Amol Mitkari News: शिंदेंनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये, पळता भुई थोडी होईल; अमोल मिटकरी संतापले

Amol Mitkari on Mahesh Shinde Statement: त्यांनी त्यांची चादर सांभाळावी. आमच्या पक्षात नाक खुपसू नये, नाहीतर पळता भुई थोडी होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Amol Mitkari on Mahesh Shinde Statement
Amol Mitkari on Mahesh Shinde StatementSaam TV

Amol Mitkari on Mahesh Shinde Statement: शिंदे गटाचे कोरेगावाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार हुशार आहेत म्हणूनच त्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला नाहीतर, अख्खा राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (Breaking Marathi News)

शिंदे गटामध्ये फार भविष्यवाले जन्माला आले आहेत. त्यांनी आमच्या पक्षात तोंड कशाला घालावे, त्यांनी त्यांची चादर सांभाळावी. आमच्या पक्षात नाक खुपसू नये, नाहीतर पळता भुई थोडी होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Amol Mitkari on Mahesh Shinde Statement
Devendra Fadnavis News: कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार; फडणवीस छातीठोकपणे म्हणाले, 'गरीबांसाठी दिल्लीतून...'

आमच्या परिवारात त्यांनी ढवळाढवळ करू नये, आमचा पक्ष एक परिवार आहे. हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटासारखा वाह्यात पक्ष नाही. या पक्षाला यशवंतराव चव्हाण यांची परंपरा आहे. त्यामुळे काय सांगावं यावर मला बोलणं योग्य वाटत नाही, कारण त्या व्यक्तीला मी ओळखत नाही, असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

महेश शिंदे काय म्हणाले होते.

कोरेगाव येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. या वेळी पत्रकारांशी बोलत असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली . तसेच शरद पवार हुशार आहेत म्हणूनच त्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला नाहीतर, अख्खा राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता, असं विधान आमदार महेश शिंदे यांनी केलं.

Amol Mitkari on Mahesh Shinde Statement
PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानच्या १४ व्या हप्त्याची तारीख ठरली

इतकंच नाही तर, अजित पवार हे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले असते. मात्र शरद पवार यांनी किती ही प्रयत्न केले तरी थोड्या दिवसांत या गोष्टी होणारच आहेत. अजित पवार हे त्यांच्यासोबत राहणार नाहीत, असा गौप्यस्फोट आमदार महेश शिंदे यांनी केला.

महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी नव्हतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमुठ गायब केली, अशी टीका देखील महेश शिंदेंनी केली होती.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com