Akola Breaking: धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या बेंचवर विषारी अळ्या; झाडाखाली भरताय वर्ग, पालकांमध्ये संतापाची लाट

Poisonous Worms Found On Students Benches: अकोल्यात विद्यार्थ्यांच्या बेंचवर विषारी अळ्या पडत असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
Poisonous Worms Found On Students Benches
विद्यार्थ्यांच्या बेंचवर विषारी अळ्याSaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

आतापर्यंत आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्याच्या घटना ऐकल्या आहेत. पण अकोल्यातून मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बेंजवर विषारी अळ्या आढळल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग खोल्या नसल्याने खुल्या मैदानात झाडाखाली शाळा भरत असल्याचं समोर आलंय. याच झाडांवर असलेल्या विषारी अळ्या विद्यार्थ्यांच्या बेंचवर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

शाळेत नेमकं घडतंय काय?

अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ आणि एक अजबगजब प्रकार समोर आला आहे. अकोल्यातल्या दिग्रस बुद्रुक गावतल्या जिल्हा परिषद शाळेत खुल्या मैदानात झाडाखाली वर्ग भरत आहे. पण इथं विद्यार्थ्यांसोबत काही वेगळं घडत (Akola News) आहे. झाडाखाली भरत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बेंजवर झाडावरील विषारी अळ्या पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका

झाडावरील अळ्या थेट बेंचवर पडल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने येथील काही वर्ग खुल्या मैदानात भरत आहे. झाडाखाली सुरू (Poisonous Worms Found On Students Benches) असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

Poisonous Worms Found On Students Benches
Indian Students In America : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियात भारतीय तरुणीचा मृत्यू; मृतदेह मायदेशी आणण्यासाठी दूतावासाकडून मदत

पालकांमध्ये संतापाचं वातावरण

दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू अन् शाळेला कुलूप (Zilla Parishad School) ठोकू, असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणांत विषारी अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पालक मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत (Akola) आहे.

Poisonous Worms Found On Students Benches
IIT Bombay Student : मोठी बातमी! आयआयटी मुंबईच्या ८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२० लाखांचा दंड; नाटकात प्रभू श्रीराम अन् सीतामातेचा अपमान केल्याचा ठपका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com