Jai Malokar: MNS कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Jai Malokar Date Case : मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी बाब समोर आलीय. अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ल्या केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मालोकार यांचा मृत्यू झाला होता.
Jai Malokar:  MNS कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण;  पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
Jai Malokar Death Case
Published On

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण आलयं. जय मालोकार यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आलीय. जय मालोकारचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर जबर मारहाणीनं झाल्याचं समोर आलंय. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार,मालोकार यांच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापत झाल्या होत्या. या जखमांमुळे जय मालोकार याचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अहवालात वर्तवण्यात आलीय.

ही घटना आहे 30 जुलैची, या दिवशी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरीमध्ये जोरदार राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. यानंतर मनसेच्या 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या 20 कार्यकर्त्यांपैकी जय मालोकार एक होता. त्याचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता.

Jai Malokar:  MNS कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण;  पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Politics: अकोल्यात अमोल मिटकरी यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट, चर्चांना उधाण

परभणी येथे तो होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जयचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने गेला होता. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरेंनी अकोल्यात त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतरच्या तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं?, याची चौकशी करण्याची जयच्या कुटूंबीयांनी मागणी केली आहे.

Jai Malokar:  MNS कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण;  पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
Amol Mitkari News: शिंदेंनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये, पळता भुई थोडी होईल; अमोल मिटकरी संतापले

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, आणि जयजय मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून आमच्या जीवितीला धोका असू शकतो, त्यामुळं पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी मालोकार कुटुंबीयांनी केलीय. वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद आहे, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झालेला नाही. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, स्थानिक पोलीस सहकार्य करत नाहीये, त्यामुळे सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मृत जय मालोकार याचा मोठा भाऊ विजय मालोकार यांनी केलीये.

नेमकं काय घडलं होतं?

राज ठाकरे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने अकोल्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. मिटकरींवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त 20 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये जय मालोकार याचा देखील समावेश होता.

या राड्यानंतर जय मालोकार याला अस्वस्थ वाटू लागले, अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार याच्या छातीत दुखत असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र वैद्यकीय अहवालात जयच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापतींमूळ मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

झालेल्या राड्यानंतर जय मालोकर कुठे गेला होता? नेमकं काही तासातच त्यासोबत काय घडलं? त्यावेळी त्यासोबत कोण होतं? रुग्णालयात दाखल करताना कोण होतं? जयच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे नेमके कोण? अशा अनेक प्रश्नांचा शोध, आता अकोला पोलीस घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com