Akola News: रेल्‍वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे पडले महागात; अकोला रेल्वे स्थानकावरील घटना

रेल्‍वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे पडले महागात; अकोला रेल्वे स्थानकावरील घटना
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

हर्षदा सोनोने

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या मालधक्क्यावर सेल्फी घेत होता. या सेल्‍फीच्या नादात (Akola) ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने अल्पवयीन मुलगा पडल्याने (Railway Station) गंभीर जखमी झाला आहे. (Breaking Marathi News)

Akola News
Ashadhi Wari: पंढरपूरच्या आषाढी वारीची जागतिक वारसा स्थळामध्ये होणार नोंद

सकाळच्या सुमारास अकोला शहरातील लक्कडगंज येथे राहणारा १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा अकोला रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर आला. येथे उभ्‍या असलेल्या वॅगनवर चढून सेल्फी तो घेत होता. सेल्‍फी घेत असतानाच त्याला ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या पायाला व इतर ठिकाणी भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत.

Akola News
Kalyan Crime News: कामावरून काढून टाकले तेथेच केली चोरी; कर्जबाजारी झालेल्या नोकराचे कृत्‍य

प्रकृती स्‍थीर

अकोला लोहमार्ग पोलिसांनी त्‍याला तत्काळ सरकारी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले आहे. सदर मुलाची तब्बेत सध्या स्थिर आहे. तर सेल्फीच्या मोहापाई हा अपघात घडल्याचे अनेक प्रकार शहरात घडत असून यावर कोठे तरी आळा बसने गरजेचे झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com