Ambarnath Crime News : ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात युवकाची निर्घृण हत्या

Ambarnath News : सचिन रात्री अंबर चौकात कोणाला आणि कशासाठी भेटायला आला होता? तसेच तो कोणासोबत आला होता? याचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करत आहे
Ambarnath Crime News
Ambarnath Crime NewsSaam tv
Published On

अंबरनाथ : अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील अंबर चौकात एका पंचवीस वर्षे युवकाची रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. 

Ambarnath Crime News
Hingoli News : शेतीच्या मशागतीसाठी बैलचं नाही मिळालेत; शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपलं औताला, डोळे पाणवणारा VIDEO

जावसई गावातील (Ambarnath) सचिन भोसले असे सदर घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान सचिनची हत्या कोणी आणि का केली? सचिनची हत्या (Crime News) पूर्व वैमाण्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात असून, सचिन रात्री अंबर चौकात कोणाला आणि कशासाठी भेटायला आला होता? तसेच तो कोणासोबत आला होता? याचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करत आहे. 

Ambarnath Crime News
Nandurbar News : पाऊस लांबल्याने ५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात; शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करून सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या हत्येने जावसई परिसरात खळबळ माजली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com