अॅड. जयेश गावंडे, अकोला
Akola Railway Station Video : अकोला रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली. धावती ट्रेन पकडणं एका प्रवाशाच्या अंगलट आलं होतं. रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. (Latest Marathi News)
रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर नागपूर-पुणे एक्स्प्रेस आली होती. एक्स्प्रेस फलाटावरून निघू लागली. त्यावेळी एका प्रवाशानं ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रवाशाचा पाय घसरला आणि तोल गेला.
दोन-तीन फूट फरफटत गेल्यानंतर त्या प्रवाशाचं पाय ट्रेनखाली जाणार असंच दिसत होतं. पण तिथं कर्तव्यावर उभ्या असलेल्या रेल्वे पोलिसानं बघितलं आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यानं प्रवाशाला बाहेर खेचलं.
अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर नागपूर-पुणे एक्स्प्रेस आली. या ट्रेनमधून अमरावती ते नागपूर असा प्रवास करत असलेले प्रवासी अलोक कालीचरण बोरकर हे काही वस्तू घेण्यासाठी फलाटावर उतरले. वस्तू घेईपर्यंत ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना होऊ लागली. ट्रेन सुटल्याचे पाहून अलोक हे पळत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले.
धावत्या रेल्वेच्या दरवाजातून चढण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला. त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडू लागले. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस बाबूलाल धुर्वे यांनी हे पाहिले. ते त्या दिशेने धावू लागले. अलोक हे फलाट आणि रेल्वेच्या मधोमध अडकण्याची भीती असतानाच त्यांना बाहेर ओढले आणि त्यांचा जीव वाचवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.