

Malshej Ghat: पावसाळा म्हटलं की, अनेक पर्यटक विविध धबधब्यांवर फिरण्यासाठी उत्सुक असतात. पावसाळा सुरू होऊन आतापर्यंत बरेच दिवस झालेत. त्यामुळे बऱ्याचशा धबधब्यांवर तुमचं फिरुनही झालं असेल. अशात तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात एक उलट वाहणारा धबधबा देखील आहे. तुम्हाला खोटं वाटेल मात्र हे खरं आहे. उलट वाहणाऱ्या या धबधब्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेत. (Latest Reverse Kalu Waterfall News)
कुठे आहे हे ठिकाण?
उलट वाहणाऱ्या या धबधब्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुम्हाला माळशेज पट्ट्यात जावं लागेल. माळशेज पट्ट्यात काळू धबधब्यावर हे निसर्गरम्य दृश्य दिसत आहे. काळू धबधब्यावर वरतून खाली पडणारं पाणी पुन्हा वरच्या दिशेने फिरत आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलीये. अनेक ठिकाणाहून पर्यटक येथे भेट देत आहेत. तसेच मनसोक्त भीजण्याचा आनंदही घेत आहेत.
धबधबा उलट कसा काय वाहतो?
आतापर्यंत तुम्ही फक्त वरच्या दिशेने खाली बरसणारा धबधबा पाहिला असेल. मात्र हा उलट धबधबा कसा काय वाहतो असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर काळू धबधबा माळशेज पट्ट्यात येतो आणि येथे येणाऱ्या कोकणातील वाऱ्यांमुळे खाली वाहणारं पाणी पुन्हा वरच्या दिशेने फेकलं जात आहे. त्यामुळे हा धबधबा उलट दिशेने वाहतोय.
महाराष्ट्रातील 6 प्रसिद्ध धरणं
भंडारदरा विल्सन धरण, गंगापूर धरण, भावली धरण, जायकवाडी धरण, राधानगरी धरण, कोयना धरण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध धरणं आहेत. तुम्ही या ठिकाणी देखील भेट देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.