लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांकडून चुकीचा नेरिटिव्ह सेट करण्यात आला. संविधान बदलणार असं विरोधकांकडून सांगण्यात येत होतं. आदिवासी समाज,इतर समाज यांना भीती वाटू लागली, त्यामुळे लोकसभा फटका बसला. सूर्य चंद्र आहे तोवर संविधान बदलता येणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कानमंत्र दिलाय.
अजित पवार पुण्यातील केसरीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते. लोकसभेला कोंढव्याला रॅली मेळावा चांगला झाला. पण यावरून काही मेसेज दिला लोक काही ऐकायला तयार नाहीत. आपण काही डोक्यात न ठेवता मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटी रुपये दिलेत. हे कारण आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचारामुळे लोकसभेत तोटा झाल्याचं अजित पवार म्हणाले.
लोकसभेत लोकाचे झालेले गैरसमज आता विधानसभेत दूर करावे लागतील. कार्यकर्त्यांनी आपली भूमिका आज इथून बाहेर पडल्यानंतर विकास आणि अर्थसंकल्पात केलेली मदत लोकांपर्यंत पोहोचवा, असा कानमंत्र अजित पवार यांनी दिलाय.
लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांना टोला
लाडकी बहीण योजना फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत. त्या लवरकच दूर करू,अडीच लाख उत्पन्न असेल त्यांना ही योजना मिळणार आहे. तृतीयपंथीय याच्यासाठी योजना आणल्यात. समाजाच्या सर्व जाती धर्मातील महिलांना तीच उत्पन्न अडीच लाख आत असेल ज्यांच्याकडे केसरी रेशनकार्ड असेल. सरकारची ही योजना लोकप्रिय ठरलीय.
परंतु विरोधक त्यावरुन सरकारवर टीका करत आहेत. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आता विरोधक काहीही बोलत आहेत. हा चुनावी जुम्मला आहे, हे चालणार आहे का? पण महिला आणि मतदार ठरवतील. त्यामुळे लाभार्थी सगळे ठरणार आहेत. भाऊबीज समजा किंवा काहीही समजा, फक्त महिला नाही तर सगळ्या स्तरातील लोकांच सरकारने विचार केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.