अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला
अकोला : लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातील निकालाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. अकोला मतदारसंघात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. अकोल्यात भाजपकडून अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात कोण खासदार होणार, हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकसभेचा निकाल ४ जूनला लागणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात तिन्ही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकोल्यात यंदा मतदान ६१.७९ टक्के झालं. अकोल्यात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ७५ हजार ६६३ एवढी आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती असल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, यावेळी ठाकरे गट हा भाजपसोबत नाही. जर शिवसेना भाजपसोबत नसती, तर अकोल्यात चित्र वेगळं असतं. तसेच अकोल्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाची राजकीय शक्ती सिद्ध झालेली नाही.
याचबरोबर मागील निवडणुकीसारखी यंदाही तिरंगी लढत दिसली. मागील निवडणुकीत हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध असं चित्र निर्माण झालं होतं. या मतविभाजनामुळे भाजपला मोठा फायदा झाला होता. मात्र, यंदा काही वेगळं चित्र पाहायला मिळालं. त्यात एक्झिट पोलचे अंदाजही समोर आले आहेत. एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत.
दरम्यान, मागील निवडणुकीत अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांनी बाजी मारली होती. धोत्रे यांना ५,५४,४४४ लाख मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडरांना २,७८,८४८ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २,५४,३७० मते मिळाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.