

सध्या संपुर्ण महाराष्ट्र अजित दादांच्या निधनाने हादरला आहे. बारामती विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि चार इतर प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये २९ वर्षांच्या फ्लाइट अटेंडेंट पिंकी मालीचाही समावेश होता. पिंकी मालीचं २७ जानेवारीचं बाबांसोबतचं बोलणं अखेरचं ठरलं. पुढील लेखात आपण तिच्याबद्दल आणि तिच्या शेवटच्या क्षणांबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
पिंकी माली जौनपुर उत्तर प्रदेश येथील केराकत तहसीलच्या भैंसा गावाची रहिवासी होती. मागील पाच वर्षांपासून खासगी चार्टर्ड फ्लाइटमध्ये फ्लाइट अटेंडेंट म्हणून कार्यरत होती. मृत्यु पुर्वी पिंकीने आपल्या वडिलांशी फोनवर शेवटचं बोलणं केलं होतं, ती म्हणाली “बाबा, मी अजित दादा यांच्यासोबत बारामतीला जात आहे. तिथून मी नांदेडला जाणार आहे.” ही सर्व शेवटची पत्रासारखी फोनवरची ओळ होती. त्यामुळे या घटनेनं कुटुंब हादरुन गेलंय.
पिंकीच्या वडिलांनी शिवकुमार माली यांनी सांगितलं की, मुलगी खूप आनंदात होती. “फ्लाईटमध्ये गेल्यावर अजित पवारांशी तुमचं बोलणं करून देईन,” असं तिने सांगितलं होतं. अपघात होण्याआधी तिने तिच्या भावालाही फोन केला होता. ती दौऱ्यावर निघाल्याचे तिने सांगितलं, पण त्यानंतर तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. बारामतीहून पुढे नांदेडला जाणार असल्याची माहिती तिने कुटुंबाला दिली होती. अजित पवारांसोबत दौरा करत असल्याने ती विशेष आनंदी होती, मात्र हा आनंद क्षणातच हिरावून घेतला गेला.
पिंकी मालीचे वडील शिवकुमार माली हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष असून ते लहानपणापासून मुंबईत वाढले आहेत. मागील आठ वर्षांपासून पिंकी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. तिचा व्यावसायिक अनुभवही उल्लेखनीय होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तिने अनेक राजकीय आणि कॉर्पोरेट सहलींवर सेवा दिली होती. यापूर्वी ती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही विमानप्रवासात होती. खासदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मते, पिंकीला या क्षेत्रात मोठा अनुभव होता आणि ती कामात अत्यंत हुशार चपळ होती.
दरम्यान, बारामतीतील हा विमान अपघात किती भीषण होता, याची कल्पना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या अनुभवातून येते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान खाली उतरताना अस्थिर झालेलं दिसत होतं. काही क्षणांतच ते कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. अपघातानंतर आगीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड होत्या की कुणालाही आत अडकलेल्या प्रवाशांना मदत करता आली नाही. अजित पवार या विमानात असल्याचे समजताच घटनास्थळी उपस्थित लोकही हादरले. या अपघातात पिंकी माली सह विमानातील कोणीही वाचू शकलं नाही. त्यांच्या निधनाने फक्त कुटुंबीयच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच शोकसागरात बुडाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.