Maharashtra Politics : अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; वादग्रस्त वक्तव्यांमुळे गृहमंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

अमित शाह यांची चंद्रकांत पाटील यांच्यावरची नाराजी अजूनही कायम आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Chandrakant Patil Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 2 दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. आज रात्री अमित शाह मुंबईत दाखल होणार आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यासाठी शाह मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शाहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे.  (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Amol Kolhe News: आधी मोदींकडून कौतुक, आता अमोल कोल्हेचं सूचक वक्तव्य; कोल्हे नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? चर्चांना उधाण

मात्र दुसरीकडे शाह यांचे जवळचे समजले जाणारे चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांची चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यावरची नाराजी अजूनही कायम आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद संदर्भात केलेल्या व्यक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असताना चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर जात असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र हा दौरा नियोजित असल्याने चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics
Pune Bus Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका टीव्ही मुलाखतीत केलं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते," असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com