अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

akola political news : अकोल्यात भाजपने डाव टाकलाय. सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांचा पक्ष फोडलाय. दोन्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठलाय.
akola politics
BJPSaam tv
Published On
Summary

अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

आंबेडकरांनंतर भाजपकडून 'शहर सुधार समिती' गट स्थापन

दोन्ही राष्ट्रवादी सोबत येणार असल्याची दिली सूत्रांची माहिती

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. अकोला महापालिकेत बसणार आता भाजपचाच महापौर.. 38 नगरसेवक असलेल्या भाजपने 'शहर सुधार समिती' गट स्थापन केलाय. त्यामुळं आता अकोला महापालिका भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता स्थापन होणार आहे. 'शहर सुधार समिती' गटात 'भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि अपक्ष एक नगरसेवक असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

akola politics
कोळसा भट्टीत भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू

भाजपने बहुमतासाठी केली 44 आकड्यांची जोडतोड.... नेमकं कसं पाहूया...

अकोला महापालिकेत ऐकूण जागा 80, आणि बहुमताचा आकडा आहे 41. आज भाजपने 38 जागा जिंकल्यात. तर मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांचा 1 नगरसेवक आणि शिंदेसेनेचा 1 नगरसेवक. भाजप समर्थित अकोला विकास समितीचा 1 नगरसेवक.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक भाजपने स्थापन केलेल्या 'शहर सुधार समिती' गटात सहभागी असणारेये... एकंदरीत असं गणित जुळल्याने आज भाजपने बहुमताचा 41 आकडा गाठला असून भाजपच्या शहर विकास समितीच्या गटातील नगरसेवकांची संख्या 44 वर गेलीय.

याशिवाय भाजपचा बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार देखील या गटात सहभागी होणार असल्याचे समजते..

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

akola politics
बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

अन् दोन्ही राष्ट्रवादी ठरल्या किंगमेकर?

अकोल्याच्या राजकारणात दोन दिवसांपासून मोठा ट्विस्ट येत आहेये. काल दिवसभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठकांचं सत्र चाललंये. दिवसा या बैठकांचं केंद्र होतंय कृषी नगर भागातील प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान असलेलं 'यशवंत भवन'. तर मूर्तिजापूर रोडवरच्या 'सिटी स्पोर्टस क्लब' येथे काल रात्री डिनर डिप्लोमॅसी'ची बैठक झाली. काल सिटी स्पोर्टस क्लब येथे झालेल्या स्नेहभोजनाला प्रकाश आंबेडकरांसह ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्यासह एमआयएम, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष आशिष पवित्रकारांचे भाऊ राज पवित्रकार यांची उपस्थिती होती. 35 पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.

akola politics
Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

या बैठकीत या पक्षांनी पदांचं वाटप आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा झाल्याचा दावा केला होता. असं सांगण्यात आलंये की ही चर्चा सायंकाळपर्यत पुढे जाणार. संध्याकाळपर्यंत या आघाडीतील संभाव्य सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असण्याची शक्यता वर्तवली खरी परंतु अद्यापही बैठकीवर पुढील चर्चा झाली नसल्याची माहिती आहेये. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अकोला महापालिकेत कोणतंच पद घेणार नसल्याची भूमिका दाखवली होती. अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची भाजप आणि काँग्रेसकडून मोठी जुळवणी सुरू होती. अखेर सत्ता स्थापनेत सत्ता स्थापनेत महत्वाची आणि 'किंगमेकर' दोन्ही राष्ट्रवादी दिसून आल्या. दोन्ही राष्ट्रवादी भाजपने स्थापन केलेल्या 'शहर सुधार समिती' गटात सहभागी होणार आहेये, अशी माहिती भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय सूत्रांनी दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com