Ajit Pawar Death: उद्धवस्त... अजितदादा गेल्यानंतर सुप्रियाताईंची पहिली पोस्ट

Ajit Pawar Death Supriya Sule Status First Reaction: अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनाने सुप्रिया सुळेंही भावूक झाल्या आहेत.
Ajit Pawar Death Supriya Sule Status First Reaction
Ajit Pawar Death Supriya Sule Status First ReactionSaam Tv
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. अजित पवारांच्या जाण्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या जाण्याने सुप्रिया सुळेदेखील भावूक झाल्या आहेत. अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत.

Ajit Pawar Death Supriya Sule Status First Reaction
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या विमानाचे दोन तुकडे, जिकडे तिकडे धूर अन् आगीचे लोळ, अपघाताचे Photos

पवार कुटुंब भावूक

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं फार वेगळं होतं. हे दोघेही राजकारणात सक्रिय होते. त्याचसोबत या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. अनेकदा ते दोघेही एकत्र दिसत होते. अजित पवारांच्या निधनानंतर आता बहीण सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेट्‍स ठेवलं आहे.

Ajit Pawar Death Supriya Sule Status First Reaction
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या विमानाचे दोन तुकडे, जिकडे तिकडे धूर अन् आगीचे लोळ, अपघाताचे Photos

सुप्रिया सुळेंचं स्टेट्‍स

सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गेल्यानंतर Devasted असं स्टेट्‍स ठेवलं आहे. 'खचून गेले', अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. अजित दादांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुप्रिया सुळेंना धक्का बसला आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं नातं

राजकारणात कितीही विरोधात असले तरीही पवार कुटुंब नेहमी एकत्र असायचं. कोणत्याही कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसायचे. अजित पवार हे अत्यंत मिश्कील व्यक्तिमत्त्व होते. ते नेहमी जनतेच्या सेवेसाठी काम करायचे. त्यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केल होते. अनेकदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या सोबतीने राज्यासाठी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसा पुढे नेण्यात अजित पवारांचे खूप मोठं योगदान आहे.

Ajit Pawar Death Supriya Sule Status First Reaction
Ajit Pawar Passed Away: खासदार ते सहा वेळा उपमुख्यमंत्री; अशी राहिली अजित पवारांची राजकीय कारकिर्द!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com