Akola: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यावर सट्टा; तिघांना अटक

अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात इंग्लंड विरुद्ध बांग्लादेशच्या सामन्यावर सट्टेबाजी करताना तिघांना पोलिसांनी लाखो रुपयाच्या मुद्देमालासह रंगेहाथ अटक केली आहे.
Akola: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यावर सट्टा; तिघांना अटक
Akola: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यावर सट्टा; तिघांना अटकजयेश गावंडे
Published On: 

जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील Akola सिंधी कॅम्प परिसरात इंग्लंड विरुद्ध बांग्लादेशच्या सामन्यावर England Vs Bangladesh सट्टेबाजी करताना तिघांना पोलिसांनी Akola Police लाखो रुपयाच्या मुद्देमालासह रंगेहाथ अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

अकोल्यात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना खात्रीलायक बातमी मिळाली, सुमित दिलीप गुरबानी (वय 21 रा. सिंधी कॅम्प पक्की खोली अकोला) हा आपल्या किराना दुकान मध्ये इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजीचा जुगार खेळत आहे. या माहितीवरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी रेड केली असता, त्या ठिकाणी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट सट्टा लावण्यात येत होता.

Akola: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यावर सट्टा; तिघांना अटक
जिल्ह्यात उपोषणाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी केली बस बंदची हाक...

पोलिसांनी टीव्ही, सेट टॉप बॉक्स रिमोट सह, आणि विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण रु. 1,04,300 चा मुद्देमाल मिळून आला. तसेच त्याने अक्षय उर्फ गोलू शर्मा आणि मुकेश उर्फ पिंकल जिवतानि हे क्रिकेट सट्टा लावण्यासाठी ग्राहक आणण्यासाठी मदत करतात व आर्थिक सहयोग असे सुमित गुरबानी याने सांगितले. या वरून या दोघांनाही पोलिसांनी अटक केलीय.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com