
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वासिंद-आसनगाव दरम्यान तांंत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळलीय
संगमेश्वर शास्त्रीपूल येथे पुन्हा एकदा दरड कोसळलीय
या ठिकाणी दरड कोसळन्याचे सत्र सुरुच आहे
सुदैवाने कोणती गंभीर घटना घडली नाही
यापूर्वी देखील या ठिकाणी दरड रिक्षावर कोसळली होती
वारंवार इथं दरड कोसळत असल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जातोय
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनास्थळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सकाळी भेट देली. तसेच यावेळी त्यांनी बचाव कार्याचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी घाटात भीषण अपघात झालाय
भरधाव पिकअप वाहन घाटाचा वळणावर पलटली...
अपघातात 22 प्रवासी गंभीररीत्या जखमी...
जखमीत लहान बालकासोबत वयोवृद्धचा समावेश....
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी)ने दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ तालुक्यातील पारवा येथील तरुण पोहण्यासाठी गेला असता पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शंकर परसराम दोडके (वय २५, रा. पारवा) भोसा तलाव या ठिकाणी पोहायला गेला असता पाण्यात बुडून मृत्यू त्याचा मृत्यू झाला. शोधकार्यानंतर मृतकाचा मृतदेह मिळून आला.
कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आलाय. चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने कुंभार्ली घाटातील वाहतूक थांबवण्यात आलीय. या मार्गावरील वाहतूक देवरुख साखरपा आंबा घाटमार्गे वळवण्यात आलीय. तर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
वाशी हायवेला लागून असलेल्या वाशी प्लाझा कमर्शियल सोसायटीची भिंत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० ते १५ दुचाकी गाड्या आणि एक टेम्पो पूर्णपणे मलब्याखाली दबल्या आहेत.
कल्याण डोंबिवली शहरासह आजूबाजूच्या परिसरात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे. पावसाचा जोर नसला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . पावसाची येजा सुरू असल्याने सध्या तरी कल्याण डोंबिवली मधील सखल भागात अद्याप पाणी साचलेले नाही. मात्र पावसाचा जोरदार वाढला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापुरातल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला.
राधानगरीतल्या मौजे चौके गावातील छोटा पूल गेला वाहून.
मौजे चौके गावाला जोडणारा छोटा पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद.
मौजे चौके येथील लोखंडी पुलावरून फक्त पायवाट चालू.
लोखंडी पूल सुस्थितीत असल्याची प्रशासनाची माहिती.
सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नं. ४ येथे साईबाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक पार्क या इमारतीची सुरक्षा भिंत २५ फूट रुंद व ५ फूट लांब भिंत आज दुपारच्या दरम्यान पडल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
उर्वरित भाग हा धोकादायक असल्याकारणाने सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव बॅरीगेटिंग केले आहे.
कुंडमळा येथे सात दिवसांपूर्वीच एका सोशल मीडिया रिलस्टारने धोकादायक स्टाईल दाखवत चारचाकी गाडी थेट धरणाच्या बंधाऱ्यावर चढवून रील तयार केली होती. या प्रकारामुळे त्या वेळीच सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु संबंधित यंत्रणांनी कोणतीही तातडीची कार्यवाही केली नव्हती. आताच या परिसरात असलेल्या इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याने या प्रकारातला गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील नवदांपत्याचा मृत्यू.
घरातील गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.
सागर करमळकर आणि सुषमा करमळकर अशी मृत दांपत्याची नावे.
मे महिन्यात झाला होता या दोघांचा विवाह.
मुंबईत पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. अंधेरी सबवेत तब्बल पाच फूटांपर्यंत पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
मुंबई वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सबवेतील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन शाळकरी मुलींना वाहनाने दिली धडक.
सोलापूर - हैदराबाद महामार्गावर येणेगुर पोलिस ठाणे समोर वाहनाने धडक दिल्याने शाळकरी मुली गंभीर जखमी.
दुपारच्या सुट्टीत घरी जात असताना महामार्गाच्या आपत्कालील मदत वाहनाने मुलींना उडवले.
दोन्ही जखमी मुलींवर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
गेली पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गावकरी आक्रमक
तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग शहरात गेली पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरीकांनी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गाढव मोर्चा काढुन पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय,यावेळी शहरातील क्रांती चौक,चावडी चौक,बसवेश्वर चौक,जय भवानी चौक मार्गे हा मोर्चा नगर पालिका येथे धडकला यावेळी हातामध्ये फलक घेत नागरीक यामध्ये सहभागी झाले होते.
ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे गुरूवार दि.१९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. ते शुक्रवार दि.२०.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत बंद रहाणार आहे. त्या काळात ठाण्याच्या काही भागात १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळून देतो असे अमिश दाखवून नाशिकमध्ये तिघांची 44 लाख रुपयांची.....
नाशिक सध्या सायबर भामट्यांकडून रोज नव नवीन पद्धतीने नागरिकांची फसवणूक केली जात आहे नाशिकमध्ये देखील ऑनलाइन फसवणूकीची घटना समोर आली आहे. ऑनलाइन शेअर ट्रेडिंग च्या नावाने जवळपास 44 लाख रुपयांची फसवणुकीचे प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावळ येथील पूल दुर्घटनेनंतर पुणे शहरातील सर्व नदी, कॅनल आणि ओढ्यांवरील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करा
पुणे शहर भाजपची महापालिका आयुक्तांकडे मागणी
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची पुणे शहर भाजपच्या कोअर कमिटीने घेतली भेट
भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने केली मागणी
पुणे शहरातील सर्व नदी, कॅनॉल, ओढ्यावरील धोकादायक पुलांचे तातडीने स्ट्रकचरल ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट करावे हे केली मागणी
गणेशोत्सवाला अजून २ महिने शिल्लक आहेत असं असताना लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आता ढोल ताशा पथकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. संस्कृतीची राजधानी पुण्यनगरी मध्ये गणसोत्सवाची वैशिष्ट्ये म्हणजे इथली शिस्तबद्ध ढोल पथकं. याच ढोल पथकांकडून आता सरावाला सुरुवात झालीय. .
पुण्यात कोंढवा येथील मुनोत प्राथमिक विद्यालय अचानक बंद केल्याने विद्यार्थी आणि पालक शाळेच्या गेटवर ताटकळत थांबले.
संस्थाचालकाने विद्यालय शाळा बंद केली असून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला आहे.
साठ टक्के अनुदानित आणि शाळेत मोठी विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालकांच्या वादामुळे शाळा बंद केली आहे.
जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
आज शाळेचा पहिला दिवस असताना शाळा बंद केल्याने पालक संतप्त
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पंचगंगा 18 फुटांवरून वाहत असून जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
रत्नागिरी - संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे लँडस्लाईड
धामणी गोळवलीतील डोंगर भाग आला खाली
धामणीत रात्री तीन तासांत पडला मुसळधार पाऊस
पावसामुळे डोंगर आला खाली
डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे गेली भरुन
डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान
मुंबईत रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वेत मरोळ मकवाना रोडवर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना मरोळ मकवाना रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर झाड कोसळले.त्याच वेळी रस्त्यावर पायी चालत जात असलेल्या व्यक्तीवर देखील झाड कोसळल्यामुळे ती व्यक्ती जखमी झाला.जखमी व्यक्तीला जवळच्या सेवेन हिल्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.जखमी व्यक्तीचं नाव बसू असून सकाळी कामासाठी जात असताना दुर्दैवी झाड कोसळून जखमी झाला. रस्त्यावर उभी असलेली कार वर झाड कोसळल्यामुळे कारचा सुद्धा मोठा नुकसान झाला. काही काळ झाड कोसळल्यामुळे मरोळ मकवाना रस्ता बंद करण्यात आला होता मात्र अग्निशमन दलाचे जवान झाडाला कापून बाजूला केल्यामुळे पुन्हा रस्ता सुरळीत सुरू करण्यात आला आहे.
गणेशनगर भागातील हा पूल कोसळल्याने ५०० पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झालाय. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला. हा पूल कोसळल्याने ५०० घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असून पालिकेच्या कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय.
घाटकोपर वर्सोवा मेट्रो सेवा सुरळीत झाली आहे. 20 मिनिट मेट्रोचा खोळंबा झाला होता. ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा झाला होता. ओव्हर हेड वायरला प्लास्टिक अडकल्याने मेट्रोफहक्त खोळंबा झाला होता 25 मिनिटानंतर मेट्रो सुरु
खेडमधील पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला फटका बसलाय. महामार्गावरील कशेडी घाटात बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळलीय. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झालाय.महामार्गावरील वाहतूक सध्या धिम्या गतीने सुरु आहे. दरड हटवण्याचं काम सध्या सुरु आहे.गेल्या महीन्यात याच ठिकाणी दोन वेळा दरड कोसळली होती त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता आणि आता पुन्हा याच ठिकाणी दरड कोसळलीय.त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदा वरून बच्चू कडू अपात्र..
विभागीय सहनिबंधक यांचा निर्णय..
न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा दणका..
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत बच्चू कडू अध्यक्ष
मुंबई मेट्रो १ मध्ये बिघाड झाला आहे. वर्सोव्याकडे जाणारी मेट्रोसेवा विस्कळीत झाली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्रीताई पाटील यांनी भाजपात केला प्रवेश..
भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांनी भाजपात केला प्रवेश.
जयश्रीताई पाटील या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या आहेत वहिनी..
मंत्री चंद्रकांत पाटलांनी,जयश्रीताई पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेत,चर्चा करत केला पक्षप्रवेश.
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश होणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी केले जाहीर..
० काळ नदीवरील बंधारा पाण्याखाली
अँकर : रायगड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आता ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. माणगाव तालुक्यातील काळ नदी गोरेगाव जवळ ओसंडून वाहत असल्याने सुमारे शंभर गावांना पिण्याचे पाणी पुरवणारा बंधारा पाण्याखाली गेला आहे. नदी प्रवाहातील पाणी नदी पात्र सोडून बाहेर आल्याने शेती व आदिवासी वाडीवर जाणारा रस्ता बंद झाला आहे.
पुणे कोलाड मार्गावरचा पिरंगुट येथील नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी तयार केलेला तात्पुरता पुल गेले काही दिवस पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळं गेला वाहून
सुदैवाने दोनचं दिवसांपूर्वी नवीन पुलाचं उदघाट्न झालं असल्यानं याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही..
भाजपा युवा मोर्चाने दोन दिवसापूर्वी प्रशासनाच्या मागे लागून, नागरिकांना सोबत घेऊन वारंवार पाठपुरावा करून नवीन पुल सुरू करण्यास प्रशासनाला भाग पडले, त्यामुळं नागरिकांची गैरसोय टळलीय
पुणे कोलाड या मुख्य मार्गावरचा पिरंगुट येथील हा पुल आहे.
० अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
० अंबा आणि कुंडलिका या
दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
० अन्य नद्यांची पाणी पातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली
० धोकादायक परिस्थिती नसली तरी सतर्कतेचा इशारा
- आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन
- मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
- ओझरजवळ दहावा मैलजवळ रास्ता रोको आंदोलन
- आदिवासी आश्रम शाळांमधील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरती बिऱ्हाड मोर्चा काढला आहे, आदिवासी आश्रम शाळांमधील खाजगीकरण करण्याबाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा बिऱ्हाड मोर्चा नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयाच्या दिशेने जात असताना नाशिकच्या ओझर दहावा मैल परिसरात या आंदोलनकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे या रास्ता रोको मुळे नाशिक मुंबई महामार्ग ठप्प झाला असून दोन्ही बाजूने वाहनांचा चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या आहे.
- ढगफुटी सदृश्य पावसानं परिसरातील शेती पिकांचं मोठं नुकसान
- पावसाच्या पाण्यानं शेती पिकं वाहून गेली, तर काही ठिकाणी शेतजमिनीची माती देखील वाहून गेल्याची माहिती
- मुसळधार पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप
पोलिसांकडून योग्य बंदोबस्त तैनात करण्यात येणार
रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने ब्लास्टिंग द्वारे डोंगर फोडण्याचे काम सुरू
ब्लास्टिंग मुळे डोंगरावरची माती आणि दगड झाले आहेत सैल
दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे दिवे घाटातील डोंगरावर चढण्यास बंदी
दरवर्षी हजारो भाविक, फोटोग्राफर दिवे घाटातील दृश्य टिपण्यासाठी या डोंगरावर चढत असतात
मात्र यंदा डोंगरावर नागरिकांच्या उपस्थितीमुळे धोका निर्माण होऊ शकतो
वारकऱ्यांना पुढे पायी चालू दिल्यानंतर त्यांच्या दिंडी चे वाहने सोडली जाणार
- विरोध कायम असल्याचे व्हाट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावर पोस्ट
- मात्र माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास आमदार सीमा हिरे यांचा नकार
- सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाही असा मजकूर टाकत दर्शवला विरोध
- सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा
पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून 100% तयारी पूर्ण
मिठी नदी वगळता मुंबईच्या सर्व नाल्यांचे सफाई 100% पूर्ण
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मोठा दावा
आय एम डी कडून पालिका वेळो वेळी माहिती घेऊन सतर्क आहे,
मुंबई महानगरपालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टिव्ह आहे
मुंबईत काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्या खड्डे बुजवायचं काम आमच्या टीम कडून सुरू आहे- भूषण गगराणी महापालिका आयुक्त
०माणगाव रायगड मार्गावर दरड कोसळली
० कोणतही नुकसान नाही
० माणगाव रायगड किल्ला मार्गावर घरोशी वाडी, पळस गाव मार्गावर कोसळली दरड
० डोंगरातुन मोठी दगड रस्तावर आली
लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली
सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारासची घटना
महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु
महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरु
महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल, वाहतुकीवर मोठा परिणाम नाही
महामार्गावरील निकृष्ट कामाची पावसाने केली पोलखोल
छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पास वाटून सजवलेल्या बसमधून घेऊन शाळेत सोडण्यात आले. छत्रपती संभाजी नगर शहराजवळ काही अंतरावर असलेल्या जटवाडा, ओव्हर या गावांसह तांडा, वाडा आणि वस्त्यांवर शाळेच्या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती बस स्थानकाकडून विद्यार्थ्यांसाठी बस सेवा पुरवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थिनींना मोफत पास देऊन महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर आणि मध्यवर्ती बस स्थानकाच्या टीम कडून या विद्यार्थ्यांना मोफत पास वाटप करून पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. परिवहन महामंडळाच्या टीमकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बसची देखील आकर्षक सजावट करण्यात आली. संभाजीनगर जिल्ह्यातील आठही आगारांमधून शाळेमध्ये मोफत पास वाटण्यात आले.
रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली असून, शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात, तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक आणि जनजीवन ठप्प झाले आहे. या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पुण्यासह राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुरुवात झालीय. पुणे शहरातील भावे प्राथमिक शाळेत आज सकाळपासून उत्साह पाहायला मिळतोय. नवीन नवीन युनिफॉर्म घालून सर्व चिमुरडे शाळेत पोचले आहेत. फक्त विद्यार्थी च नाही तर त्यांच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे. शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना ग्रीटिंग कार्ड देऊन शाळेत स्वागत करण्यात आलं. इतकचं नाही तर शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे वर्गाच्या बाहेर रांगोळी काढलीय आणि सगळ्या चिमुरड्यांना खाऊ सुद्धा दिला जातोय. पुण्यातील भावे प्राथमिक शाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...
- सुधाकर बडगुजर यांच्यासह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविलेले गणेश गीते देखील करणार भाजपमध्ये प्रवेश
- स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध जुगारून बडगुजर आणि गीते यांना दिला जाणार प्रवेश
- मंत्री गिरीश महाजन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष चव्हाण यांच्याकडून विरोध करणाऱ्यांना तंबी
- आपल्याकडे पक्ष प्रवेश न दिल्यास ते इतर पक्षात जाणारच आहे त्यामुळे त्यांना प्रवेश देणे योग्य राहील
- सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा उद्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्याची चर्चा
- उद्या मुंबईत सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची शक्यता
घरासमोर ठेवलेल्या चारचाकी वाहनाची तीन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना भद्रावती इथे घडली. तोडफोडीची ही घटना cctv कॅमेरात कैद झाली असून या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली आहे. वासुदेव ठाकरे घरी आपल्या कुटुंबासह परतल्यानंतर त्यांनी महेंद्र कंपनीचे थार हे चारचाकी वाहन घरासमोर ठेवले. रात्रीच्या सुमारास अचानक तोडफोडीचा आवाज आला. अज्ञात तीन व्यक्ती हे लाकडी दांडक्यासह गाडीची तोडफोड करताना दिसले. आरडाओरड झाल्यानंतर हे तिन्ही व्यक्ती एका कारमध्ये बसून पळाले. भद्रावती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुलावर सातत्याने भगदाडे पडत असून, नुकतेच पुन्हा एकदा विविध ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आलेय या आधीही सात ते आठ वेळा अशाच प्रकारे भगदाडे पडल्याने पुलाच्या मजबुतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेय त्यामुळे पूल दिवसेंदिवस अधिकच धोकादायक होत असतानाही त्यावरून वाहनांची आणि नागरिकांची वाहतूक मात्र सुरूच आहे. यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली असूनही संबंधित विभाग आणि धरण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. स्थानिक नागरिकांनी वेळेत दखल घेऊन पूल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी केली आहे.
आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला रेड अलर्ट
जिल्ह्यात एकुण 1021.92 मिलीमिटर पाऊस पडलाय तर सरासारी 113.54 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात पडलाय लांज्यात 139 मिमी पाऊस पडलाय त्या खालोखाल गुहागर 136.80 मिमी, संगमेश्वर 129.50 मिमी , चिपळूणमध्ये 128 मिमी पाऊस पडलाय
रात्रीपासून किनारपट्टी भागात वेगवान वारे
ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहताहेत
जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून, जगबुडी आणि कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर वाहतेय
आज दिवसभर पावसाचा जोर असणार आहे
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगरमध्ये कारहुनवी सणानिमित्त हनुमानाची मोठी यात्रा भरली आहे.या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेश मधील हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे.या कारहुनवीच्या यात्रेला गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढल्याच दिसून आलं.या मिरवणुकीनंतर हनुमान मंदिराच्या भोवती या बैलगाड्यांची चित्ताथरारक शर्यत पाहायला मिळाली. ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र मधून मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावल्याचे चित्र दिसून आलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून जिल्ह्यात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत आहेत मालवण, कणकवली, कुडाळ सावंतवाडीत पावसाचा जोर असून सह्याद्री पट्ट्यातही पावसाचा जोर वाढला आहे. समुद्रालाही उधाण येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खामगाव मतदारसंघात अजित पर्वाला आता सुरुवात झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सलग तीन टर्म काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे आणि जवळपास 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये असणारे खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खामगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. खामगाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास 11000 पेक्षा जास्त कार्यकर्ते देखील या प्रवेश सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सहभाग झालेत...
- हवामान विभागाच्या अंदाजानुसार १७ ते २१ जून दरम्यान मेघगर्जनेसह पावसासाठी पोषक वातावरण होणार निर्माण.
- तर पुढील २४ तासात विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मान्सूनचे ढग पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज..
- जून महिन्यात विदर्भात उन्हाचे चटके जाणवत आहेय.. या महिन्यात पारा ४४.२ अंशावर जाऊन आलाय..
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील चिखली झोलेबाबा येथून संत झोलेबाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने रवाना झाली आहे. या पालखी वारीचे यंदाचे अकरावे वर्ष असून, मोठ्या संख्येने महिला-पुरुष आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये पाहायला मिळतो आहे.
आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचा प्रवाह तीव्र
डोंगर उतारावर; तसेच कच्ची घरे, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, हवामान शास्त्रज्ञ यांच्याकडून आवाहन
कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती
कोकण, घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे हवामान तज्ञांचा सल्ला
एन डी आर एफ चे रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री थांबवण्यात आले आहे
सर्व हरवलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आल्यानंतर एन डी आर एफ ने ऑपरेशन थांबवले
प्रशासनाकडून कोणी व्यक्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास पुन्हा ऑपरेशन सुरू करणार
मावळ दुर्घटनेत ४ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश
पालघर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्हा दौऱ्यावर . देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियांनाच उद्घाटन . मनोर येथे कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थित . शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद दुर्वेश शाळेत मुख्यमंत्र्यांकडून केलं जाणार विद्यार्थ्यांचं स्वागत . देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मंगलप्रभात लोढा देखील राहणार उपस्थित .
जालन्यात ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. डीएपी खताचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी झाल्यामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना डीएपी खताच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे..खरीप पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांचा कुठलाही तुटवडा जाणवणार नाही असं वारंवार कृषी विभाग सांगत होतं मात्र सध्या जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून युरिया, डीएपी, एमओपी एनपीके ,एसएसपी या खताची दोन लाख 77 हजार 710 मॅट्रिक टन इतकी मागणी करण्यात आली होती . मागणीप्रमाणे खताचा पुरवठा देखील करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये डीएपी खत खताचा पुरवठा मागणीपेक्षा कमी झाल्याने तुटवडा जाणवत आहे.
भुसावळ यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून भुसावळहून पंढरपूरकडे ५ जुलैपासून मोफत विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जळगाव, भुसावळ, चोपडा, यावल, रावेरसह लोकसभा क्षेत्र आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने ही गाडी अनारक्षित स्वरूपात चालवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री खडसे यांनी गाडीच्या तिकिटांचा खर्च त्यांच्यावतीने करण्यात येणार आहे.५ जुलै रोजी सकाळी भुसावळ रेल्वे तसे वडापात्रात रेल्वे वेळापत्रक काढण्यात आले आहे
पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ पाणी आलं रस्त्यावर
रस्त्यावर पाणी तरी वाहतुकीवर परिणाम नाही
ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यावर
लांजा एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर आहे पाणी
बोगद्याच्या अलीकडे काही अंतर आधी रस्त्यावर आला डोंगरातील मातीचा मोठा ओसरा
० कोणतीही हानी नाही
० बॅरेगेटींग करून वाहतुक बाजुने सुरु
विठ्ठलवाडी पोलिसांना या गावठी दारूच्या अड्ड्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेत पाहणी केली असता हजारो लिटर गावठी दारू तयार केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने ही सगळी दारू नष्ट करत हा अड्डा उध्वस्त केला. माणेरे गावालगतच्या जंगलात गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याच्या तक्रारी आजवर अनेकदा प्राप्त झाल्या असून पोलिसांनी आजवर अनेकदा या ठिकाणी कारवाई केली आहे. मात्र तरीसुद्धा हे अड्डे सुरूच असल्याने गावठी दारू तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे उल्हासनगर मध्ये पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता, प्रमुख वक्ते म्हणून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते, यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते, येत्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वीस प्रभागात 78 म्हणजेच सर्व जागांवर उमेदवार तयार रहा,आघाडीचा निर्णय जो होईल तो आम्हाला मान्य असेल, असं मत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले.
रात्रभर कोसळणार्या पावसाने पहाटेच्या सुमारास उसंत घेतली आहे. आज देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे. पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहरांतील सर्वच् भागात म्हणजे घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, कळवा या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
पांडुरंगाच्या ओढीने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाले आहेत. या वारकऱ्यांमध्ये यवतमाळातील तरुण दृष्टीहीन वारकरीही स्वतंत्र वारी काढून सहभागी होत आहेत. येथील सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने या दिव्यांग वारीचे आयोजन करण्यात आले असून, वारीचे हे दुसरे वर्ष आहे. स्थानिक सिद्धी विनायक मंदिरातून संत सूरदास महाराजांची पालखी घेवून दिव्यांगांची ही वारी यवतमाळ येथून पंढरपूरकडे निघाली.
रात्रभर उल्हासनगर अंबरनाथ शहरात रिमझिम पाऊस पडत असून, सकाळी सुद्धा या शहरात रिमझिम पाऊस पडत आहे . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उल्हासनगर, अंबरनाथ,अंबरनाथ ग्रामीण या भागात पावसाने रात्रभर हजेरी लावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.