Akola news : अकोल्यातील (Akola) तेल्हारा तालुक्यातील दु:खद वृत्त समोर येत आहे. तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा येथील विद्रुपा नदीतील खोलीकरण केलेल्या तलावात दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋषी संतोष सुरळकार आणि सागर संतोष दांडगे अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (akola district : Two minors drown in VIdrupa river)
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलाचे आई वडील हे शेतात मजुरी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे मुलावर कुणीही लक्ष द्यायला घरी कोणी नव्हते. त्यामुले दोघे मुले गावाबाहेर असलेल्या नदीवर (River) आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र नदीत केलेल्या खोलीकरणामुळे नदीला तलावाचे रूप आले आहे. त्यामुळे मुलाना पाणी पातळीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या दोघांचा तोल जाऊन पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
दरम्यान, दोघांचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मनब्दा गावातील माजी सरपंच गोपाल राऊत,प्रदीप पाथरीकर, पोलीस पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तातडीने तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांना माहीती दिली आहे. सदर घटनेनंतर तातडीने तेल्हारा ठाणेदार पुढील कार्यवाहीसाठी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.