यांनी राज्यातील विकास कामे वाचून दाखवले.

महाराष्ट्रातील जनतेचे आभार महायुती सरकारला परत निवडून दिले. महाराष्ट्रातील जनतेने कोणती शिवसेना खरी आहे, तसेच कोणती शिवसेना खोटी आहे, याचाही निर्णय दिला. तसाच राष्ट्रवादीबाबतही निर्णय दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com