Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा

Akola News : अकोल्यात भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली लहान मुलाला दाताने उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.
Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा
Akola NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यातील निंबा गावात भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघड

  • उपचाराच्या नावाखाली लहान मुलावर अमानुष कृत्य

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

  • अंधश्रद्धेमुळे समाजात अजूनही धोकादायक प्रकार घडत असल्याचे स्पष्ट

अक्षय गवळी, अकोला

राज्यात गेल्या अनेक दिवसांत भोंदू बाबा, लैंगिक छळ, धर्मांतर ही प्रकरणं चर्चेचा विषय बनले आहेत. भोंदू खरातनंतर देवदेतांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस बाबांचे काळे धंदे उघडकीस आले. या सगळ्या प्रकारावरून सुशिक्षित पिढी २० व्या शतकात विज्ञान बाजूला ठेवून अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत चालली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. अशातच अकोल्यात एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली एका लहान मुलाला दाताने उचलल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.या बाबाच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी भोंदू चेतन महाराज मुळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील निंबा गावात सदर प्रकार घडला आहे. काही पालक मुलांचा आजार बरा होण्यासाठी, अथवा मुलांच्या उज्वल भविष्यासाठी भोंदू चेतन महाराज मुळेकडे जात होते. नागरिकांच्या भाबडेपणाचा आणि श्रद्धेचा गैरवापर करून भोंदू मुळे हा लहान मुलांच्या जीवाशी खेळत होता.

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा
Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेस्ट बसची तिकिटे डिजिटल होणार, कोणत्या ॲपवर मिळणार? वाचा सविस्तर

एका लहानमुलाचा आजार बरा व्हावा म्हणून उपचाराच्या नावाखाली अक्षरशः त्याला दाताने उचलले आणि अन गरागरा फिरवले होते.याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच निंबा गावात अजून ४ महाराजांचे दरबार भारतात. लहान मुलांना दाताने उचलले, खिळ्यांच्या आसनावर बसणे, यासोबतच अनेक अघोरी प्रकार हे भोंदू महाराज करतात.

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा
Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

दरम्यान, या प्रकरणी अखेर भोंदू मुळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कलम १२५ भारतीय न्यायसंहीता, कलम ७५ बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ (बालकांवरील क्रुरता), तसेच कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत, अधिनियम कायदा २०१३ (अंधश्रद्धा पसरविणे व अमानुष कृत्य) अशा कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com