Ajit Pawar Plane Crash:
Ajit Pawar Plane Crash: saam tv

अजितदादांच्या मृत्यूबद्दल वाढलं संशयाचं धुकं; छगन भुजबळ,पटेलांनीही सोडलं अपघातावर मौन

Ajit Pawar Plane Crash: दादांच्या मृत्यूच्या 7 दिवसानंतर प्रफुल्ल पटेल आणि मंत्री भुजबळांनी संशय व्यक्त केलाय. मात्र या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय.. आणि त्यामुळे संशयाचं धुकं कसं गडद होत चाललंय,पाहूयात.
Published on
Summary
  • अजित पवारांच्या मृत्यूला 7 दिवस उलटल्यानंतरही शंका वाढू लागल्या आहेत.

  • सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत.

  • अमोल मिटकरींनी अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला

ऐकलंत. अजित पवारांच्या मृत्यूला 7 दिवस उलटल्यानंतरही शंकांचं धुकं काही कमी व्हायला तयार नाही.. त्यातच आता दादांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनीही दादांच्या मृत्यूबद्दल मौन सोडलंय. विरोधी पक्षांसोबतच पक्षाचे अनेक नेतेही अजित पवारांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत असल्यानं भुजबळ आणि पटेलांनीही विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत.

खरंतर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आधी सोशल मीडियावर आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. तर राऊतांनी थेट भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल त्यांच्याकडे असल्याचा दावा करत संशय व्यक्त केला होता.

आता या सगळ्या संशयाच्या धुक्यात सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत. त्यात आता पटेल आणि भुजबळांनी संशय व्यक्त केल्यानं सरकार आता तरी उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश देऊन महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनातील संशय दूर करणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com