अकोला : अकोल्यातील जठारपेठ चौक परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर प्राणघातक (Crime News) हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या संपुर्ण घटनेमुळे (Akola) अकोला शहर हादरून गेले आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपींना पोलीसांनी (Police) अटक केली आहे. शिवानंद मनोहर दोरवेकर आणि वर्षीय विनोद रमेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. (Live Marathi News)
शिवसेनेचे (Shiv Sena) उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले हे रविवारी सायंकाळी मोठी उमरी भागातून दुचाकीने शहरातील जठारपेठ चौक परिसरातील कोरडे हॉस्पिटल (Hospital) जवळ कामानिमित्त आले होते. दरम्यान उमरी मधील महाकाली मंदिरापासून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करीत होते. कोरडे हॉस्पिटल गल्लीत कपले गाडी वळवित असताना अज्ञात मारेकऱ्यांनी हाच डाव साधत त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. प्रथम पाठीमागून येत पाठीत चाकू खुपसला आणि नंतर छातीत चाकूने वार केले. पाठीवर आणि छातीवर सपासप वार झाल्याने कपले जागीच कोसळले.
पोलिसात केली होती तक्रार
काही नागरिकांनी त्यांना उचलून उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांची कपले यांनी एका व्यक्तीच्या मार्फत पोलिसात तक्रार दिली होती. ज्या व्यक्तीने कपलेंनी तक्रार केली होती. त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलिसांना दिले होते. या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने अखेर प्रकरणाचा शेवट हत्येने झाला.
दोन हल्लेखोर ताब्यात
दरम्यान हत्येप्रकरणी आता दोन हल्लेखोरांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर आणि विनोद रमेश कांबळे यांना पोलीसांनी कारंजा येथून ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेमुळे शहरात वारंवार अश्या घटना घडत असल्याने सामान्य नागरीक पुरते हादरले आहेत. एकंदरीतच अकोल्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केवळ गस्त वाढवून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.