Akola Firing : अकोला गोळीबारानं हादरलं! दोन गटात तुफान राडा, परिसरात खळबळ

akola crime news : अकोल्यात दोन गटात राडा झाल्यानंतर गोळीबाराची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
akola News update
akola News Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

Akola : अकोला गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. अकोल्यातील कृषी नगरात दोन गटात राडा झाला. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान राडा झाला. या वादात जवळपास 8 जण जखमी झाले आहेत. अकोल्यातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील कृषीनगरात दोन गटात वाद झाला. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान वाद झाल्याची माहिती मिळत आहे. तलवारीसह बंदुकीचाही वादादरम्यान वापर झाल्याची माहिती मिळत आहे. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडले. या संपूर्ण वादात जवळपास 8 जण जखमी झाले आहेत.

akola News update
Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

कृषीनगरात गोळीबार झाल्याची चर्चा आहे. तर घटनास्थळावर 1 जिवंत काडतूस देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. तर एक हवेत गोळीबार झाला आहे. या वादातील जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता.

akola News update
Extramarital affair Case : दोन मुलांच्या आईचे अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडचा लग्नासाठी नकार; बलात्काराची तक्रार, कोर्टाने महिलेला फटकारले, नेमकं काय घडलं?

कृषीनगरातील वाद इतका भयंकर होता की, परिसरातील नागरिक आणि कृषीनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाला आहे. या वादानंतर काहीजण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस सर्वांची ओळख पटवण्याचे काम करत आहे..

akola News update
Monthly Income Scheme : घरबसल्या महिन्याला ९००० रुपये कमवा; पोस्टाची खास योजना, वाचा सविस्तर

दरम्यान, कृषी नगरातील गँगवारमध्ये जवळपास १५ पेक्षा अधिक आरोपींचा यामध्ये समावेश आहे. घटनास्थळांवरील परिसरातील पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून वाद सुरू होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सतीश वानखडे यांच्या राहत्या घरावर हल्ला चढवत गॅंगवॉर झाला आहे. या घटनेत 8 जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळी दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह आणि पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. आरोपींच्या शोधात पाच ते सहा पथक रवाना झाले आहेत. कृषी नगरात गॅंगवॉर झाल्याने अनेक दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com