मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बंजारा समाजानंही आरक्षणासाठी हुंकार भरलाय...हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीड आणि जालन्यात बंजारा समाज एकवटलाय..
मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं देण्यासाठी 1909 मधील हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होणार आहे.. याच 1920 च्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख सुगळी म्हणून आहे...हीच सुगळी जात आंध्र प्रदेश आणि तेलंगणात एसटी प्रवर्गात आहे... हाच धागा पकडून बंजारा समाजाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रात आदिवासी आरक्षण देण्याची मागणी केलीय...
दुसरीकडे सरकारने संवेदनशीलपणे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रभर चक्काजाम करण्याचा इशाराच बीडमधून बंजारा समाजाने दिलाय..खरंतर 2011 च्या जनगणेनुसार राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या 8 टक्के आहे... हा समाज महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रवर्गात येतो... मात्र आंध्रप्रदेशसह वेगवेगळ्या राज्यात बंजारा समाज कोणत्या प्रवर्गात येतो?
खरंतर वेगवेगळ्या राज्यात काही जाती वेगवेगळ्या प्रवर्गात आढळतात... त्यातच आता हैदराबाद गॅझेटियरमधील कुणबी आणि कापू एकच असल्याचा, लांबडा बंजारा आणि सुगळी एकच असल्याचा तर मध्य प्रदेशात धनगड आणि महाराष्ट्रातील धनगर एकच असल्याचा दावा करण्यात येतोय.. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी आरक्षणाचा पेच वाढत चालला आहे, हे मात्र निश्चित.. त्यामुळे सरकार बंजारा समाजाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन आदिवासी समाजाला दुखावलं जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.