
नवी मुंबई महापालिका निवडणूका लागणार असल्याने मनसेकडून वातावरण निर्मिती
अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास दिला नकार
मात्र अनौपचारिक गप्पा मारताना दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला दिला दुजोरा
येणाऱ्या दिवसांत आपण मुंबई , नवी मुंबई , ठाणे आदी शहरात भेटू देवून मनसेची बांधणी करणार असल्याचं सांगितलं
धुळे शहराला सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला, यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या आणि विजेचे खांब उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे तर चार चाकी वाहनावर देखील झाड उन्मळून पडल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे सुदैवाने यात जीवित आणि मात्र टळली आहे,
आषाढी यात्रेचा सोहळा येत्या सहा जुलै रोजी साजरा होत आहे. या काळात जास्तीत भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी 27 जून पासून ते प्रक्षाळपूजे पर्यंत 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.
दरम्यान तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.
येवला तालुक्यातील विसापूर या ठिकाणी गट नंबर 17 मध्ये विठ्ठल सखाराम भड व दिलीप दत्तू बोळीच या यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केली होती. मात्र जमीन मोजणी होऊन कोर्टात वाद सुरू असताना आज दुपारच्या सुमारास दोन्ही गटात तुंबळ हाणामारी होऊन एकूण 10 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत
अहिल्यानगर शहरसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी..
दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने लावली हजेरी..
हवामान विभागाने आज सायंकाळी दिला होता पावसाचा इशारा..
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ..
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा..
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीजयंती निमित्त जेजुरी येथील खंडोबा मंदिरात ३०० जोडप्यांच्या शुभहस्ते मल्हार याग यज्ञाचा आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील भाविक-भक्तांनी मोठ्या उत्साहाने मल्हार याग मध्ये सहभाग घेतला
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
श्री खंडोबा मंदिर पायरी मार्गावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यास देवसंस्थान तर्फे भव्य अशी मेघडंबरी बसवण्यात आली आली आहे. त्याचे लोकार्पण देखील जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना शिमला IGMC मध्ये दाखल करण्यात आले आहे. IGMC मध्ये सोनिया यांच्यावर एमआरआय आणि अन्य वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त “संकल्प से सिद्धि तक” या बोधवाक्याखाली जळगाव शहरातील ब्राह्मण सभागृह येथे जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला भाजपाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपा पदाधिकाऱ्यांसह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समुद्राच्या पाण्यातून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी दापोलीत एका डंपरचालकावर कारवाई करण्यात आलीय. दापोलीतील हर्णे बंदरात जेटीचे काम सुरू आहे. जेटीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळून अपघातग्रस्त झाला. या कामासाठी हर्णे बायपास येथून डबर, सिमेंटचे ट्रायपॉड यांची वाहतूक केली जात आहे.समुद्राला भरती असतानाच सामानाची वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यातूनच धावत होता. या डंपरवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने समुद्राच्या पाण्यातून डंपर वेगाने नेला. हा डंपर चालकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली नाही. असा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्ताधारी आमदार व खासदार यांच्या विरोधात "क्या हुआ तेरा वादा" या टॅग लाईन खाली आंदोलन करण्यात आले. नांदेड शहरातील भाग्यनगर कमान ते भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये हप्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यांचा समावेश या आंदोलनात होता. या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
नाशिकच्या ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज पठण पार पडल्यानंतर एक अनपेक्षित घटना घडली. नमाज अदा झाल्यानंतर पॅलेस्टाईनचा झेंडा मैदानावर फडकवण्यात आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कार्यक्रमासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात असूनही ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
रायगडमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे दऱ्या डोंगरातून वाहणारे धवधबे प्रवाहीत झाले आहे. रायगडमध्ये धबधबे हा एक पावसाळी पर्यटनाचा भाग असून मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. धबधबे सुरु झाल्याने आता पावसाळी पर्यटन प्रेमींना धबधब्यांचे वेध लागले आहेत.
मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख झाल्यानंतर नागपुरातील वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक केली आहे.
फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करत मुंबईतून कल्पेश कक्कड नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
उरणमध्ये पावूसाने विश्रांती घेतली
यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले आहे.
सद्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
आर्ध्या तासात जोरदार पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचलेले होते.
दुपारी १ च्या सुमारास उरण शहरात तुफान पाऊस पडला. १५ मिनिटांच्या अंतरावर कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर काही वाहने पाण्यात बुडाली. पावसात चालकांची एकच तारांबळ उडाली असून, गटाराचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
घाटकोपरमधील दामोदर पार्क येथील मैत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बकरी ईदनिमित्त करण्यात येणाऱ्या कुर्बानीवर पालिका प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात सोसायटीच्या काही रहिवाशांनी यापूर्वी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
मात्र, हायकोर्टाने हा विषय निर्णयासाठी पुन्हा पालिका प्रशासनाकडे पाठवला. त्यानंतरही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे आता रहिवासी पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासन दिली होती, त्याची पूर्तता न झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून क्या हुआ तेरा वादा, असे आंदोलन केले. आज जालना येथे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन दिलंय. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
उरणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या पाण्यात गाड्या वाहताना दिसत आहेत. कल्याणमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.
उद्यापासून बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये करणार अन्नत्याग आंदोलन.
प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती.
शेतकरी, अपंग, दिव्यांग,शेतमजूर, यांच्या साठी आंदोलन..
उद्या अमरावती मधील संत गाडगेबाबा मंदिरा पासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधी पर्यत काढणार बाईक रॅली..
बाईक रॅलीत 20 हजार शेतकरी आणि कार्यकर्ते येणार असल्याचा दावा..
सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आज रायगड जिल्हयात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड भागात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसायला सुरूवात झाली. काही भागात ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू आहे. सकाळी कडक ऊन पडले होते मात्र दुपारी आकाशात काळेकुटट ढग जमा झाले आणि पावसाने बरसायला सुरूवात केली. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. आजच्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
० पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रवादी सोबत युती नाही
० आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंना इशारा
रायगडच्या पालकमंत्रीपदा वरून निर्माण झालेला वाद आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पार टोकाला पोहचला आहे अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत थेट सुनील तटकरे यांनाच इशारा दिला आहे सुनील तटकरे हे नेहमी चीट करत आले आहेत यावेळेस देखील त्यांनी चीट करून स्वतःच्या घरात पदे घेतली हे शिवसेना खपवून घेणार नाही भरत गोगावले हेच रायगड चे पालकमंत्री व्हायला पाहिजेत यासाठी तटकरेंनी माघार घ्यावी जो पर्यंत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही अशी भूमिका महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली
35 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस चा वाटा नाशिकमध्ये आहे त्यामुळे आमची जबाबदारी मोठी आहे आम्ही सर्वजण तयारी करत वाहवत
10 हजार लोक जाणार
लाडकी बहीण योजनेच्या निधी बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे भाष्य केले आहे त्याबाबतीत मी बोलणार नाही
कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी नी आंदोलन केले असेल ते मला माहिती नाही माहिती घेऊन कारवाई केली जाईल
ऑन मनसे शिवसेना युतीबाबत मी काही बोलत नाही
बावधन पोलीस निलेश चव्हाणला घेऊन कोर्टाकडे निघाले
बावधन पोलीस चव्हाणांची पोलीस कोठडी मागणार की चव्हाणला न्यायालयीन कोठडी मिळणाऱ्या कडे लक्ष
रत्नागिरी: चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातली घटना
रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती
खोल दरी असलेल्या ठिकाणी असलेली संरक्षक भिंत कोसळून रेलिंग देखील निखळले
घटनास्थळी केवळ दगड लावण्यात आल्याने अपघाताचा धोका
प्रशासनाकडून घटनेकडे दुर्लक्ष
घाटातून मोठ्या प्रमाणात सुरू असते अवजड वाहतूक
तत्काळ उपाययोजना करण्याची गरज
पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गर्दी
आज सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक प्रवासी कर्जत लोणावळा या ठिकाणी जाण्यासाठी
सार्वजनिक १४ शौचालयांची जमीन एका व्यक्तीने ताब्यात घेतली असतानाही ग्रामपंचायतीने कुठलीही कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी अखेर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. ही घटना वरोरा तालुक्यात बोरगाव इथे घडली. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी जाहीर केला. चारगाव धरणात गाव गेल्याने बोरगाव, कवडशी या गावांचे १९८०-८१ मधे पुनर्वसन करण्यात आले.
यवतमाळ वरून अमरावती कडे एसटी बस जात असताना टाटा मॅजिक मधील चार ते पाच युवकांनी बस समोर टाटा मॅजिक आडवी करून केली मारहाण
एसटीला साइट देत नसल्याने चालकाने हाॅर्न वाजवून साइट मागितलं,हाॅर्न का वाजविला या कारणावरून एसटी बस मध्ये राडा,बस मधील प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण
यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटफळी दोडकीच्या हनुमान मंदिर जवळील घटना
नेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल,वाहकांच्या हातातील दहा हजार 360 रूपये कोणीतरी नेले
शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,दरोडा टाकणे असे गंभीर गुन्हे दाखल,सदर घटना चार जूनची असून सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वसई विरार शहरात दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मात्र आज दुपारपासूनच रिमझिम पडण्यास सुरुवात केली आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वातावरणात देखील बदल झाला असून येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
शिवापूर टोलजवळ अपूर्ण फ्लायओव्हर कामामुळे नागरिक त्रस्त
आज बकरी ईद असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, राजगड, वाई, महाबळेश्वर या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी मुस्लिम समाजातील भाविक,शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक पर्यटक निघाले होते.
मात्र, सातारा-पुणे महामार्गावरील अपूर्ण फ्लायओव्हर आणि शिवापूर टोल नाक्यावरील निकृष्ट दर्जाचे काम यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
- शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट भाडेकराराचा वापर
- फ्लॅट मालकाच्या परवानगीशिवाय तयार केला बनावट करारनामा
- फ्लॅट नं. 203, दुसरा मजला, रमाम कॉलनी, पुणे – बनावट पत्ता वापरून दस्तऐवज सादर
- फसवणूक करत निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, शस्त्र परवाना अर्ज केला सादर
- मुळ रहिवासी नसताना फसवणुकीने पुणे पत्ता दाखवला
- शस्त्र परवान्यासाठी पुणे पोलीसांना चुकीची माहिती देत मिळवला शस्त्र परवाना
- माळवाडी पोलीस ठाण्यात शशांक हगवणेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
- IPC कलम 420, 467, 468, 471, 34 आणि घरबांधणी कायद्याअंतर्गत गुन्हा
- आणखी बनावट दस्तऐवज उघड होण्याची शक्यता
- शंशांक हगवणेची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असुन माळवाडी पोलीस शशांक हगवणे चा ताब्या घेण्याची शक्यता
नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे.
खारघर पनवेल वाशी बेलापूर इत्यादी ठिकाणी पाऊस सुरू
- कोल्हापूर येथील ज्योतिबा डोंगराच्या निर्जन स्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला केले होते ठार, आरोपी पती सोलापूर पोलीस ठाण्यात झाला हजर
- फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत सांगितली खुनाची हकीकत, सोलापूर पोलिसांनी आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या केलं स्वाधीन..
- सचिन चंद्रशेखर राजपूत यांनी पत्नी शुभांगी हिचा केला होता चारित्र्याच्या संशयावरून खून..
- भारतीय सैन्यात आठ वर्ष सेवा बजावणाऱ्या सचिन याने महिलेसोबत अशील वर्तन केलंय यामुळे सेनादलातून केलं होतं बडतर्फ..
- फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सचिन मोटरसायकलवरून झाला होता दाखल..
- 'मी कोल्हापूर येथून आलो असून.. मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आल्याची' सचिनने फौजदार चावडी पोलिसांना दिली होती कबुली..
नंदुरबार जिल्हा जातीयदृष्ट्या संवेदनशील असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश....
धरणे आंदोलन, मोर्चे उपोषण केल्यास होणार कायदेशीर कार्यवाही....
9 जून पासून ते 23 जून पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी....
जिल्हाधिकारी मिताली सेठी नी काढले मनाई आदेश...
रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह रोहेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडी..
दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्तीवाद झाल्यानंतर राजगुरुनगर न्यायालयाने शशांक आणि लता हगवणे मायलेकांसह प्रणय साठे इतर तीन साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळ हगवणे मायलेकांसह मुक्काम आता न्यायालयीन कोठडीत होणार आहे
तीर्थक्षेत्रावरील प्लास्टिक वापर आणि प्रदूषणाचा घेणारा आढावा
परळी वैजनाथ,तुळजापूर,अक्कलकोट येथील तीर्थक्षेत्रावर करणार प्लास्टिक वापरा बाबत जनजागृती
तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर इथ आढावा बैठकीचही आयोजन
सिंगल युज प्लास्टिक बॅग वापराच्या निर्बंधाच्या अनुषंगाने बैठक
तीर्थक्षेत्रावरील अधिकारी आणि व्यापारी यांच्याशी साधणार संवाद
आज दिवसभर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु राहील...
पुणे शहरासह जिल्ह्यात आज दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार
पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलाय
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.. माजी आमदार मुरकुटे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.. मुरकुटे यांनी यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,BRS पक्षात काम केले आहे.. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत..
जलपर्णीमुळे भीमा नदीत जलप्रदूषण वाढले...
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर...
दूषित पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय ही धोक्यात..
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भीमा नदीकाठच्या परिसरात जलपर्णीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.दौंड आणि शिरूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आली आहे.इंदापूरमधील भिगवण, पळसदेव, डाळज परिसरात ही जलपर्णी पसरली असल्याने भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण झाला आहे. या जलपर्णीमुळे पाण्यालाही उग्र वास येतोय. मनुष्याला काय पण जनावरांना देखील पाजण्याच्या लायकीचं हे पाणी राहिलेलं नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत..उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते अनेकांचे संसार यावर ते अवलंबून आहेत मात्र वाढत्या जलपर्णीमुळे मत्स्य व्यवसाय देखील धोक्यात आलाय....
संतोष चंद्रकांत यादव ,बालाजी विठ्ठल पवार आणि महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर निलंबित
या तिन्ही पोलीस अंमलदारांना नेमून दिलेल्या चौकातील नोकरी न करता दुसऱ्या ठिकाणी जाऊन वाहतूक नियमन न करता गाड्या अडून दंड करताना आढळल्याने केल निलंबित
एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे तर वाहतूक पोलीस वाहतूक नियमन न करता वाहनावर दंड आकारून पावती करण्यात धन्यता मानत आहे.
देशासोबत महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढलीय याच अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कोरोना कक्षाची स्थापना करून तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर परभणी जिल्ह्यात कोरोनाचा कक्ष सुरू करण्यात आला आहे परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटी जेन तपासण्या केल्या जात आहे याच तपासण्या दरम्यान पुण्याहून परभणीत आलेल्या एका डॉक्टरला कोरोना ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा घातक नसुन याचे सिम्टमस हे नार्मल आहे परंतु नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी आवाहन केले आहे .
ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशीनिमित्ताने आज पंढरीत हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत . दर्शन रांग पत्राशेड पर्यंत गेली आहे. दिंड्यांनी नगर प्रदक्षिणा करून वारी पूर्ण केली.
विठ्ठल नामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागा स्नानासाठी ही भाविकांनी गर्दी केली आहे. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सहा ते सात तास तर मुख दर्शनासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.
बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी येत असून अनेक भागात पाणीटंचाई भेडसावतीय. उल्हास नदीत जेएनपीटी-वडोदरा मार्गाच्या पुलाचं काम सुरू असून, तिथल्या भरावाची माती पुराच्या पाण्यात वाहून जीवन प्राधिकरणाच्या बंधाऱ्यात अडकलीय. त्यामुळे एमजीपीची जलशुद्धीकरण प्रक्रिया मंदावलीय.
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलय तर एकजण फरार झालाय.. आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आलाय.. या घटनेनंतर परिसरातील शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.. आरोपी प्रशांत भांड आणि त्याच्या साथीदारावर आर्म ऍक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी सात गावांमधील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सोमवारी सुनावणी सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी,कुंभारवळण, एकतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे 2673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
नांदेड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वस्तीगृह गेल्या आठ वर्षापासून बंद आहे. इमारत मोडकळीस आल्याने हे वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता याला आठ वर्षे होत आले तरी अद्याप पर्यंत नवीन वस्तीगृहाची निर्मिती झाली नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना बाहेर राहण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वस्तीगृहाच्या इमारतीच्या बांधकामाचा 23 कोटी 83 लाख रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळाल्याने नवीन वसतिगृह बांधण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नवीन वस्तीगृहासाजे काम करण्यात यावं अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहेत.
जालन्यात घरफोडी आणि चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास एक लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.अक्षय शर्मा ,अविनाश शेंडगे आणि संदेश खडके अशी घर पुढे आणि चोरी करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर जालन्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये घरफोडी ,चोरी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल होते. काही महिन्यांपासून या आरोपी फरार होते.काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही सराईत आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे..
आज बकरी ईद असून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठण केले आणि एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेनं नागरिकांसाठी एक महत्वाचं पाऊल उचललं असून, नगरपरिषदेच्या एकूण 44 सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर भरणा, किरकोळ व्यावसायिक परवाने, विवाह नोंदणी, ना हरकत प्रमाणपत्र अशा अनेक सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येईल.या उपक्रमामुळे नागरिकांना वेळ खर्च करून कार्यालयात येण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा, असे आवाहन कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नागरिकांना केलंय.
मुक्ताईनगर पुंडलिक वरदे हरि विठ्ठल.... श्री ज्ञानदेव तुकाराम..... आदी शक्ती मुक्ताईच्या जयघोषात संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वांत लांब तब्बल ६०० किमीचा पायी प्रवास २८ दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करेल. कोथळी, येथील मूळ मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाली. दिंडीचा पहिला मुक्काम नवीन मुक्ताई मंदिर येथे झाला. येथे रात्री मुक्काम करून आज सकाळी पुन्हा पंढरीच्या दर्शनासाठी पालखी रवाना झाली आहे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवून २५ मिनिटांची करण्यात आली आहे. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानने विसाव्याचा वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला.
पुण्यात मुक्काम करणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ अत्यल्प असल्याने पालखीच्या दर्शनाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनेक भाविकांचा हिरमोड होत असे. त्यांची अडचण लक्षात घेऊन माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी विसाव्याची वेळ वाढविण्याची विनंती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्याकडे केली. त्याला त्वरित प्रतिसाद देऊन ही वेळ २५ मिनिटांपर्यंत वाढवित असल्याची ग्वाही मोरे महाराज यांनी दिली. त्यामुळे खडकी, औंध, बोपोडी, बाणेर, रेंजहिल्स या उपनगरातील भाविकांना शांतपणे पालखीचे दर्शन घेता येणार आहे.
कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात झाल्यानंतर ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलतेवेळी ससून रुग्णालयाच्या न्यायवैदक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री हरी हरणळ व वाटपाय अतुल घाट कांबळेच्या संपर्कात होता.
त्यामुळे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉक्टर तावरेच्या सक्रिय सहभाग सिद्ध करणारे पुरावे आहेत अशी माहिती सरकारी वकिलाकडून न्यायालयात देण्यात आलीय....
अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामूळे पेरणीसाठी मशागत करून शेतकरी बी बियाण्याच्या तडजोडीत व पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांनी 62 हजार 627 शेतकऱ्यांना 846 कोटीचे कर्ज वाटप केले.. याची टक्केवारी ही 51% आहे..या पीक कर्ज वाटप त अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका माघारल्या।असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शेतकऱ्यांना हिम्मत दिलेली आहे. या बँकेत कर्ज वाटपाच्या टार्गेट च्या 78 टक्के कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपामध्ये आपला हात आखडता घेतल्याची दिसून येत आहे.
सानपाडा सेक्टर 11 मधील बँकेच्या एटीएम मध्ये पैसे डिपॉजिट करणाऱ्या एका इसमाचे अपहरण करून त्याच्याजवळून जवळपास पावणे 32 लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार घडला होता. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सांगली पर्यंत त्यांचा पाठलाग केला. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर 50 ते 60 लॉजेस ची तपासणी करून आठही आरोपीना कर्नाटक येथून अटक केली आहे. आरोपी हे केरळ सायबर पोलीस असल्याची बतावणी करून अश्या घटना करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक आरोपिंकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी वाहन असा एकूण 30 लाख 48 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. न्यायालयाने आरोपीना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
बनावट शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण सध्या एरणीवर आले आहेत त्याच वेळी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक भरतींवर बंदी असलेल्या काळात तब्बल 755 शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याची बाब पुढे आली आहे विशेष म्हणजे ही आकडेवारी तीन वर्षांपूर्वीच शिक्षण आयुक्तालयाने मागून ही त्यावर आजवर प्रशासनाकडून ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
हर घर नल से जल हे ब्रीदवाक्य घेऊन केंद्र शासनाने जलजीवन मिशन कार्यान्वित केले या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी न द्वारे दिले जाणार होते त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्याला पाच लाख 22 हजार 844 एवढे उद्दिष्ट होते आतापर्यंत चार लाख 19 हजार 707 लाभार्थ्यांना न जुळणी केली तर तब्बल एक लाख तीन हजार 177 लाभार्थी अजूनही न जोडणीच्या प्रतीक्षेत आहे ही प्रतीक्षा कधी संपणार असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.
जुने मुंबई पुणे महामार्गावरील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील संविधान चौका जवळील पाच उपहारगृहे जमीनदोस्त करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण पथक, लष्करी बंदोबस्त आणि चार जेसीबीच्या साह्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे. लष्करी जागेवरील देहूरोड सेंट्रल चौकातील ही पाचही उपहारगृहे बोर्डच्या धडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे एरवी गजबजलेला दिसणारा आणि अरुंद वाटणारा हा चौक आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संविधान चौकात ही उपहारगृही होती. खवय्यांच्या वाढत्या संख्येमुळे चौकात अलीकडे गर्दी वाढली होती. त्यामुळे चौकात अन्य छोट्या व्यवसायिकांची चहाची दुकाने चालू होती. दरम्यान या कारवाईमुळे आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे..
बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज अदा करतात यादरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी आहे .गेल्या 35 वर्षापासून शिवसेना ही प्रवेश बंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करत आहे.
यवतमाळ शहरा लगतच्या हरितवाल लाॅन येथून एका रूम मधील खिडकीतून आकोडा टाकून रोख पाच लाख आणि 75 हजारांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली. त्यावरून चंदन खारकर राहणार विदर्भ हाउसिंग सोसायटी यवतमाळ यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अवधूतवाडी पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
टेंभुर्णीत गुन्हेगारांना रांगेत उभे करून पोलिसांचा सज्जड दम
पंढरपूर जवळच्या टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगारांना रांगेत उभे करून पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सज्जड दम भरला.
यापुढे गुन्हे कराल तर याद राखा.कायदा सुव्यवस्थेचा कोणी भंग केला तर मोकोका,एमपीएडी आणि तडीपारीची कारवाई केली जाईल असा गुन्हेगारांना थेट इशारा दिला. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी अशा प्रकारची पहिल्यांदाच कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी ही स्वागत केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.