
मुंब्रा येथील आल मास कॉलनीमधील सुप्रीम इमारतमध्ये दुचाकीच्या इलेक्ट्रिक बॅटरीचा स्फोट होऊन तीन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांची नाव नुसरत सय्यद, हाफ जा सय्यद अणि अफ जा सय्यद अशी आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
येत्या ९ जून रोजी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या ९ तारखेला पार पडणार
या बैठकीला राज्यातून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहणार
साखरेच्या उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबत प्रत्यक्षिके दाखवली जाणार
पायलट प्रोजेक्ट बद्दल सुद्धा या कार्यक्रमातून साखर कारखान्याच्या मालकांना दिली जाणार माहिती
सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाले आहेत यादरम्यान... ज्या भागात या रस्त्यांसाठी वृक्षतोड करण्यात आले याच रस्त्यावर हरित सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सातारा नगरपालिका यांच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावून सातारा शहरातील विविध भागात वृक्षारपण केले
फायर ब्रिगेडने लगेचच आग विझवली
पश्चिमेच्या चिंचपाडा फायर स्टेशन समोरची घटना
फुलंब्री तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु कांदा विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर व इतर ठिकाणी जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा खर्च लागत होता. शेतकऱ्याची वाढती मागणी लक्षात घेऊन फुलंब्री मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या संकल्पनेतून कांदा लिलाव प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात राबविण्यात आली. याची सुरूवात 1 जून रोजी करण्यात आली.
मंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात नॅपकीनच वाटप करीत गोगावले समर्थकांनी खा. सुनिल तटकरे यांना डिवचल आहे. मागील आठवड्यात तटकरे यांनी गोगवले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल महाडमध्ये केली होती.
वाशिमच्या रिसोड येथील सुरेखा काबरा या महिलेला पोटदुखीचा त्रास होत असल्याने संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केले असता, तिथे पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील कापडाचा तुकडा काढण्यात आला ,
तब्बल दोन तास ही बैठक चालली आहे. या संदर्भात एक पायलेट प्रोजेक्ट करन्यात येणार आहे.
बारामतीतील सोमेश्वर कारखाना, बारामती बँक आणि AI सस्था यांच्या माध्यमातून एक पायलेट प्रोजेक्ट करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात खडकवाडी-धुमाळस्थळ येथे अज्ञात व्यक्तीने लाकडी बराकीत साठवलेल्या कांद्यावर पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना घडलीय
या आगीत संपूर्ण कांदा साठा जळून खाक झाला असून शेतकरी संदीप बबन धुमाळ यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झालेय याप्रकरणी संदीप धुमाळ यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी अपडेट
चालक जयराम मुळे याची येरवडा कारागृहात रवानगी
आरोपी चालकाला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले
आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असताना त्याने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपघात घडला
सर्व तांत्रिक पुराव्यासह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला दिली माहिती
मराठा समाजातील लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाजाचा एकवटला आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत हुंडा बंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून, मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लग्नाती अवा चा सव्वा खर्च टाळणे, हुंडा न देणे, हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाकणे आणि सामुक विवाह सोहळे आयोजित करणे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सारथ्य
मोफत हॉस्पिटलच्या लोकार्पणानंतर शिंदे यांच्या गाडीचं केलं सारथ्य
रत्नागिरी शहरातील कार्यक्रमाला जाण्यासाठी उदय सामंत यांनी स्वतः घेतलं हातात स्टेरिंग
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना नेते रवींद्र फाटक होते एकाच गाडीमध्ये
जालन्यातील 5 हजार शिवभक्त यंदा रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिलीय. 6 जून रोजी रायगड येथे 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी अन्नछत्राची जबाबदारी यंदा जालना जिल्ह्याला देण्यात आली आहे. त्यासाठी जालना येथील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून तयारी केली जात आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जालन्यातील सुमारे अडीचशे स्वयंसेवक रायगड येथे जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत समितीचे सदस्यांकडून देण्यात आली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एका भरधाव कारने दिलेल्या धडकेतील १२ पैकी तिघांची चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करुन, लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. तसेच डॉक्टरांना ही तिघांवर उत्तमोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
शनिवारी संध्याकाळी सुमारास पुण्यातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील एका चहा दुकानात भरधाव कार घुसली. या अपघातात १२ जण जखमी झाले असून; तीनजणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी घटनेच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला.
माझ्या मतदार संघात मोफत रुग्णालय सुरु केल्याबद्दल निलेश सांबरे यांना धन्यवाद
उदय सामंत
पंढरपूर येथील उत्पात समाजाच्या उपासना मंदिरातील रूक्मिणी मातेला आज शंभर हापुस आंब्या पासून तयार केलेल्या आमरसचा अभिषेक करण्यात आला. सध्या आंबा बाजारात उपलब्ध झाला आहे. सर्वत्र घरोघरो आमरस आणि पोळीचा बेत आखला जातो. देवाला नैवेद्य म्हणून आज उत्पात समाजाच्या वतीने रूक्मिणी मातेला आमरसाचा अभिषेक करण्यात आला.
वाशिम जिल्हा रुग्णालयात १९ मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली.
डॉक्टरांनी या घटनेमागे "तांत्रिक बिघाड" असल्याचे सांगत ती अनावधानाने घडल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून, या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम
लोकार्पण सोहळ्याला खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, भाजप नेते रवींद्र चव्हाण सध्या उपस्थित
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम दाखल होणार
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती शनिवारी मध्यरात्री अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने खाजगी वाहनाने मुंबईला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. आज कल्याणकर यांचा वाढदिवस होता.ऐन वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. आज रविवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरही एकूणच चिंतेचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.आमदार कल्याणकर यांनी काही दिवसापूर्वीच नांदेडच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये सलग पाच दिवस उपचार घेतले. त्यांना अतिउच्च तापासह रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी तातडीने मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हिल्यानगर जिल्हयात मान्सुनपूर्व पावसाने मागिल आठवड्यात हाहाकार माजवला होता..
मुसळधार पावसामुळे शेतशिवार जलमय झाले होते मात्र तिन ते चार दिवसांपासुन पावसाने उसंत घेतल्याने खरीपाच्या मशागतीला वेग आलाय..
ट्रक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने रान तयार केले जात आहे..
तसेच बी - बीयाणे, खते, औषधे खरेदीसाठीची तयारी देखील बळीराजा करत आहे..
आषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे, हजारो नाहीतर लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपुरात दाखल होत असतात, असेच पहिल्यांदा वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत,15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात 400 किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरपूरला दाखल होणार आहे.
परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहेत.
या ठिकाणी बांधकामावर असलेल्या कामगारांनी याच परिसरात मांसाहारी जेवण बनवले असल्याचे समोर आले..
या परिसरातील काही भाविकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जात याचा व्हिडिओ देखील चित्रित केला असून आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे..
या प्रकरणात कारवाई करावी व यापुढे असे प्रकार होणार नाहीत अशी दक्षता घेण्याची मागणी आता भाविकांमधून केली जात आहे.
कडे करून कात्रजच्या घाटात व लोणावळ्यात फेकून देण्यात आले होते
पुणे पोलिसांच्या तपासात लीना देवस्थळी व दीप्ती देवस्थळी या मायलेकींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले
देवस्थळी मायलेकींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात या मायलेकींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती
१९ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर देवस्थळी यांची सुटका करण्यात आली
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या साठ वर्षांवरील वयस्कर व अशक्त महिला बंदीजनांना मुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे लीना देवस्थळीची येरवडा मध्यवर्ती कारा
पुण्यातील बहुचर्चित डॉ. दीपक महाजन हत्याकांड प्रकरणात जन्मठेप झालेल्या लीना अनिल देवस्थळी (वय ६५) यांची सुटका
१९ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर देवस्थळी यांची सुटका करण्यात आली
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या साठ वर्षांवरील वयस्कर व अशक्त महिला बंदीजनांना मुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे लीना देवस्थळीची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका
पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या डॉ. दीपक महाजन यांचे जुलै २००६ मध्ये अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती
त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करून त्यांच्या शरीराचे आठ तुकडे करून कात्रजच्या घाटात व लोणावळ्यात फेकून देण्यात आले होते
पुणे पोलिसांच्या तपासात लीना देवस्थळी व दीप्ती देवस्थळी या मायलेकींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले
देवस्थळी मायलेकींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात या मायलेकींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती
पावसाळ्यापूर्वी नाल्या तुडुंब भरू नये व नाल्याचे पाणी रस्त्यावर किंवा कोणाच्या घरात शिरू नये यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाल्यांची साफसफाई करण्याची मोहीम सुरू आहे,
मात्र अमरावती शहरात नालेसफाईचे पूर्णपणे तीन तेरा वाजले आहेत,अमरावती शहरातील अर्जुन नगर मधील शिवशक्ती अपार्टमेंटला लागून असलेला नाला व इतर नाले अत्यंत थातूरमातूर पद्धतीने साफ करण्याचा केवळ दिखावा करण्यात आला,
नाल्यातील गाळ काढण्यात आला नाही..
नाल्यातील झाडे झुडपे तसेच आहे त्यामुळे कागदोपत्रीच अमरावती शहरातील नाले सफाईच अभियान सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे...
हीच परिस्थिती शहरातील अनेक भागात आहे कारण नाल्यातील गाळ नाल्याच्या काठावरच टाकला जातो आहे...
एकनाथ शिंदेचा काचारा केला आहे, लवकरच ते कचऱ्याच्या डब्यात जाणार
संजय राऊत
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा सातत्यिकी सावरकर यांच्या आईकडील वंशावळ तपासण्याचा अर्ज फेटाळला
खटला हा सावरकरांच्या बदनामी विषयी आहे त्यामुळे हेमांगी सावरकरांची वंशावळची गरज नसल्याचे कोर्टाचे मत
सात्यकी सावरकर यांचा ही अर्ज न्यायालयाने फेटाळला
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती
हा अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील गणेश कला रंग मंच या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग घेतला
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली
ज्ञानेश्वरी म्हणताना चंद्रकांत पाटील हे भक्तीरसात तल्लीन झालेलं पाहायला मिळालं
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव,घोळसगाव,किरनाळी गावांना पावसाने झोडपले
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे - नाले तुडुंब भरून लागले वाहू
अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेतशिवारात ही शिरलं पाणी
जिजाऊ सामाजिक संस्था संचालित भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे उदघाटनास उपस्थिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामीण भागासाठी घंटागाडी लोकार्पण
माहिती कार्यालयच्या कोकणविभागीय पत्रकार कार्यशाळेस सदिच्छ भेट
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोंडये येथे एका कंटेनरला मध्यरात्री अचानक आग लागली.
मॅगीने भरलेला हा ट्रक गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता.
मध्यरात्री अडीच वाजता या कंटेनरला कोंडये येथे अचानक आग लागली..
दरम्यान आगीची घटना समजताच राजापूर नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला.
त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली..
या घटनेत कंटेनरचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे, मात्र 70 टक्के माल वाचविण्यात यश आलं..
वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार
शिवाजीनगर येथील साखर संकुल याठिकाणी बैठकीच्या आयोजन
बैठकीला जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार
आज दुपारी दोन वाजता साखर संकुल येथे बैठकीचे आयोजन
मनसे कार्यकर्ते सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज प्रवेशासाठी मोदी बागेत दाखल
मनसे चे रोहन गायकवाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोदी बागेत
शरद पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश
हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात सातत्याने कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नदी व नाल्यांना पूर आला होता
यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर येलदरी व ईसापुर धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे, उन्हाळ्यात तापमानामुळे तिन्ही धरणातील
पाणीसाठा मृत अवस्थेत असताना या अवकाळी पावसामुळे आता तब्बल 23 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा धरणक्षेत्रात जमा झाल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे दरम्यान मागील दशकभरात पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या मे महिन्यात धरणात पाणी साठवण्याची आवक झाली आहे
आजपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी राहणार बंद
यावर्षीचा माच्छिमारी हंगाम संपल्यानंतर मच्छिमारी नौका बंदरात
मत्स्य विभागाने या बाबतचे आदेश केले जारी
बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
जुन जुलै माशांचा प्रजननाचा काळ, १ जून ते ३१ जुलै पर्यत मासेमारीवर बंदी
वादळी वारे आणि अवकाळी पावसाने या हंगामात मच्छिमारांचे नुकसान
गेले काही दिवसांपासून अचानक दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीत सकाळीच दमदार हजेरी लावलीय.
सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे,मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
गेले काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अचानक पावसाने दडी मारल्यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण देखील झाले होते.
पावसाच्या आगमनामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा मिळाला आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात जोरदार पावसाच्या सरी
सकाळी कडक उन्हानंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने भात पेरणीची लगबग सुरू
मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांकडून भात पेरणी
पावसाच्या भिती पोटी शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग
पावसात खाचरात पाणी साचून ओलावा टिकून राहिल्याने कुदळीने करावी लागतायेत पेरणीची कामे
कोरड्या ठिकाणी बैलांच्या औताच्या सहाय्याने केली जातेय पेरणी
दरवर्षी धूळ वाफेवर ट्रॅक्टर किंवा औताच्या साहाय्याने भात पेरणी केली जाते. मात्र यंदा पंधरा दिवस अगोदरच पावसाने सुरुवात केल्याने, या पावसाने चांगलेच अडचणीत आणले आहे
पेरणी आणि मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत
पाऊस उघडल्याने खाचरात ओलावा असतानाही, जमीनीचा वापसा न पाहताच महिलांना घेऊन कुदळीने पेरणी केली आहे
बी. जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टर ६ महिन्यांसाठी निलंबित
निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी
शैक्षणिक व परिषदांतील सुद्धा या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणि प्रत्येकी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे
२८ एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने ४ दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली
डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले
आजपासून नव्या दरांची अंमलबजावणी
पीएमपी प्रशासनाने प्रवासी भाड्यांमध्ये वाढ केली आहे
आज १ जूनपासून ती लागू झाली आहे
किमान तिकीट ५ रुपयांऐवजी आता १० रुपये झाले आहे
१ ते ५ किमी अंतरासाठी नव्या दरानुसार १० रुपये मोजावे लागतील
दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ झाली असून, एकत्रित दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १५०० रुपये इतका झाला आहे
मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सवलती पूर्ववत ठेवण्यात आल्या आहेत
लातूरच्या मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता...
दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 5हजार रुपये दंड, आणि सहा महिन्याचा कारावास सुनावला आहे...
या खटल्यात पीडित मुलीचा जवाब आणि इतरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली, त्यामुळे दोषींना ही शिक्षा देण्यात आली आहे.
नीरज यादव असं मोबाईल रिपेरिंग करणाऱ्या दुकानदाराचं नाव आहे,नीरज याच्याकडे मोबाईल डिस्प्ले बनविण्यासाठी तीन तरुण आले ,त्यांना 1500 रू खर्च लागेल असं सांगितलं, पुन्हा ते 5 ते 10 मिनिटाने दुकानात येऊन वाढीव किंमत का सांगितले यावरून वाद घातला,यावेळी त्या तीन तरुणांनी थेट कंबरेला लावलेला पट्ट्या ने नीरज याला बेदम मारहाण केली
उल्हासनगर कॅम्प 5 मधील बसंत बहार परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका युवकावर बांबूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अतिक खान (वय अंदाजे २८) या युवकावर रफिक पार्सलवाले गटाच्या ५ ते ६ जणांनी लाकडी बांबूने मारहाण केली.
या हल्ल्यात अतिकचा एक हात फ्रॅक्चर झाला असून दोन्ही पायांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
वर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची होती मागणी..
प्रत्येक वृत्तपत्रा पावने दोन रुपये दहा पैसे कमिशन देण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांची मागे
काल नागपूरला वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक झाली या बैठकीमध्ये तोडगा निघाल्याने अमरावती अमरावती शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मागे
अमरावती शहरात वृत्तपत्र वाटप सेवा पूर्ववत सुरू
वृत्तपत्र विक्रेते संपावर गेल्यामुळे जवळपास 60 हजार पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना बसला होता फटका.
आज अमरावती शहरात घरोघरी पोहोचत आहे वृत्तपत्र
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना सिहोरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
मंगेश रहांगडाले (२५) रा. सिहोरा, असे आरोपीचे नाव आहे.यातील आरोपी मंगेशने पिडीताच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचेवर अत्याचार केला.
आरोपी हा इतकेवरच थांबला नाही तर आरोपीने 'या बद्दल कोणालाही काहीही सांगितल्यास तुझी बदनामी करीन', अशी धमकी दिली.
पिडीतेसोबत घडलेला प्रकार पिडीतेच्या वडिलास माहिती झाल्यावर त्यांनी आरोपीस याबद्दल बोलले असता आरोपीने पिडीतेच्या वडिलाला सुद्धा बदनामीची धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध सिहोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील दुधी येथे निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळत असुन शेतकरी उमेश जाधव यांच्या बोअरवेल मधुन विना पंपाचे मोठ्या दाबाने पाणी वाहु लागल आहे.
उमेश जाधव यांनी त्याच्या शेतात उन्हाळ्यात 250 फुट बोअर घेतला होता, गेल्या 10 दिवसापासून या बोअर मधुन विना पंपाचे तिन ते चार इंज पाणी मोठ्या दाबाने वाहत आहे.
तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने बोअरमधून पाणी वाहत असल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे.
त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५(ब), २८१ अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काल झालेल्या अपघातात ९ जणं जखमी झाले होते तर यातील २ जणं हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते.
तलासरीच्या धुंदलवाडी येथील घटना.
मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर अपघात.
अपघातात खाजगी बस मधील वाहकाचा जागीच मृत्यू तर तीन प्रवासी जखमी.
रियाज असं मृत वाहकाचं नाव.
अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी.
सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक बंदूक असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या मोबाईल मध्ये करिष्मा आणि लता हगवणे यांचा मोबाईलचा देखील समावेश आहे आणि ज्या बंदुकीच्या राखावर निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं होत.
ती बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर काल बावधन पोलिसांनी त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घराची झळती घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे
तुळजापुर येथील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणात विनोद गंगणे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
विनोद गंगणे मागील दीड महीन्यापासुन फरार असुन धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. व्ही व्ही टुशिंग व अॅड. अंगद पवार यांनी गंगणे यांची बाजु मांडली गंगणे यांनीच पोलिसांना टिप दिली असल्याने ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्याचा युक्तीवाद यावेळी गंगणे यांच्या वकिलांनी केला.
दरम्यान अंतिम सुनावणीला गंगणे यांना कोर्टात उपस्थित रहावे लागणार आहे.
14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथुन ड्रग्ससह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते या प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग असुन 19 आरोपी अटक आहेत तर 18 आरोपी अजूनही फरार आहेत.
सातवाहन आणि काकटक या दोन हजार वर्षापूर्वीच्या काळात आजच्या यवतमाळच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे निरगुडा असे होते
त्यांच्या पाऊलखुणा ही अस्तित्वात असल्याचा दावा अभ्यासात प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे.
याच गावाच्या नावावरून वणीतून वाहणाऱ्या नदीला निर्गुडा हे नाव पडले
पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन या गावाचे नाव वणी पडले अशी माहिती प्राध्यापक चोपणे यांनी दिली
2025 मध्ये वणीचा इतिहास लिहिण्यासाठी चोपणे यांनी तालुक्याचे अभ्यासकार्य हाती घेतल्यानंतर निरगुडा हे गाव वणी शहराजवळ दक्षिणेला होते त्याचे काही पुरावे हाती लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळपास 70 कोटी रुपयांची कामे सिमेंट रस्ते सुरू आहे
या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणूक करून कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
महसूल येथे पालकमंत्र्यांनी यवतमाळ शहरात सुरू असलेली विकास कामे रस्ते व जिल्ह्यातील सिंचन सुविधाचा आढावा घेतला
त्यावेळी ते बैठकीत बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी विकास मिना, सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता यादी उपस्थित होते.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारातील तब्बल पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव पावसाने ओव्हर फ्लो होऊन फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेतजमीन व पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झालय. तलावाचा भरावाचा मलबा शेतात गेल्याने उसाच्या उभ्या पिकात पाच ते सहा फुटांचा थर साचला आहे.त्याखाली पिक गाडलं गेलं असून शेतकऱ्यांची विहीर बुजली आहे,पाईपलाईन वाहून गेली.पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगडगोटे पाहायला मिळत आहेत.
एकही रुपया न भरता पुर्णत: मोफत उपचार सुविधा असलेले रुग्णालय रत्नागिरीत आजपासून सुरु होतय.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालय सुरू होतय.
गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी याउद्देशाने आम्ही मोफत रूग्णालय सुरू करण्यात आलय.
या मोफत रूग्णालयात शस्त्रक्रिया, ह्रदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा, बालरोग विभाग, युरॉलॉजी विभाग, नेत्ररोग सुरू करण्यात येणार आहेत.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने महाराष्ट्रात सुरू केलेले तिसरे मोफत रूग्णालय आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात धुळ्यात ठाकरे सेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या या संदर्भातील विचार जाणून घेतले आहेत,
उत्तर महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठीच मी आलो असल्याचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले आहे, यावेळी खासदार संजय राऊत यांनी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे कानमंत्र देखील दिले आहेत, यावेळी या मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असल्याचे बघावस मिळाले आहे.
दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या ट्रेनला सुरू होऊन आज ९६ वर्ष पूर्ण होतायत.
पुणे, मुंबई या २ मेट्रो शहराला जोडणारी भावनिक दुवा असलेली ही ट्रेन अनेक पिढ्यांच्या आठवणींची साक्षीदार आहे.
रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित व लोकप्रिय ट्रेन पैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सेलिब्रेशन जोरदार केले गेले.
पुणे रेल्वे स्टेशन वर आज केक कापून उत्साहात डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले होते.
१ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.