Amaravati News
Amaravati NewsSaam tv

Amaravati: लव्ह जिहाद प्रकरणात दहा दिवसांपासून मुलगी बेपत्ता; बडनेरा पोलीस ठाण्यात भाजपचे ठिय्या

लव्ह जिहाद प्रकरणात दहा दिवसांपासून मुलगी बेपत्ता; बडनेरा पोलीस ठाण्यात भाजपचे ठिय्या
Published on

अमर घटारे

अमरावती : बडनेरा येथील मुलगी गेल्या १० दिवसापासून बेपत्ता असून मुलीचा शोध घेण्यास बडनेरा (Badnera) पोलिसांना अपयश आले असल्याने बडनेरा पोलीस ठाण्यासमोर (BJP) भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णीसह कार्यकर्त्यांनी ठिय्या देत आदोलन सुरू केले आहे. (Breaking Marathi News)

Amaravati News
Dhule: तरुणाई नशेच्या जाळ्यात; धुळ्यात वाढला नशेचा बाजार

अमरावती (Amaravati) जिल्हातील बडनेरा शहरात गेल्या आठवड्या भरात लव्ह जिहादच्या ३ घटना पुढे आल्याच्या आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. यात दहा दिवसांपासून लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणातील बेपत्ता मुलीला परत आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

भाजप आंदोलनावर ठाम

जोपर्यंत मुलीला शोधून आणत नाही, तोपर्यंत आपण हटणार नाही; असा पवित्रा भाजपने घेतला आहे. त्यामुळे अमरावतीत पुन्हा एकदा लव्ह जिहादवरून वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com