Politics News : लोकसभेचा निकाल लागताच भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार; जे.पी नड्डा यांचा कार्यकाल संपणार

BJP News Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा याचा कार्यकाळ 6 जून रोजी संपणार आहे.
लोकसभेचा निकाल लागताच भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार; जे.पी नड्डा यांचा कार्यकाल संपणार
Pm Modi and Amit ShahSaam tv

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा याचा कार्यकाळ 6 जून रोजी संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमले जाणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसभेचा निकाल लागताच भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार; जे.पी नड्डा यांचा कार्यकाल संपणार
Sanjay Raut: एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर भाजपमध्ये आनंदी आनंद; पण संजय राऊतांनी एका वाक्यात हवाच काढली

याआधी भाजपने जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून महिन्यापर्यंत वाढवला होता. आता निकालानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय अध्यक्षामुळे महाराष्ट्र संघटनेतही मोठे फेरबदल होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या जागी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून शिवराज सिंह चौहान यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकतं, असं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे. यासोबत भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, नेमके हे बदल कोणते असणार? भाजप कोणते मोठे निर्णय घेणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपने एका विस्तारकाची नेमणूक केली होती. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ४८ लोकसभा विस्तारक आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ विधानसभा विस्तारक नेमले गेले होते. मात्र, ज्या पद्धतीने लोकसभेत काम व्हायला पाहिजे होते, त्या पद्धतीने काम झालं नसल्याचा अहवाल समोर आला आहे.

त्यामुळे लोकसभेची कामगिरी बघून विस्तारकांसंदर्भातला मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सुमार कामगिरी असणाऱ्या विस्तारकांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसून येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला १० ते १५ जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे.

लोकसभेचा निकाल लागताच भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार; जे.पी नड्डा यांचा कार्यकाल संपणार
West Bengal Crime: भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; पश्चिम बंगालमधील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com