बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर.
अजित पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर बीडमध्ये.
महिला पोलीस कर्मचाऱ्याचे चिमुकल्यासोबत कर्तव्य बजावतानाचे दृश्य चर्चेत.
हजारो एकर शेती पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला.
बीड जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. या अतिवृष्टीमुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटीसदृश्याने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला असून, नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांत आणि हजारो एकर शेतात पसरले आहे. पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची देखील घटना घडली, तर दुसऱ्या घटनेत मदत न् मिळाल्याने वृद्धाचा घरातच मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंचे, तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीडमध्ये दाखल झाले. अजित पवार हे दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भातला आढावा घेत आहे.
थोड्याच वेळात ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामासाठी दाखल होणार आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या दौऱ्यातील एक हृदयस्पर्शी दृश्य चर्चेत आले आहे. बीडमधील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पावसात आपल्या छोट्या चिमुकल्याला घेऊन कर्तव्य बजावताना हजेरी लावली. पावसातही कर्तव्य आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
पिकांनाही फटका
या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, आणि ऊस या पिकांना मोठा फटका बसला असून शेतीचे आतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हा नैराश्यात गेला आहेत.
परळीत 15 गावांचा संपर्क तुटला
परळी तालुक्यात देखील पावसाने हाहाकार माजवला. यामुळे नदीला पूर आल्याने 15 गावांचा संपर्क तुटला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.