

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सामील झालाय. पक्षात फूट पडल्यानंतर सुरुवातीला अजित पवार गटाकडून त्यांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो ठळकपणे छापले जात होते. मात्र, काल अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमात बॅनरवर शरद पवार यांच्या जागी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लागल्याचे दिसून आले. अजित पवार गटाच्या या भूमिकेवर मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, 'आम्ही शरद पवारांना दैवत मानतो. त्या देवाने भक्तांना आमचा फोटो टाकू नका, असे सांगितले. तर मी कायदेशीर कारवाई करेल तर मग काय करायचं...'.
'देव कायदेशीर कारवाई करण्याचं म्हणत आहेत. आमच्या देवावर ती वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या ऐवजी आम्ही त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
पीक विमा मदतविषयी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 'आम्ही ज्या मंडळामध्ये 25% पेक्षा अग्रीमच्या सुचित केलेल्या आहेत, जिथे 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिथे 21 दिवसांपेक्षा जास्त खंड पडलेला आहे. तसेच जे अधिसूचित मंडळ आहेत, त्यातील काही मंडळ आणि विमा कंपनीच्या बाबतीत काही अडचणी होत्या.
'स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख विमा कंपन्यांची बैठक घेतली. त्यानंतर विमा कंपन्यांना काही दिवसांची मुदत दिली आहे. तसेच अधिसूचित केलेल्या मंडळांना दिवाळीपर्यंत अग्रीम मिळेल, अशा सूचना दिल्या आहेत असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.