Ajit Pawar On Amit Shah : अमित शहांसोबतच्या भेटीच्या चर्चेवर अजित पवारांनी केला खुलासा; म्हणाले, मुंबईमध्ये अमित शहा...

Ajit Pawar Latest News : भेट कुठं झाली आणि केव्हा झाली? मुंबईत अमित शहा उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिमागे होते.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv
Published On

Political News : आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा सुरू होती. यावर आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. (Marathi News)

गुप्त भेटीच्या चर्चेवर अजित पवारांनी खुलासा करत म्हटलं आहे की, " भेट कुठं झाली आणि केव्हा झाली? मुंबईत अमित शहा उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिमागे होते. तेथून ते विनोद तावडेंच्या घरी निघाले आणि नंतर ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण सभा संध्याकाळी असल्याने मी अनिल देशमुखांशी बोलून आज सकाळी नागपूरला आलो आहे. भेटीगाठीच्या गोष्टी लपवून केल्या तरी त्या लपून राहत नसतात.अमित शहा यांच्यासोबत भेटल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

Ajit Pawar News
Maharashtra Politics : अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; वादग्रस्त वक्तव्यांमुळे गृहमंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते ठरवले आहेत. महाविकास आघाडीच्या सहा ते सात सभा राज्यात घ्यायच्या याची सुरुवात संभाजीनगरमधून झाली. आज दुसरी सभा नागपूरला होत आहे. सभा घेऊन मीडिया वेगवेगळ्या बातम्या चालवीत आहेत. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालवल्या तर बरं होईल. सभेत प्रत्येक पक्षाचे दोन मान्यवर भाषण करतील असं आधीच ठरलं होतं. आजच्या सभेत स्थानिक नेते म्हणून अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलणार आहेत. मी संभाजीनगरमध्ये बोललो त्यामुळे आजच्या सभेत बोलणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा होम पीच आहे तसाच....

तसेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत अजित पवार पुढे म्हणाले की, काँग्रेसकडून कोण दोन नेते भाषण करतील मला माहिती नाही पण नाना पटोले आणि सुनील केदार असतील. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि कोण बोलतील हे मला माहिती नाही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. सभा आटोपशीर व्हावी जास्त लांब होऊनये कार्यकर्त्यांना व्यवस्थित ऐकता यावं हा त्यामागे हेतू आहे. देवेंद्र फडणवीस यांचा होम पीच आहे तसाच अनिल देशमुख आणि सुनील केदार यांचा देखील होम पीच आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar News
Maharashtra Political News: 'राज्यघटनेची शपथ घेऊन काहीजण...'; बाळासाहेब थोरातांची देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com