Crime News : काळिमा फासणारी घटना! मामाच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या मुलीवर अत्याचार

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime NewsSaamTv
Published On: 

Akola Crime News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मामाच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News
Bus Accident : भयंकर! धावत्या बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका; थेट कारला दिली धडक, ९ जणांचा जागीच मृत्यू

मामाच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या एका 15 वर्षीय मुलीला गावातील एका मुलाने लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवून नेल्याची घटना घडली आहे. तिथे तिच्यावर अत्याचार केला तसेच कुणालाही हा प्रकार सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

काही दिवसांनी हा संपूर्ण प्रकार पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Crime News
Accident News : सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात; 24 मुली जखमी

बुलढाणा येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी चान्नी पोलीस ठाणे अंतर्गत मामाच्या घरी आली होती. तिथेच पीडित मुलीची या मुलासोबत ओळख झाली. आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवून घेऊन गेला.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी २५ डिसेंबरला आरोपी विरुद्ध मुलीला अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात मुलीला वैद्यकीय तपासणी व तिच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com