Maharashtra Live News Update : कल्याणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक २२ जून २०२५, आषाढी वारी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, घाटमाध्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

कल्याणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

कल्याणमध्ये ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. घनकचरा करवाढी विरोधात 9 जून रोजी केडीएमसी मुख्यालयावर ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केडीएमसीचा गेट ढकलत केडीएमसी मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी केली होती. 

माथेरान घाटात वाहन हेलकावे खात खोल दरीत कोसळले; पर्यटक बालबाल बचावले

माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या अर्टिका कारला भीषण अपघात घडला.दरम्यान या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैवबलवत्तर म्हणून यातील सात प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.घाटातील पीटकर पॉईंट येथील अवघड वळणार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याची सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस म्हणजेच रस्ता आणि खोल दरीच्या मध्ये हेलकावे खात अडकून राहिले.

संभाजीनगरमध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी परिसरातील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या वतीने हटवण्यात आली होती. त्याला त्या परिसरातील नागरिकांचा विरोध होता. पोलिसांच्या बंदोबस्ताखाली अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण करण्यात आली. मात्र तिथल्या नागरिकांचा असंतोष अजूनही सुरूच आहे. आज सायंकाळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न जमलेल्या लोकांनी केला.

सायंकाळी माजी खासदार यांच्या परिसरातील नागरिकांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळेस नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आपली भूमिका मांडली. मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याच वेळेस जालना रस्त्यावरून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ कडे जात असताना जमलेले लोक रस्त्यावर आले. काही वेळ जमलेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी जमावाला बाजूला केल्यानंतर हरिभाऊ बागडे हे पुढे निघून गेले

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शांततेत पार

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शांततेत पार पडली उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्गातून निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आज निवडणूक शांततेत पार पडली असून 90 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी 24 जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांचा राजीनामा.लोकसभेचे तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही. जालना लोकसभा आपल्या कडे येणार नाही याची काळजी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व पत्करलेले अंबादास दानवे यांनी घेतल्याचा आरोप.

माळेगाव सहकारी साखर कारखाना मतदान टक्केवारी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ वर्गाची ८८ .४८ टक्के मतदान झाले असून यामध्ये १२ हजार ८६२ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तर ४ हजार ४३४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.१९ हजार ५४९ पैकी एकूण १७ हजार २९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय... तर ब प्रवर्गात ९९.०२ टक्के मतदान झाले आहे. १०२ मतदारांनीपैकी यामध्ये ९९ पुरुष आणि २ स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

सुप्रिया सुळे वारीमध्ये सहभागी

सुप्रिया सुळे वडकी ते दिवे घाट पायी चालणार

माळेगाव सहकारी साखर कारखाना मतदान टक्केवारी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अ वर्गाची ८४ .८२ टक्के मतदान झाले असून यामध्ये १२ हजार २२९ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तर ४ हजार २९४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.१९ हजार ५४९ पैकी एकूण १६ हजार ५२३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय... तर ब प्रवर्गात ९९.०२ टक्के मतदान झाले आहे. १०२ मतदारांनीपैकी

यामध्ये ९९ पुरुष आणि २ स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

अद्याप एक तासाची आकडेवारी अंतिम येणे बाकी आहे.

पावसाने उसंत घेतल्याने धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी

रायगडमध्ये आज पावसाने उसंत घेतली असून चांगल ऊन पडल आहे. या अल्हाददायक वातावरणात धबधबे पर्यटकांना भुरळ घालत असून आज रायगडमध्ये धबधब्यांवर गर्दी पहायला मिळाली.

शिवसेना फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते - गुलाबराव पाटील

शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी म्हटले होते शिवसेना फुटली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते मात्र त्यांना त्यावेळेस 35 ते 36 आमदारांनी विरोध केला यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हटले .शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता मात्र ते त्यावेळेस थांबले संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे

शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावं हीच पांडुरंगाकडे प्रार्थना - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे वारी मध्ये सहभागी

सुप्रिया सुळे वडकी ते दिवे घाट पायी चालणार

वडकी येथील विसावा मंदिरात सुप्रिया सुळे पोहचल्या

भाजपमध्ये जाणार नाही, एकनाथ खडसे यांचा पुनरूच्चार

मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपमध्ये परत जाण्याच्या चर्चेला मी पूर्णविराम दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये समाधानी आहे, असं विधान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.

एकनाथ खडसे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपमध्ये जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला.‌

मी मंत्री असताना गिरीश महाजन हा माझा कार्यकर्ता होतो. मी मंत्री मंडळातून बाहेर पडल्यानंतर गिरीष महाजन यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले. आमच्या जिल्ह्याला त्यांच्या निमित्ताने प्रतिनिधित्व मिळाले ही चांगली बाब आहे.

रत्नागिरीतील भाट्ये खाडीत बोटीला लागली आग

रत्नागिरीतील भाट्ये खाडीत किना-यावर नांगर टाकून ठेवलेल्या दोन बोटी जळून खाक झाल्यात सध्या कोकणात पावसाळा सुरू असून समुद्रातील मासे मारी बंद आहे त्यामुळे समुद्रातील खाडीत किनाऱ्यालगत बोटी नांगर टाकून बांधून ठेवण्यात येत असतात अश्याच ठेवलेल्या बोटी पैकी एका बोटीला अचानकपने आग लागली ह्या आगीने रौद्ररूप धारण केले व शेजारी असलेल्या बोटीने देखील पेट घेतला त्यामुळे दोन्ही बोटी आगीत जळून खाक झाल्यात .या आगीत कोणतेही जीवीतहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांच नुकसान झालय.आग नेमकी कशामुळे लागली याबाबत मात्र अस्पष्टता आहे.

संत निवृत्तीनाथ पालखी अहिल्यानगर शहरात दाखल..पालखीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत..

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी मजल दरमजल करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.आज या पालखीने अहिल्यानगर शहरात प्रवेश केला असून ही दिंडी नगर शहरात दोन दिवस मुक्कामी असते. नगर शहराच्या प्रवेशद्वारावर या दिंडीचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. शेकडो वारकऱ्यांची भाविकांनी सेवा केली चहा नाष्टा आणि फळ देऊन नगर शहरात या दिंडीचे स्वागत करण्यात आले.

राऊतवाडी धबधब्यात पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला

राऊतवाडी धबधब्यात पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला.

धबधब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवले.

धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून प्रवाहातून गेला होता वाहून.

राधानगरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याचा प्रवाह सुद्धा वाढला.

तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट

तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट

मुंबई बँकेच्या संचालक पदी निवड झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी प्रथमच घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसापूर्वी शिवसेना विभागीय पदाचा दिला होता राजीनामा.

पती अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून तेजस्वी घोसाळकर यांची झाली निवड

तेजस्वी घोसाळकर हिने काल पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत कायम असल्याचे केले होते जाहीर.

रस्त्यावर उभ्या असलेल्या किया कंपनीच्या कारला भीषण आग

नांदेड जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल रात्री नांदेड हैदराबाद महामार्गावर सुपारी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली होती. आज पुन्हा नांदेड शहरातील नारायणा हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कारला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात लोकांची निर्सगरम्य ठिकाणाला पसंती 

उत्तर पुणे जिल्ह्यात निसर्ग बहरला असताना अनेकांनी विकेंडचा आनंद धोकादायक ठिकाणांपासून दूर, सुरक्षित ठिकाणी साजरा केला. यावेळी लोकांनी निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक खेळ, नृत्य आणि गप्पागोष्टींमधून विकेंड खास साजरा केला.

काहींनी जुन्या आठवणी जागवत मैत्रीचं नातं नव्याने फुलवलं, तर काहींनी निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा अनुभव घेतला. महिलाही पुढे सरसावून विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे आजचा विकेंड हा निसर्गप्रेम आणि सुरक्षिततेचा सुंदर समतोल साधणारा ठरला.

अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली दीड लाख वृक्षबिजांची जैविक पद्धतीने लागवड

नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत कंधार तालुक्यातील चिखली गावातील परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड लाख वृक्षबिजांची जैविक पद्धतीने लागवड केली आहे, यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मुंबईच्या घाटकोपर विभागातील ऑर्किड टॉवर नंबर सहा मध्ये भीषण आग

घाटकोपरमधील ऑर्किड परिसरातील टॉवर क्रमांक ६ मधील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या चारहून अधिक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
दरम्यान, मुंबई पोलीस दलही घटनास्थळी उपस्थित असून मदत- बचाव कार्य सुरू आहे.

तापी नदीत पाण्याची वाढ; नंदुरबार जिल्ह्यातील २३ गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तापी नदी क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे जलपातळीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे प्रकाश बॅरेजचे दोन दरवाजे तब्बल २.५ मीटरने उघडण्यात आले असून, नदीपात्रात जोरदार पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.

भुशी धरण ओव्हर फ्लो, धरणावर वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी....

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला असून पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. गेले दोन दिवस झाले पावसाने समाधानकारक उघडीप घेतल्यामुळे आज लोणावळा शहरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यावर बसून भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता आला. तासंतास पर्यटक धरणाच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये बसून भिजण्याचा व वर्षभराचा आनंद घेत आहे. कुटुंबासह लोणावळा शहरांमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना आजचा दिवस पर्वणीच ठरला आहे. पालखी बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात असल्यामुळे त्याचा परिणाम लोणावळा पर्यटकांच्या बंदोबस्तावर देखील जाणवला

कॅफे मधील निर्जनस्थळी १३ युवक-युवतींना पोलिसांनी पकडले

अमरावती शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने शहरातील तीन कॅफेसह छत्री तलावलगतच्या निर्जनस्थळी धाडी घालून १३ युवक-युवतींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याविरूध्द कारवाई करून मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे शहरातील कॅफे चालकात चांगलीच खळबळ उडाली आहे. कॅफेमध्ये 200 रुपात 1 तास कॅबिन मध्ये तरुणांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात होती.

हिंदी भाषा सक्ती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

हिंदी भाषा सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

शासन पुरस्कृत भाषा अत्याचाराच्या विरोधात' न्यायालयात दाद मागावी लागेल- असीम सरोदे

महाराष्ट्राची व मराठी माणसांची फसवणूक करणे, हिंदी भाषा सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलणे आणि राज्यपालांनी कलम १६४ (३) नुसार दिलेल्या संविधानिक शपथेचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड. असीम सरोदे,ॲड.श्रीया आवले, ॲड. अरहंत धोत्रे व ॲड. रोहीत टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे.

तामिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला (हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या धोरणाला) विरोध करणारी याचिका केली आणि सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारचे ऐकून घेतले नाही. तामिळनाडू सरकारने हिंदी सक्तीला विरोध केला आणि तामिळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालायने फेटाळली असे ध्वनित करणारे वक्तव्य करणे हा खोटारडेपणा आहे व त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कारण तामिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला विरोध करणारी याचिका म्हणून केलेली नाही. तर तामिळनाडू सरकार त्रिभाषा धोरण राबवित नसल्याने त्यांना केंद्र सरकारच्या इतर योजनांचा निधी, आर्थिक मदत मिळत नाहीये असा त्या याचिकेचा विषय आहे.

Nashik: नाशिकच्या पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही : कोकाटे

नाशिकच्या बाबतीत फार विवाद नाहीत...

पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही...

मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल...

छगन भुजबळांचा दावा प्रबळ होत असल्याच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य...

हिंदी भाषा सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

हिंदी भाषा सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

एडवोकेट असीम सरोदे यांनी बजावली कायदेशीर नोटीस

नोटिसीला सात दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास कोर्टात धाव घेणार

महाराष्ट्र आणि मराठी माणसांची फसवणूक केल्याचा नोटिसीतून आरोप- असीम सरोदे

अमरावतीच्या मोझरी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल....

ज्यादा रकमेचे शिक्के मारून विकल्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियंत्रक महिलेने पास

जवळपास 1 लाख 5 हजार 460 रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण..

खोटे दस्तावेजद व खोटे शिक्के केले होते या वाहतूक नियंत्रक महिलेने तयार

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा कायमच...

- राज्यात मान्सून पावसाचा जोर असून जवळ जवळ ९५ टक्के महाराष्ट्र पाणीदार झाला आहे.

- विदर्भाला मात्र यंदाच्या पावसाने अद्याप हुलकावणी दिली आहे.

- विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा वाढत आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे ८० टक्के पेरण्या रखडल्या आहेत.

- ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची चिंता आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आले धरणे आंदोलन

धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणात एक महिना उलटून देखील अद्यापही कुठल्याही ठोस प्रकारची कारवाई पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली नसल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या वतीने लावत, या प्रकरणात मुख्य मासे गळाला लावण्यात यावेत आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे सेनेच्या वतीने धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले आहे,

विरारच्या अर्नाळा एसटी बसची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू पाच जण गंभीर

विरारच्या अर्नाळा एसटी बस डेपोतून शिर्डी कडे जाणाऱ्या एसटी बसने सकाळच्या सुमारास अर्नाळ्याच्या सोसायटी स्टॉप येथे रिक्षाला जोरदार धडक दिली.

या धडकेत कविता नितीन कोलगे या महिलेचा जागीच मृतू झाला आहे.

तर महिलारिक्षा चालक पूनम वरठे आणि प्रवाशी महिला कल्पना पाटील, ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मात्र यात दिनेश जैस्वाल, सोनू खान हे किरकोळ जखमी आहेत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बैठक घेणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालय असलेल्या हैदराबाद हाऊस मध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बैठक घेत आहे.

- या बैठकीला कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री हे चर्चा करणार आहे...

- या कुंभमेळासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर अनुषंगाने मोठ्या संख्येने भाविक हे त्रंबकेश्वरला येणार आहे.. त्या अनुषंगाने रस्त्याच्या विकासाच्या अनुषंगाने नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांसोबत ही बैठक असणार आहे.

कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटावर..

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत चढ उतार होत आहे. सांगलीच्या कृष्णाची पातळी ही 16 फुटावर आहे. जिल्ह्यात अधून मधून पडणारा पाऊस आणि कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णाच्या पातळीमध्ये कमी जास्त वाढ होत आहे. या पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळी ही 16 फुटावर आहे.

राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांची नाराजी

मालवण मधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आणि यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या

भीती मुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्ष टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधीकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे अशी मागणी सुद्धा वैभव नाईक यांनी केली आहे.

Supriya Sule: हुंडा मुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे- सुप्रिया सुळे

आपण काय पाहिजे हे पाहिले पाहिजे

काय करायचे विकास मेट्रो अन् रस्ते

लाडकी बहिण पैसे मिळाले चांगला आहे पण सामाजिक परिवर्तन झाले का महत्त्वाचा प्रश्न आहे, मी टीका करत नाही सरकारवर,पण महिलांच्या आयुष्यात काय बदल झाला मोठा यामुळे?

२१०० रुपये कधी देणार त्यांना वाटेल तेव्हा, जसे शेतकरी कर्जमाफीला म्हणतात वेळ येईल तेव्हा देऊ याला साडेचार वर्ष जातील त्यांची वेळ यायला

पुणे जिल्ह्यातील कल्याण गावात बिबट्याचे दर्शन

सिंहगड पायथ्यालगत व परिसरातील गावांत वावर वाढल्याने नागरिकांत घबराट

सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या कल्याण गावात शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या चे दर्शन

श्री करंजाई मातेच्या मंदिराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन

या भागासह सिंहगडाच्या परिसरातील गावांत सध्या सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येत आहे

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली

पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मध्ये

हडपसर मधील नागरिकांकडूनपाखीचे स्वागत आणि दर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम लोणी काळभोरमध्ये

Rajkot Fort: राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद

सिंधुदुर्गतील मालवण राजकोट किल्ला आज पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकतीच चौथर्‍याच्या बाजूची जमीन खचली होती.

चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला बंद ठेवण्यात आला आहे.

पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत रविवार २२ जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

आज सकाळपासून ढगाळ वातावरण शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप

जळगाव आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आता पावसाला सुरुवात झाली शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असून जून महिन्याचा 22 तारीख येऊनही आजपर्यंत पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून पेरणीला सुरुवात केली आहे मात्र अजूनही पाहिजे त्याप्रमाणे पाऊस झालेला नाही आज जो पाऊस होता तो एकदम हलक्या स्वरूपाचा असल्यामुळे थोडा का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पण जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकरी पेरणी करू शकेल

Baramati: सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी दाखल

बारामती -

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल .

८५ वर्षीय चंद्रराव तावरे चेअरमन पदाचे दावेदार

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात तावरेंचा पॅनल

सांगवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रा बजावणार मतदानाचा हक्क.

Pune News: पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजीत "यशस्विनी सन्मान सोहळा"

पुणे -

पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजीत "यशस्विनी सन्मान सोहळा"

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात यशस्विनी सन्मान सोहळ्याचं आयोजन

राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान

खासदार सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार महिलांचा सन्मान

लाईव्ह फ्रेम देतोय ११ वाजता कार्यक्रम सुरू होईल

Nashik News: नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात तरुणाची हत्या

नाशिक -

- म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात तरुणाची हत्या

- चामरलेण्याकडे जाणाऱ्या मार्गावर घटना

- अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातील तरुण

- पोलिस घटनास्थळी दाखल.

- मृतदेह ओळख पटविण्याचे काम सुरू

Bhandara News: वादळी वाऱ्यानं राईस मिलचे टीनपत्रे उडाल्यानं धान पोती भिजली

वादळी वाऱ्यानं राईस मिलचे टीनपत्रे उडाल्यानं धान पोती भिजली

काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला येथील राईस मिलवरील टिनपत्रे उडालीत.

यामुळं राईस मिलमध्ये मिलिंगसाठी आणलेले शेकडो धान पोती आणि मिलिंग झालेले तांदूळ भिजल्यानं यात शेतकरी आणि राईसमील मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.

Pune News: पुणे जिल्ह्यातील कल्याण गावात बिबट्याचे दर्शन

पुणे -

पुणे जिल्ह्यातील कल्याण गावात बिबट्याचे दर्शन

सिंहगड पायथ्यालगत व परिसरातील गावांत वावर वाढल्याने नागरिकांत घबराट

सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या कल्याण गावात शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या चे दर्शन

श्री करंजाई मातेच्या मंदिराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन

या भागासह सिंहगडाच्या परिसरातील गावांत सध्या सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येत आहे

Higoli News: हिंगोलीत पोलिसांकडून बोगस खत प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट

हिंगोलीत पोलिसांकडून बोगस खत प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट

प्रकृतीच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयात आरोपीला आलिशान खुर्चीवर बसवले

Pune News: संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली

पुणे -

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली

पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मध्ये

हडपसर मधील नागरिकांकडूनपाखीचे स्वागत आणि दर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम लोणी काळभोर मध्ये

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

आषाढी यात्रेच्या निमित्ताने आज पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या उपस्थितीत आज सकाळी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सुमारे साडेचार स्वयंसेवी आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर, वाखरी पालखी तळ,दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह पंढरपूर शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

व्यवसाय परवान्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांना मनपा कडून नोटीसा

लातूर महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून व्यवसाय परवान्यासाठी , ठरवून दिलेले शुल्क भरणा करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत.. तर या नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तर व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान या नव्या वसुलीवरून व्यापारी आणि मानपांना कर्मचाऱ्यांमध्ये वादंग होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे..

भंडाऱ्याच्या तुमसरात चोरट्यांनी सहा दुकानं फोडली, लाखोंचं नुकसान

भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील किराणा ओळीतील सहा दुकानं चोरट्यांनी मध्यरात्री फोडली.

ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

या दुकानफोडीत काही व्यापाऱ्यांची रोख रक्कम आणि किराणा साहित्य असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

तुमसर पोलीस आणि स्वान पथक आता अधिक तपास करीत आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर माऊलींच्या पालखीत सहभागी

रूपाली चाकणकरांनी पुणे ते दिवेघाट केली पायी वारी

यावेळी महिला आयोगाच्या माध्यमातून वारकऱ्यांना केलेल्या सुविधांचा रूपाली चाकणकरांनी घेतला आढावा

Mandangad: मंडणगड एसटी आगारात ५ नव्या एसटी बसेसचा ताफा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५ नव्या बस मंडणगड आगारात दाखल झाल्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या.नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे मंडणगड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे.या नव्या बसेसच्या समावेशामुळे स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.

किल्ले रामशेज संवर्धन मोहिमेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या खासदारांचा रात्रीचा मुक्काम शाळेत

नाशिक राज्यभर गड किल्ले मोहिमेच्या निमित्ताने गड संवर्धनासाठी निलेश लंके प्रतिष्ठान आणि मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध गड किल्ल्याची स्वच्छता मोहीम निलेश लंके यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येते. नाशिकच्या किल्ले रामशेज या ठिकाणी आज स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके भास्कर भगरे राजाभाऊ वाजे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या मोहिमेत सहभागी होणार आहेत. मोहिमेच्या निमित्ताने रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी एका शाळेत खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरे रात्रीचा मुक्काम शाळेत केला.

Navi Mumbai: केमिकल कंपनीवर तातडीने करावी करावी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी

नवी मुंबई शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे आपत्ती येऊ नये या दृष्टीने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई शहरामध्ये पाहणी केली

अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो तसं मँग्रोज याची छाटणी झाली की नाही या सर्व गोष्टी तपासण्याचे आदेश मंदा मात्रे यांनी पालिकेचे अधिकाऱ्यांना दिले

तसेच बोनकोडेइथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे याच पाईपलाईन मधून पाणी खाडीमध्ये सोडलं तर त्यामुळे मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय त्यामुळे या कंपनीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी  केली आहे

Pune News: पुण्यातून पालखी मार्गस्थ सोहळ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे मार्गस्थ..

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी सोहळ्याचे विठोबा मंदिर येथून मार्गस्थ झाली, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पालखी नाना पेठेतील श्री निवंडुगा विठोबा मंदिर येथून सकाळी मार्गस्थ झाली.

हा पालखी सोहळा नाना पेठ व भवानी पेठेतून सोलापूर रोड मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी हडपसर येथील गाडीतळ येथून दिवेघाट मार्गे सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.

तर संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहे.

दोन्ही पालखी सोहळ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये, यादृष्टीने आज पहाटेपासून पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे

Ashadhi Wari Palkhi: पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ

दोन दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालख्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ

माऊलींच्या पालखीसोबत दिव्याघाट पार करेपर्यंत पुणेकर गर्दी

ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वारकरी पालखीमध्ये तल्लीन

संत तुकाराम महाराज पालखीचा लोणी काळभोर येथे मुक्काम तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सासवडला मुक्काम

संत तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी हडपसर मध्ये विसावा घेणार तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिव्या घाटाचा अवघड टप्पा पार करणार

आज सकाळी या दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ..

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट मार्गे सासवड मध्ये मुक्कामी असणार

दुपारी ३ वाजता माऊलींची पालखी दिवे घाट सर करणार

२ दिवसांच्या पुणे शहरातील मुक्कामानंतर दोन्ही पालख्या आज सकाळी झाल्या मार्गस्थ

सांगलीच्या गावभागमध्ये पडक्या घरात आढळून आला मानवी सांगाडा

सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा आढळून आला आहे.गाव भाग मधील पाटील गल्ली, या ठिकाणी असणाऱ्या पडक्या चौगुले वाड्यात हा मानवी सांगाडा सापडला आहे.

या घटनेची माहिती मिळताचं शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र सदरचा मृतदेह हा कोणाचा आहे ? याची ओळख अद्याप कळू शकली नाही,

तर सदर घटना ही आत्महत्या की घातपात याबद्दल देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

शहर पोलिसांच्याकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

मात्र गावभाग या ठिकाणी आढळून आलेल्या मानवी सांगाड्याच्या प्रकारामुळे  खळबळ उडाली आहे.

मार्लेश्वर दर्शनासाठी आता ड्रेस कोड

कोकणातल्या प्रसिद्ध अशा देवस्थानी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलाय.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मार्लेश्वर ठिकाणी दर्शन घेताना आता विशिष्ट पेहराव करावा लागणार आहे.

पेहराव हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत असावा; मार्लेश्वर देवस्थानाचे भाविकांना आवाहन केलय.भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून मार्लेश्वरचे दर्शन घ्यावे असं देवस्थान समितीनं म्हटलय.

पावसाळ्यामध्ये दर्शनासाठी मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच खुलं राहणार आहे.

वार्षिक धार्मिक विधी आणि श्रावणी सोमवार निमित्त योग्य निर्णय घेऊन मंदिर अधिक वेळ खुलं राहणार आहे.

राज्यभरातून मार्लेश्वरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Maharashtra Live News: राष्ट्रवादीशी युती बाबत शिवसेनेत दोन मत प्रवाह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करण्याबाबत रायगडच्या शिवसेनेत दोन प्रवाह पहायला मिळतात.

तिन्ही पक्षाचे नेते जे ठरवतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी मांडली आहे.

मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्या भूमिकेला छेद दिला आहे. गोगावले यांची भूमिका पक्षाची भूमिका असू शकते.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवावीत अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला वेगळी व्यूहरचना करावी लागेल असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

मिलिपिड किडीचे कपाशी पिकावर संकट, वाणी वेचून शेताबाहेर फेकण्यासाठी लावले मजूर

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आठ दिवसांपूर्वी कपाशी पेरणी केली होती. पाण्याची सोय करून दोन वेळा पाणी दिलं, आणि पीक उगवू लागलं. पण आता मिलिपिड अर्थात वाणी किडीचा कपाशीवर जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतं असून ही कीड कपाशीची कोवळी झाडं कुर्तडून नष्ट करतेय त्यामुळं शेतकऱ्यांवर नवं संकट आलंय.

बेंबळा येथील शेतकरी संदीप काळेकर यांना थेट मजूर लावून वाणी वेचत शेताबाहेर फेकण्याचं कामं सुरु केलंय. ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन करावं,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा.

यशोमती ठाकूर मित्र मंडळ व शौर्य अकॅडमी मोझरी द्वारे आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे करण्यात आलं होतं, यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या, या मॅरेथॉन स्पर्धेत लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला, विजयी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल

महाडच्या बिरवाडी येथील स्मशानभूमीची दुरावस्था

रायगड जिल्ह्यातील श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या गाव लगत असलेल्या बिरवाडी गावच्या स्मशाण भुमीची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांना अंत्यविधी, उत्तर कार्य पावसात भिजत करण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी स्वच्छता देखील नसल्याने ग्रामस्थांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. 2021 च्या महापुरात या स्मशाण भुमीची पडझड झाली होती. मात्र अद्यप त्याची दुरुस्ती झाली नाही. बिरवाडी ग्रामपंचायतवर शिवसेनेची एक हाती सत्ता असून सुद्धा सत्ताधाऱ्यांना या ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अपयश का येतो असा सवाल बिरवाडी मधील ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी करत आहेत

Maharashtra Live News : उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात लागले शिवसेनेचे बॅनर

ते भाषणात व्यस्त आम्ही कामात व्यस्त

शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लावली फ्लेक्स

उद्धव ठाकरे च्या हातात एक सिलेंडर दिलेला आहे आणि त्यावरती कमांड किल्मी असलेत उद्धव ठाकरेंवरती टीका

Godavari River: सलग चौथ्या दिवशी गोदावरी नदीला पूर

नाशिकच्या गोदावरी नदीत सलग चौथ्या दिवशी देखील पूर परिस्थिती आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे

त्यामुळे गोदावरी नदी काठी नागरिकांना सतर्केशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलं आहे

काल गंगापूर धरणातून 38 किवसेस इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे

Yavatmal: यवतमाळात वाढणार दोन नगरसेवक,  29 प्रभागात असणार 57 नगरसेवक

यवतमाळ नगरपालिकेचा प्रारूप नगररचना आराखडा तयार झालाय 2011 च्या जनगणनेनुसार यवतमाळ शहराची लोकसंख्या दोन लाख 48 हजार 939 आहे शहरात एक प्रभाग वाढला असून सदस्य संख्या 58 होणार आहे महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने 29 जागा महिलांकरिता राखीव असणार आहे आगामी निवडणुकांसाठी प्रशासन कामाला लागले आहे.

Maharashtra Politics: भाजपचे बंडखोर दिलीप भोईर शिवसेनेत दाखल

अलिबाग विधानसभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी संध्याकाळी अलिबाग येथे एका जाहिर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भोईर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत 33 हजार मतं मिळवली होती.

त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी केली अटक

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना लोणावळा शहराच्या लगत असलेल्या कुसगाव येथे घडले आहे.

या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा करा अशी संतप्त मागणी सर्व स्तरातून होत आहे,

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान 20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काँक्रीट इंडिया कंपनी जवळ भैरवनाथ नगर कुसगाव येथे आरोपी यांच्या राहत्या घरात हा केळस्वान प्रकार घडला आहे.

घरात मुलगी एकटीच आहे याचा फायदा घेत नराधम बापानेच केला आपल्या सख्या मुलीवर बलात्कार.. याप्रकरणी बापास अटक केली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे...

वाशिमच्या बाजार समितीत चिया पिकाला मिळाला 14 हजार 600 रुपयांचा उच्चांकी दर

एकीकडे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या दरांमुळे बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली असताना वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चीया पिकाला 14 हजार 600 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे,

मागील काही दिवसांपूर्वीच वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाची खरेदी सुरू झाली होती. मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती.

मात्र उत्पादित केलेला माल विक्रीसाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागत असताना वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने दर शनिवार चिया पिकाची खरेदी सुरू केली.

त्यानंतर दर शनिवारी या पिकाची खरेदी केली सुरू झाली असताना वाशिमच्या बाजार समितीत चियाला मिळालेल्या 14,600 रुपयांच्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला आहे.

देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत 17 लाख 68 हजार रुपये इतकी होत आहे.

मंदिर समितीच्या वतीने भाविकांचा सत्कार करण्यात आला.

बदलापुरात सिग्नल यंत्रणेचं काम अंतिम टप्प्यात

बदलापूर शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतला.

येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

बदलापूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली. लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील वाहनांची संख्या देखील वाढलीय.

त्यामुळे कात्रप हायवे, बेलवली रोड, उड्डाणपूल चौक, बाजारपेठ परिसरात दररोज वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं.

त्यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेने सर्व मुख्य रस्त्यांवर सिग्नल बसवले आहेत. येत्या आठवड्याभरात हे सर्व सिग्नल कार्यान्वित होऊन बदलापुरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com