
० किल्ले रायगडवरील कुत्र्याच्या समाधीवरून वाद होणार
० युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी कुत्र्याची समाधी हटवण्या बाबत मुख्यमंत्र्यांना दिल पत्र
० 31 मे पूर्वी हि कुत्र्याची समाधी आणि पुतळा हटवण्याची केली आहे विनंती
० कुत्र्याच्या समाधीचा कपोलकल्पित असल्याचा उल्लेख करीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचे संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे
- दौंड नगरपालिकेच्या कचरा डेपोला आग
- मागील २४ तासापासुन आग धुमसत आहे
- आग विझवण्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप
- आगीचे कारण स्पष्ट नाही. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून दैंड पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार
- धुरामुळे आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना त्रास
लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात टोळक्याकडून दोन तरुणांना बेदम दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. उदगीरवरून गावाकडे जाणाऱ्या दोन तरुणांना टवाळखोर टोळक यांनी अडवत दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ आता समोर आलाय. दरम्यान या मारहाणीत संगम बिराजदार आणि कृष्णा कनकुरे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देऊळगावमही येथे आज सकाळच्या सुमारास बाजापेठेतील दुकानांना अचानक आग लागली . .ही आग वाढत गेल्याने पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी येण्यास उशीर झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी ही आग टँकरणे पाणी आणून विझवली आहे. तोपर्यंत पाच दुकाने जळून खाक झाली होती. यामुळे चिते व्यासायिकांचे लाखो रुप्याचे नुकसान झाले आहे आहे. या आग विझवताना दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून जालना येथील रुग्णाल्यात हलविण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शेतकऱ्यांची दिशाभूल करून कमी भावाने कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे पणन वशिष्ठाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल व्यापाऱ्यांनी करू नये असे देखील मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केली असून याबाबत शासनाने जीआर देखील जारी केला आहे.
यादरम्यान आता शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे.
- देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गळ्यात भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार
- ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
- शहर विकास तसेच कुंभमेळा संबंधित बैठकांत सर्वपक्षांच्या सदस्यांना सामील करून घ्यावे, यासाठी दिले निवेदन
- नाशिक शहरातील विकास कामे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे गटाने दिला होता फडणवीस यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा
- मात्र पोलिसांच्या मदतीने फडणवीसांची भेट घेतल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती
- आंदोलन न करता भेट घेऊन निवेदन दिले
- मागणी मान्य न केल्यास सर्वसामान्य जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा
पुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व १ लाख २५५ व तडजोडचे ३८ हजार ५७० असे एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली काढण्यात आले आहेत.
लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ८ हजार ८१९, तडजोड पात्र फौजदारी ३१ हजार ५३७, वीज देयक ३२९, कामगार विवाद खटले १८, भुसंपादन १११, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १६३, वैवाहिक विवाद ७४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ९९४, इतर दिवाणी ५१४, इतर २ हजार ६७३, महसूल ७ हजार ७३१, पाणी कर ८४ हजार ८६०, ग्राहक वादविवाद २ अशी एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली. त्यांनी कुशावर्त येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या सिमेंटच्या बकलर ट्रकने टॅंकरने एर्टिगा कारला जोरदार धडक दिली.त्यानंतर बकलर याच ठािकाणी नादुरुस्त असलेल्या ट्रकवर आदळला आणि ट्रक जवळपास 200 फुट खाली खोल दरीत कोसळला.त्यानंतर सिमेंट बकलर देखील खोल दरीत कोसळला या अपघातात एर्टीगा कारमधील पाच प्रवासी जखमी झाले तर बकलर मधील ड्रायव्हर सह क्लीनर देखील जखमी झालाय.या महामार्गावरील भोस्ते घाटातील या विचित्र अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. भोस्ते घाट हा अपघातांना कारणीभूत ठरतोय..या घाटात वारंवार अपघात होत आहे त्यामुळे हा घाट धोकादायक बनलाय. गेल्या चार दिवसातील हा चौथा भीषण अपघात आहे.
रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळची ही घटना आहे. पल्लवी सरोदे असं या महिलेचे नाव असून ती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची स्वीय सहाय्यक असल्याची माहिती मिळतेय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील 9 महिलांचा ग्रुप हरिहरेश्वर इथं फिरायला आला होता. सकाळी समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने पल्लवी सरोदे बुडाल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना बाहेर काढून प्रथमोपचार केले परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आले.
उल्हासनगरात घराबाहेर उभी असलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. कॅम्प ४ मधील ओटी सेक्शनमध्ये हा प्रकार घडला.
औरंगजेबाच्या संदर्भाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.सध्या बीडचे सायबर पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत.त्यातच त्याना ही पोस्ट दिसून आली.त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही आरोपी पैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर करत आहोत.तसेच समाज माध्यमावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये, तसेच पालकांनी देखील पाल्यावर लक्ष ठेवावे असे आवाहन परळी पोलिसांनी केले आहे.
रत्नागिरी- ओव्हर हेड वायर तूटल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी देखील विलंबानं
अनेक गाड्या चार ते पाच तास उशिरा
कोकण कन्या पाच तास उशिरा, तुतारी एक्सप्रेस एक तास उशिरा, वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उशिरा, तेजस एक्सप्रेस अर्धा तास उशिरा, केरळा संपर्क क्रांति एक्सप्रेस अर्धा तास उशिरा
तर रत्नागिरीहून मुंबईला जाणारी रत्नागिरी दिवा गाडी एक तास उशिरा, मंगला एक्सप्रेस सव्वा तास उशिरा, नेत्रावती एक्सप्रेस सुद्धा सव्वा तास उशिराने
काल राजापूर जवळच्या आडवली इथं ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक झाली होती विस्कळीत
कालच्या प्रकाराने 11 गाड्या रेल्वे गाड्या धावत होत्या विलंबाने
आज देखील जवळपास नऊ गाड्या विलंबाने
होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवाशांमधून नाराजीचे सूर
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीला सुरुवात
- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित
- नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतांना पार पडत आहे, आगामी कुंभमेळ्याची आढावा बैठक
- बैठकीआधी मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन केल्यानंतर शाही मिरवणूक मार्ग आणि कुशावर्ताची केली पाहणी
जागतिक वन दिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वनविभागाच्या वतीने "रन फॉर फॉरेस्ट 1.0" या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये 600 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या धावपटूंना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी स्पर्धकाना 1000 आंब्याची झाडे सुद्धा वितरित करण्यात आली
सोलापूर - अक्कलकोट महामार्गारील हॉटेल वळसंग वाडा जवळ झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर पाच जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
MH 05 FB 4593 क्रमांकाच्या भरधाव वेगातील ईरटीगा कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही कार समोर उभ्या असलेल्या MH 13 CU 6703 क्रमांकाच्या छोटा हत्ती टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झालीय तर पाच जन जखमी झाले आहेत.
यवतमाळच्या वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील सोनुर्ली फाटा येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अविनाश बाळू कनाके (28) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रकाश मलांडे असे गंभीर जखमीचे नाव आहे. सोनुर्ली येथील दोन तरुण अविनाश व प्रकाश हे आपल्या दुचाकीने करंजीच्या दिशेने जात होते.दरम्यान सोनुर्ली फाट्यावर नागपूरकडून हैदराबाद कडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अविनाश बाळू कनाके हा जागीच ठार झाला, तर सहकारी जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता.
हिंगोली जिल्हा खुनाच्या घटनेने हादरला आहे, 48 तासात हिंगोली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत, हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या येळी परिसरात फिरोज पठाण नावाच्या 18 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे तर तिकडे बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दाती शिवारात 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा धारधार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने खून केला आहे दरम्यान हिंगोली पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली असून, पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळाची पाहणी करत होते.
लातूरच्या निलंगा शहरात अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या कुंटण खाण्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे... या कारवाईत तीन महिलांसह एकाला ताब्यात घेण्यात आल आहे.. निलंगा शहरातल्या लॉजवर आणि काही भागात मागच्या काही दिवसापासून अवैधरित्या पैशाचे अमिष देऊन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, दरम्यान याच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे....
नागपुरात झालेल्या राड्यानंतर संचारबंदी लावण्यात आली होती त्यात पाच भागातील कर्फ्यु उठवण्यात आला तर काही ठिकाणी कायम ठेवण्यात आला आहे....
रात्री सात वाजता पासून परिमंडळ तीन मधील पोलीस ठाणे पाचपावली शांतीनगर लकडगंज त्याचप्रमाणे परिमंडळ चार मधील पोलीस ठाणे सक्करदरा आणि इमामवाडा या परिसरातील संचारबंदी पूर्णता उठविण्यात येत आहे
तर परिमंडळ 3 मधील पोलीस ठाणे कोतवाली तहसील गणेश पेठ येथील संचारबंदी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजता पर्यंत शितलता देण्यात आली आहे मात्र रात्री दहा वाजता पासून पुढे संचारबंदी पूर्ववत अमलात राहील
परिमंडळ पाच मधील यशोधरा नगर येथील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जैसे थे असणार आहे....
खेड तालुक्यातील जरेवाडी येथे सरपंच केसरी भारत बैलाचं निधन झालं यावेळी बैलाची शेवटचे विधी माणसांप्रमाणे केल्याचे पहायला मिळाले आज जरे कुटुंबीयांनी लाडक्या भारत बैलाचा दशक्रिया विधी घातलाय, बैलगाडा शर्यतीचे अनेक घाट या भारत बैलाने गाजवले असल्याने आपल्या कुटुंबातील सदस्य हरपल्याने जरे कुटुंबियांनी एखाद्या मनुष्यप्रमाणे लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी घातलाय.
देवळाली-भुसावळ व भुसावळ-देवळाली ही मेमू गाडी आज पासून चार दिवस म्हणजेच २३ ते २६ तारखे पर्यंत रेल्वेच्या कामानिमित्त रद्द करण्यात आली आहे.मेमू रद्द झाल्याने लहान स्थानकांवरील प्रवाशांचे मात्र हाल होणार आहे.
विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा, उष्माघाताची लाट काहीशी ओसरली
विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा मध्ये ३७ - ३९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा तापमानात अंशतः घट
बीड, परभणी, सांगली, सातारा, नाशिक मध्ये सुद्धा तापमानाची घसरण
पुण्यात रविवारी ३६ डिग्री तापमानाची नोंद
रविवारी मुंबईत ३२ डिग्री सेलिसिअस इतक्या तापमानाची नोंद
पुणे नगर महामार्गावरील वाहतुककोंडीच्या समस्येमुळे प्रवाशांची दमछाक होत असताना हि वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांचीही चांगलीच दमछाक होत असताना पोलीसांनी चक्क वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भोंग्यांच्या आवाजाचा वापर सुरु केलाय
शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक बुद्रुक येथे आई आणि सावत्र मुलांमध्ये जमिनीचा वाद होता हा वाद टोकाला जाणार यासाठी आईने मुलाविरूद्ध शेतात बाऊंसर उतरल्याचा प्रकार पहायला मिळाला यावेळी जमिनीच्या वादवरुन परस्पर विरोधी तक्रारी नंतर शिक्रापुर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून बाऊँसर सह २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना शिक्रापुर पोलिसांनी अटक केली आहे.
भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील प्रथम क्रमांकाचा नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरी दिल्ली यांचा या वर्षांतील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला असून सातव्यांदा हा पुरस्कार भिमाशंकर कारखान्याला मिळाला आहे, हाच आनंद साजरा करत कारखाना परिसरात संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.
भेदा हॉस्पिटलचे ट्रकने लोखंडी गेट तोडले
रात्री साडेबारा वाजता घडला अपघात
पार्किंगला असलेल्या दोन दुचाकींचे नुकसान
अपघातानंतर ट्रक चालक फरार
सिमेंट घेऊन जाणारा ट्रकचा अपघात
पोलिसांनी घटनास्थळावरील लोकांना हटकले
ट्रक अद्याप घटनास्थळी उभा
अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी
दुसऱ्या एका ट्रकलाही पाठीमागून ट्रकने धडक दिली
वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावर लोणी गावाजवळ कारने ट्रॅव्हल्सला धडक देत अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील दोन जन गंभीर जखमी झाले तर एक जन किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात एका वळणावर झाला असून वळण पास करत असतांना दोन्ही गाड्या एकमेकाला धडकल्या. या धडकेत कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. ट्रॅव्हल्स पुण्यावरून रिसोड कडे येत होती. तर कार रिसोड वरून लोणार कडे जात होती. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचे स्पष्ट
१९ हजार घरांच्या विक्रीतील ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण निम्म्याहून अधिक
नाइट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील मालमत्ता क्षेत्राचा फेब्रुवारी महिन्याचा अहवाल जाहीर
एकूण १९ हजार १२ घरांची विक्रीमधून सरकारला ७१२ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क
एकूण विक्रीत २५ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण २२ टक्के आणि २५ ते ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ३० टक्के
पुण्यात ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण ३२ टक्के
- त्र्यंबकेश्वरला जाऊन घेणार दर्शन, कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात त्रंबकेश्वरमध्ये करणार पाहणी
- त्र्यंबकेश्वरमध्ये काही स्थानिकांशी चर्चा देखील करणार असल्याची माहिती
- नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची घेणार आढावा बैठक
- मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये
- नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष
- कालच रात्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये झाले आहेत दाखल
पुणे शहराचे उपनगरा मधील डोंगररांगात वणवेच वणवे
वाढत्या उन्हामुळे जंगल पेटत असताना वनविभाग कधी कारवाई करणार यावर प्रश्न
मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे डोंगर रांगात भडकणार वणवा हे उन्हाळ्यातील हे चित्र नित्याचे
मात्र प्रशासन हतबल असल्याचे वारंवार लागणाऱ्या यामुळे स्पष्ट होत आहे
पुणे शहरातील कात्रज भागातील दोन्ही बोगद्यांचा मध्यभाग, तळजाई टेकडी तसेच पाषाण टेकडी या ठिकाणी अनेक घटना समोर
सांगलीच्या मिरजेमध्ये रोजा निमित्ताने इफ्तार पार्टी पार पडली.हिंदू-मुस्लिम युवा मंच आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने या इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम धर्मीयांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील उपवास निमित्ताने मुस्लिम बांधवांच्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.या प्रसंगी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, आमदार इद्रिस नायकवडी,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह शासकीय अधिकारी व हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकमेकांना खजूर भरवून यावेळी मुस्लिम बांधवांनी आपला उपवास सोडला. समाजामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.
लांज्यातील बेनी येथील बाबू गांधी यांच्या गवताच्या वरंडीला भीषण आग लागलीय.शेतकरी बाबू गांधी यांनी साठवणूक करून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्याला ही भीषण आग लागलीय.आग विजविण्यासाठी यंत्रना उपलब्ध नसल्याने नुकसान झालय.लांजा तालुक्यात आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. लांजा नगरपंचायत कडे अग्निशमन बंब नाही त्यामुळे भीषण आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होत आहे.
कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा,या उद्देशाने सांगलीमध्ये कथक नृत्याविष्कार कार्यक्रम पार पडला.जागतिक कीर्तीच्या कथक नृत्यांगना निधी प्रभू यांनी या निमित्ताने आपली कथक नृत्यकला सादर केली.या कथक उत्सवाचा उद्घाटन लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्षव ग्रीन एफएम रेडिओ चॅनलचे सीईओ राजीव पाटील,शांतिनेकेतन लोक विद्यापीठाचे संचालक गौतम पाटील,आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पत्नी मंजिरीताई गाडगीळ यांच्या उपस्थितीत नटराज पूजनाने झाले. त्यानंतर नृत्यांगना निधी प्रभू यांनी वेगवेगळ्या रागांवर कथक नृत्याच्या वेगवेगळे नृत्याविष्कार सादर केले,तेज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्यवतींने विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेले कथक नृत्याविष्कार पाहण्यासाठी सांगलीतर रसिकप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर अखेर भगवान कोकरे महाराज यांनी अखेर उपोषण सोडलंय.लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी गोशाळा संस्थापक भगवान कोकरे महाराज यांनी 17 मार्चपासून उपोषण सुरु केलं होतं. कोकरे महाराज यांच्या मागण्यांसंदर्भात पुढच्या 8 दिवसांत अधिकारी आणि कोकरे महाराजांसमवेत बैठक घेतील.कोकरे महाराजांची तब्येत आमच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलय.माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागे घेतलं आहे, त्याचा पाश्चाताप त्यांना होणार नाही, हा माझा त्यांना शब्द आहे
आणि परिसरामध्ये वन्यप्राण्यांनी धुमाकुळ घातला असून उन्हाळी कांदा पिकासह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जालन्यातील वरुड आणि परिसरात वन्यप्राणी निलगाय, हरिण या वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून यामुळे शेतकऱ्यांच्या बीज कांदा, गहू या पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान या वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करत आहे.
- काटोल येथील 23 वर्षीय युवकांनी इंस्टाग्राम आयडीवरून औरंगजेबबाबत धार्मिक भावना दुखावतील तसेच जातीय तेढ निर्माण होईल असं स्टोरी स्टेटस ठेवण महाग पडले..
- नागपूर ग्रामीण पोलीस यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याचा मोबाईल जप्त केला आहे
- दिव्यम सुरेश सिंग बैस अस गुन्हा दाखल तरुणाचे नाव आहे
- नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकारांमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू आहे.
- त्यामुळे जातीय ते निर्माण होईल अशा पद्धतीचे व्हिडिओ पोस्ट केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ऑपरेशन@ 100 ही विशेष मोहीम आता पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण दिन, पोलिस ठाण्याची स्वच्छता, बेवारस वाहनांचा लिलाव, पासपोर्ट चारित्र्य पडताळणी अर्जाची 14 दिवसांच्या आत निर्गती, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना सुरक्षिततेची हमी, पोलिस ठाण्यांसाठी आयएओ नामांकन प्रक्रिया, संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, असे उपक्रम ऑपरेशन @ 100 च्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत
हे मुख्य उपक्रम पुणे पोलीस ऑपरेशनच्या अंडर शहरात राबवणार
- 30 हजार गुन्हेगारांचा डेटा एकत्र
- पासपोर्ट अर्जाची 14 दिवसांत निर्गती
- जुन्या कागदपत्रांचे वर्गीकरण करून निपटारा
- बेवारस वाहनांची लीलाव प्रक्रिया
- उद्योजक, गुंतवणूकदारांना त्रास देणार्यांचा बंदोबस्त
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी एकूण ५६६ कोटी रुपये जमेचा आणि तब्बल ६४८ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात एकूण ८२ कोटी रुपयांची तुट दर्शविली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे. यंदा चार शिष्यवृत्ती योजनांमधील तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली असून संशोधन आणि गुणवत्ता, विद्यार्थी विकास, विद्यार्थी वसतिगृह यांसाठी भरीव तरतुद केल्याचे दिसून येते.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नागरिकांना आश्वासन
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांची कर, पाणी यासह अन्य विषयांवर मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याची उद्या सामंत यांची माहिती
३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे. मात्र, त्यातुलनेत ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुद्ध पाणीपुरवठा महापालिका करत असल्याचा आरोप या गावातील नागरिकांकडून करण्यात येत होता
आता या सगळ्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक पार पडणार आहे
वारजे येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीचे काम करण्यात येणार असून यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा होणार विस्कळीत
वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, शिवाजीनगर, खडकी व कर्वेनगर परिसरातील पाणी पुरवठा आज दिवसभर होणार विस्कळीत
शनिवारी रात्री फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सुरू केले आहे, हे काम रविवारी सकाळपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे फेज क्रमांक २ ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे
संबंधित कामामुळे रविवारी दिवसभर वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, शिवाजीनगर, खडकी व कर्वेनगर या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे
अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समीतीकडे
लवकरच मान्यता मिळणार:तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहीती
तुळजाभवानी मंदीराचा १८६६ कोटींचा परिपूर्ण अंतिम प्रारूप विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
तिर्थक्षेञ विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप,श्री तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना तलवार देतानाचा १०८ फुटाचा फुतळा,घाटशिळ,भक्तनिवास,प्रसादालय,भोजनालय यासह इतर बाबींचा समावेश
मावळ आणि मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेची बनलेली संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्व पक्ष्यांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्रित आले. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडेल यावर सर्वपक्षीय नेत्यांनी होकार दिला. मात्र संचालक मंडळात नवे चेहऱ्यांना संधी देण्याच्या मागणीमुळे या निवडणुकीत नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे. यामध्ये कोणत्या संचालकाचा पत्ता कट होईल याकडे सर्व सदस्यांच्या नजरा लागलेल्या आहे....
अकोल्यात एका सायकलच्या दुकानातून 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीचे दुकानात खदान पोलिसांनी ही कारवाई केलीय.. यावेळी त्यांनी 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. संबंधिताला या रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी नागपूर येथील आयकर विभागाला याबाबत माहिती दिली आहे. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ही कारवाई करण्यात आली. दीपक घुगे नामक व्यक्तीजवळ पांढरे रंगाच्या दोन कापडी पिशव्या होत्या. त्यामध्ये 500 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल होते.
आधी शेतमाल नव्हता तर भाव होता, आता शेतमाल आहेत तर टोमॅटोला भाव नाही..
25 एकरात लागवड केला टोमॅटो... मात्र, अडीच रुपयांपासून किलोमागे मिळतो टोमॅटोला भाव. ट्रान्सपोर्टसाठी घरातून मोजावे लागतात पैसे.
अकोल्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत.
अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर येथील संजय येऊल या शेतकऱ्याला देखील मोठा आर्थिक फटका बसलाय.. संजयने जवळपास 25 एकरात मोठा टोमॉटोचा प्लांट उभा केलाय.. मात्र त्यांच्या टोमॉटोला केवळ अडीच रुपयांपासून भाव मिळतो आहे. मागील हंगामात 800 ते 900 रुपययांपर्यंत टोमॅटोला भाव मिळाला होता.. तर यंदा 80 ते 90 रूपांपर्यंत कॅरेटनुसार टोमॅटोला भाव मिळतो आहे.. एकंदरीत गेल्या काळात शेतमाल माल नव्हता तर टोमॅटोला भाव होता, आता शेतमाल आहे मात्र भाव नाही.. अशी परिस्थिती या शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे संजय यांना लागणारा खर्चही देखील निघणं कठीण झालंय.. टोमॅटोच्या ट्रान्सपोर्टसाठी घरातून पैसे त्यांना मोजावे लागतात.. . याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी.
अकोल्यातल्या मूर्तिजापुरात काश्मिरा मेडिकल शॉपमध्ये शटर तोडून चोरी झाली होती. हा संपूर्ण प्रकार झाला होता.. चोरी करणाऱ्या चोरट्यास 12 तासांत पोलिसांनी जेरबंद केलं होतंय.. त्याच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. मेडिकल शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 12 हजार रुपये, चेक बुक व एक मोबाइल असा मुद्देमाल चोरी करतांना संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. याप्रकरणी केवळ 12 तासांत चोरट्याला अटक केली असून सतिश कोलते असं या चोरट्याचं नाव आहे..
जिल्हा व सत्र न्यायालयातील राष्ट्रीय आदालत मध्ये गुन्हे मागे घेण्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार गुन्हे काढण्यात आले निकाली
मराठा आंदोलनाच्या वेळी, बेकायदेशीर जमाव जमवणे,शासकीय कामात अडथळा आणणे,प्राण्याचा अमानुष छळ करणे टायर जाळणे,रास्ता रोको करणे, या प्रकारचे गुन्हे निकाली
गृह विभागाच्या आदेशानुसार आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेउन सर्वांची निर्दोष मुक्तता
मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यातील आंदोलकावरील गुन्हे निकाली काढल्याने आंदोलकांना मोठा दिलासा
ॲड.विश्वजीत शिंदे आणि ॲड.भाग्यश्री रणखांब यांनी आंदोलक आरोपीच्या वतीने काम पाहिले
न्यायमूर्ती सोनाली निंबाळकर यांनी सदरील लोक अदालतीमध्ये हे प्रकरण निकाली काढले
विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हृदय रुग्णांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संत अच्युत महाराज चॅरिटेबल हार्ट हॉस्पिटलच्या तिसऱ्या कॅथ लॅब चे व आठ मजली सुसज्ज इमारतीचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आतापर्यंत या रुग्णालयाने ना नफा ना तोटा तत्त्वावर 65 हजार हृदय रोग्यावर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत यात शेकडो रुग्णांच्या तर अगदी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसआर फंडातून सात कोटी रुपये या रुग्णालयाला दिले यात ही सुसज्ज इमारत व त्याधुनिक मशीन्स आणण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात देखील अशाच प्रकारे सेवाभावी वृत्तीने हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांना दिलासा देईल अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा तांडा या गावाच्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. परंतु या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांना न सांगता सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप या शेतकऱ्यांनी केला. या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास आठ हेक्टरहुन अधिक जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम देखील सुरू करण्यात येत होते. परंतु हे सुरु झालेलं काम स्थानिक शेतकऱ्यांनी हाणून पाडलं. शेतकऱ्यांना कुठल्याही सूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर हा प्रकल्प लादण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आमच्या जमिनीवर हा सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.
वीजवाहक तारांची चोरी करणाऱ्या सक्रिय टोळीला एलसीबी पथकाने अटक केली असून हिवरी येथे अल्युमिनिअम तार चोरट्यांनी लपून ठेवली आहे.अशी माहिती एलसीबी पथकाला मिळाली त्यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता एका घरात तार आढळून आली.या दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली असून शेख सादिक,शेख मैहम्मद आणि संतोष येडमे असे तार चोरणाऱ्या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.तीन लाख 91 हजार आठशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
आज दिवस भर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे विविध कार्यक्रम.
सकाळी 10 वाजून 15 मिनिटाला नांदेडच्या विमानतळावर होणार अजित पवार यांचे आगमन.
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी अजित पवार लावणार हजेरी.
सायंकाळी चार वाजता नांदेड परभणी हिंगोली लातूर या चार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत नांदेड शहरात घेणार बैठक.
सायंकाळी साडेसहा वाजता नांदेड शहरातील हैदर गार्डन येथे पवार इफ्तार पार्टीलात होणार सहभागी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.