'मी तसा नास्तिक आहे, पण नरसिंहवाडीला...'; अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar News : नरसिंहवाडीला जागृत देवस्थान आहे. त्यामुळं तेथे गेलो आणि दर्शन घेतलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
Ajit Pawar has commented on atheism in Yashwantroa chavan award function
Ajit Pawar has commented on atheism in Yashwantroa chavan award function Saam Tv
Published On: 

सांगली : राजकारणात कष्ट करावे लागते. त्यानंतरच माणूस पुढे जातो, त्याशिवाय नशिबाची साथही असावी लागते. मी तसा नास्तिक आहे. पण नरसिंहवाडीला जागृत देवस्थान आहे. त्यामुळं तेथे गेलो आणि दर्शन घेतलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते सांगलीच्या(Sangli) मिरजेत यशवंतराव चव्हाण पुरस्कारादरम्यान बोलत होते. ( Ajit Pawar Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

अजित पवार पुढे म्हणाले, 'आज देशात जी परिस्थिती सुरू आहे. त्यावरून समजते की, देशाला यशवंत चव्हाणांच्या विचारांची गरज आहे. सध्या समाजात तेढ निर्माण केली जात आहे. त्यामुळं समाजाला दिशाभूल करणाऱ्यांना रोखलं पाहिजे. तो कुठल्याही जातीचा किंवा पक्षाचा असो. नव्या पिढीला यशवंत चव्हाण यांचे विचार पोहचविण्याची गरज आहे, असे विचार अजित पवारांनी मांडले. पुढे अजित पवार म्हणाले, 'अलीकडे राजकीय विरोधकांना शत्रू म्हणून बघितले जात आहे. हे आधी कधीच घडले नव्हते. सुसंस्कृत महाराष्ट्रची पुन्हा परंपरा आणण्याची गरज आहे. काही गोष्टी स्पष्ट बोलायचे असेल तर बोलायचे नसते. यावरून मी खूप अनुभवलं आहे. यशवंत चव्हाण साहेबांच्या समाधी समोर दिवसभर बसून अनुभवलं आहे'.

Ajit Pawar has commented on atheism in Yashwantroa chavan award function
उद्धव ठाकरेंचा कारभार हा औरंगजेबासारखा - सदाभाऊ खोत

दरम्यान, केतकी चितळेचा शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळं सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. अजित पवारांनीही केतकी चितळे प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले,'संविधानानं सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. लोकांनी आपण काय बोलतोय, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या बोलण्यानं समाजावर काय परिणाम होऊ शकतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. केतकी चितळेची पोस्ट ही विकृत मानसिकता दर्शवणारी आहे'. पुढे अजित पवार म्हणाले, 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ६० वर्षांपासून भारतीय राजकाणात आहे. त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. राजकीय नेत्यांनी अनेक आरोप केले. तरीही त्यांनी कधीही कोणाच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं नाही'.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com