सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

Demand For Sunetra Pawar As Deputy CM: अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे... अशातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह येण्याची गरज आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवारांकडे पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी जोर धरू लागलीय... राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु आहे?
NCP leaders and workers rally behind Sunetra Pawar as leadership talks intensify after Ajit Pawar’s exit.
NCP leaders and workers rally behind Sunetra Pawar as leadership talks intensify after Ajit Pawar’s exit.Saam Tv
Published On

एकिकडे अजितदादांच्या अकाली एक्झिटचा धक्का आणि दुसरीकडे राजकारणाची अपरिहार्यता...यामुळे राज्यात 'दादांचा राजकीय वारसदार कोण?' असा सवाल उपस्थित होतोय अजितदादांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याची मागणी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांपासून मंत्री आणि आमदारांपर्यंत सर्वच जण करतायत...

दरम्यान राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर तब्बल दीड तास बैठक झालीय. या बैठकीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फडणवीसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... तर या बैठकीनंतर जनभावनेचा आदर करून उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणार असल्य़ाची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी दिलीय...

दुसरीकडे, पार्थ पवारांना केंद्रात राज्यसभेवर पाठवून 'दिल्लीत पार्थ आणि महाराष्ट्रात वहिनी' असा नवा सत्तेचा फॉर्म्युला राबवणार असल्याची चर्चा आहे...यामागे जी कारण आहेत त्यातलं पहिल कारण म्हणजे पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी राजकीय वारसा 'पवार' कुटुंबातील व्यक्तीकडेच राहील.. आणि दुसरं बारामतीच्या संघटनात्मक बांधणीत सुनेत्रा पवारांचा मोठा वाटा आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे सूत्र दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण कायम राहील.. सुनेत्रा पवारांचा राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशीही चांगला संपर्क राहीला आहे

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्याबाबत विरोधकांचीही सकारात्मक भूमिका आहे...दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या घडामोडीत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली असली तरी अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्यांच सुनील तटकरेंनी म्हटलंय... तर शनिवारी निर्णय झाल्यास लगेच शपथविधी होईल, असं भुजबळांनी म्हटलंय.....

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असतानाच अजित पवारांच्या अकाली निधनानं कार्यकर्त्यांमध्ये एक पोकळी निर्माण झालीय.पक्षाला, कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी ाष्ट्रवादीच्या नेत्यांना यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com