परळीकरांच्या आरोग्याशी राख माफियांचा जीवघेणा खेळ; परिसरातून स्फोटासाठी लागणारे साहित्य जप्त

बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला अवैध राख माफीयांचे ग्रहण लागले आहे. त्यातूनच परळीच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Parli News in Marathi
Parli News in Marathi saam tv
Published On

Beed News In Marathi : बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला अवैध राख माफीयांचे ग्रहण लागले आहे. त्यातूनच परळीच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, तोटे, बॅटरी आणि वायर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे परळीमधील नागरिकांनी मोठी भीती व्यक्त केली आहे.

Parli News in Marathi
देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाने ज्यांच्याशी युती केली त्यांना दगा दिला; भास्कर जाधवांचे टीकास्त्र

बीडच्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्र असणाऱ्या थर्मलच्या परिसरामध्ये, राख साठवण्यासाठी स्फोटाचा कट आखण्यात आला होता. हा कट सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परळी ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला आहे. यावेळी पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेत, थर्मल परिसरात राखेचं काम करणाऱ्या 3 कामगारांना अगोदर ताब्यात घेतलं. त्या आरोपींकडे 103 जिलेटीन कांड्या, 150 तोटे, 3 बॅटरी आणि वायर मिळून आहे. दरम्यान पकडलेल्या 3 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने परळी परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी शहरात राखमाफियामुळे नागरिकांच जगणं मुश्किल झालं आहे. या अगोदर असुरक्षित राखेच्या वाहतुकीमुळे अपघात होवून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना कायमस्वरूपीचे श्वसनाचे आणि डोळ्याचे आजार जडले आहेत. तर गेल्या आठवड्यात याच राखेसाठी खोदण्यात आलेल्या तलावातील पाण्यात बुडून 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळं राखेची समस्या सोडवा, अशी मागणी अनेक वर्षापासून करत आहेत. मात्र मातब्बर नेत्याकडूनही याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले गेले. यामुळेच राख माफीयांची मुजरी वाढली आहे. त्यामुळे तात्काळ अवैध राख वाहतूक थांबवावी, अशी मागणी सामान्य परळीकर करत आहेत.

मात्र, त्या ठिकाणी जिलेटीन आलीच कशी ? एवढ्या संवेदनशील भागात असे प्रकार होत असतील तर शासनाने यावर प्रतिबंध घालावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ .संतोष मुंडे यांनी केली आहे. अगोदरच परळीकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच अशा पद्धतीचे धक्कादायक प्रकार समोर येत असल्यामुळे, नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. असं संतोष मुंडे यांनी सांगितलं.

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात, काही अज्ञात व्यक्तीनी राख मोकळी करण्याकरिता स्फोटके आणल्याची खबर मिळताच, विद्युत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी, सदरील व्यक्ती ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामूळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून राखेच्या ठिकाणाहून औष्णिक वीज निर्मिती केंद्र 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. सदरील घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही ,औष्णिक वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था सुरक्षा कर्मचारी चोख कर्तव्य बजावत आहे, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले.

Parli News in Marathi
Teacher Photo: शिक्षकांच्या फोटोसोबत अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार? शिक्षक भारतीचा सवाल

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता, त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींची कसून चौकशी केली जाणार असल्याचं, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान, घडलेल्या घटनेने परळीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळं राखेच्या प्रदूषणाचा सामना करणाऱ्या परळीकरांची, राख माफीयापासून सुटका केली जावी, अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com