Teacher Photo: शिक्षकांच्या फोटोसोबत अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार? शिक्षक भारतीचा सवाल

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यात शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय मंत्रिमंडळाने २४ ऑगस्ट रोजी घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये (Teacher) नाराजी पसरली आहे.
Maharashtra Teacher news File photo
Maharashtra Teacher news File photo saam tv
Published On

रुपाली बडवे

Shikshak Bharati News : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यात शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय मंत्रिमंडळाने २४ ऑगस्ट रोजी घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये (Teacher) नाराजी पसरली आहे. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण (Education) व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला आहे.

वर्गात लावलेल्या शिक्षकांच्या फोटो संदर्भात काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार? असा सवाल करत शिक्षक भारतीने शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षक भारती २९ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून शासनाचा विरोध करणार आहे.

Maharashtra Teacher news File photo
Pune BJP On Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांच्या वक्तव्याविरोधात जोडेमारो आंदोलन, पाहा व्हिडिओ

मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी २४ ऑगस्ट रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फॉर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. या निर्णयाचा विरोध शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला आहे.

'पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निर्णयाचा सोमवारी 29 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा व राजतील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे,अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

Maharashtra Teacher news File photo
गद्दारांविरोधात काम करण्यासाठी कडवट शिवसैनिक उभा आहे - अरविंद सावंत

'विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे. तसेत पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. 99.99 % शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत, असे मोरे पुढे म्हणाले.

'केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. दोषींवर होणाऱ्या कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही पण त्यासाठी सर्व शिक्षकांना अपमानित करू नये. वर्गात लावलेल्या शिक्षकांच्या फोटो संदर्भात काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार?, असा सवाल सुभाष मोरे यांनी शासनाला केला आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com