साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजाराहून अधिक भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईच्या दिशेने पाठवल्या आझाद मैदानावरील मराठा बांधवांची जेवणाची होते गैरसोय गावकऱ्यांकडून दक्षता प्रत्येक गावात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी...
मला आमदार खासदार करू नका मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष करा अशी केली विनंती...
भाषण संपल्यानंतर पुन्हा माईक हातात घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मागणी..
या मागणी नंतर सभागृहात एकच हशा...
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार ,प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे,माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित
श्रीरामपूर शहरात एका चहाच्या दुकानासमोर दोन गँगमधील सदस्य समोरासमोर आले होते.. हुजेफा शेख नामक आरोपीने दुसऱ्या गटातील संघर्ष दिघे याच्यावर बंदूक ताणली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.. दिघे यांच्या साथीदारांनी हुजेफा शेख याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो शहरातील गल्ल्यांमधून पळू लागला.. दिघे याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता पाठलाग करणाऱ्या एका तरुणाच्या हातात देखील बंदूक असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय.. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.. संघर्ष दिघे याने हुजेफा शेख याच्या विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.. पोलिस घटनेचा सखोल तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.. भर दिवसा तरुण एकमेकांवर बंदुका ताणत असल्याने श्रीरामपूर शहरात टोळीयुद्धाची भिती निर्माण झाली असून पोलिसांना वेळीच पाऊले उचलावी लागणार आहेत..
नाशिकच्या लासलगाव शहरात यंदा भाईचाऱ्याचं अनोखं उदाहरण पाहायला मिळतंय. ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन या दोन महत्त्वाच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत एक वेगळा निर्णय घेतला आहे. यंदा ईद-ए-मिलाद ५ सप्टेंबरला आणि गणेश विसर्जन ६ सप्टेंबरला आहे. शहरातील सामाजिक शांतता अबाधित राहावी, दोन्ही समाजातील भाईचारा टिकून राहावा यासाठी मुस्लिम पंच कमिटीने निर्णय घेतला आहे की ईद-ए-मिलादचा जुलूस हा गणेश विसर्जनानंतर म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल. याचबरोबर पैगंबर जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी हरित सेनेच्या सहकार्यातून वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत
* कोणाच्याही आरक्षणावर गदा न आणता आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही..
* मात्र जरांगे पाटील ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.. परंतु धनाढ्य जातीचा समावेश ओबीसीमध्ये झाला तर खरे मागासलेले ओबीसी त्यांच्यावर अन्याय होणार..
* मराठा समजाला आरक्षण द्यावे मात्र दुसऱ्याच्या कोट्यातून देण्यात येऊ नये...
* सुप्रीम कोर्टाने 50 टक्क्याची मर्यादा घालून दिली त्यामुळे लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही..
* माझं या आंदोलनाला समर्थन तर काँग्रेसची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आहे मात्र दुसऱ्याच हक्क मारून देऊ नये...
नांदेड जिल्ह्यात पावसाने दानादान उडवली आहे. कालपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या नद्यांना अजूनही पूर कायम आहे. या पुरात काही नागरिक देखील अडकल्याची माहिती समोर येत आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील अटकळी येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य करून रेस्क्यू केल आहे.एस डी आर एफ, आर्मी आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने अद्यापही बचाव कार्य सुरू आहे.
मुंबई ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतुक
कोंडी ठाण्यातून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या एन्ट्री पॅाईट वर मोठा पोलिस बंदोबस्त
आंदोलन कर्त्यांना पोलिसा कडून आव्हान करण्यात येत आहे की गाड्या इथेच लावा आणि पुढचा प्रवास ट्रेन ने करावा…
सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा
अवजड वाहनांना बंदी
मुंबईच्या दिशेने होते वाहतूक कोंडी
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहे...
13 पैकी 9 दरवाजे उघडले..वर्धा नदीत सोडला पाण्याचा विसर्ग....
यवतमाळ,अमरावती, वर्धा,चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकाना सतर्कतेचा इशारा...
सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के इतका जलसाठा...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी मुंबईतून पुण्यामार्गे दरे येथे जाणार
दुपारी २.३० वाजता पुणे विमानतळावर येऊन साताऱ्याकडे होणार रवाना
संध्याकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे दरे गावात पोहचणार
* रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी पवार नगर मध्ये दाखल....
* कार्यक्रमास शरद पवार, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती
* थोड्या वेळात शरद पवारांचं होणार भाषण..
* भाषणात मराठा आरक्षणाबाबत पवार काही बोलणार का याकडे लक्ष...
पुणे विमान तळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले स्वागत
जे पी नड्डा आज पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाना भेटी देणार
केंद्रीय मंत्री मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या गणपतींचे घेणार दर्शन
काल सायंकाळी खामगाव व परिसरात दीड तास मुसळधार पावसाने कहर केला. खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात नगर परिषदेने अनेक महिन्यांपासून नाली खोदून ठेवली आहे. मात्र त्याचं काम अपूर्ण सोडून ठेकेदार फरार झाला. यामुळे मात्र पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरलं, काही दुकानांमध्ये तर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने व्यावसायिकांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं. यावेळी तात्काळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांनी पंप सेट बोलवून हे पाणी उपसून देण्यास मदत केली व व्यवसायिकांना धीर दिला. मात्र नगरपरिषद प्रशासनाचा कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी न पोहोचल्याने व्यवसायिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.
रोजच्या आहारात वापरला जाणारा टोमॅटो काही दिवसापूर्वी पन्नास रुपये किलोने विक्री होत होता यामुळे सामान्य कुटुंबियांच्या किचन मध्ये टोमॅटोचा वापर काही प्रमाणात घटले होते मात्र नंदुरबार बाजार समिती टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटो किरकोळ बाजारात दहा रुपये किलोने विक्री होत आहे.या दरघसरणीचा सर्वाधिक फटका नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो वर केलेला खर्च आणि वाहतुकीच्या खर्च देखील निघणं आता कठीण होत आहे.
आज मनसेच्या ठाणेमधल्या पदअधिकांराचा मेळावा होणार आहे
या वेळी अविनाश जाधव , अभिजीत पानसे , राजू पाटील ही उपस्तिथी असणार आहेत
या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार आहे …
आज मनसे अध्यक्ष आपल्या कार्यक्रत्यांना काय सांगतात या कडे सगळ्याचं लक्ष आहे ..
12 वाजता दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणेला पोहचतील ..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा आहे आता पदाधिकारी येण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील सीकेपी हॉल या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यावतीने साखळी उपोषणाला सुरवात....
संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महाससंघाचे पदाधिकारी पोहचले आंदोलन स्थळी,
भाजपचे आमदार आशिष देशमुख सुद्धा आंदोलनात सहभागी...
बबनराव तायवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांचा आंदोलनात सहभाग....
फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहवरबाणीच केल असच म्हणावं
मोठ्या संख्येने आंदोलक येत आहेत पण ते कोणाला त्रास देत नाहीयेत
फडणवीस म्हणतात आंदोलनावर कोणी पोळी भाजू नये पण कोण भाजतंय
आपली राजकीय इच्छा शक्ती असती तर एक दिवसात आरक्षण देऊ शकला असतात
आपली राजकीय ईच्छा शक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे, आपण राजकीय ईच्छा शक्तीचे महामेरू आहे
दोन समाजात आग लावण्याच आणो तेढ निर्माण करण्याच काम आपण करत आहात, आपण सत्तेत आहात
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत. अमित शहा हे काल रात्री मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळीच एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथील गृहावर गेले होते.
मालेगावची गिरणा नदी सध्या पाऊस चांगला झाल्याने दुथडी भरून वाहते आहे..मात्र या पूर पाण्यात नदीवर असलेल्या पुलाच्या भिंतीवरून काही टवाळखोर तरुण पाण्यात उड्या घेऊन जीवघेणी स्टंटबाजी करीत आहे.. स्टंटबाजी करणारे बहुतांश मुले ही अल्पवयीन आहेत विशेष म्हणजे ही मुले केवळ भिंतीवरून पाण्यात उड्याचं मारत नाही तर पाणी अडविण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखण्डी प्लेट आणि भिंतीत असलेल्या गॅप मधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत देखील करतात..अशीच स्टंटबाजी करताना मागील वर्षी एका तरुणाचा मृत्यू देखील झालेला होता..
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची तेरावी सुनावणी बीडचा विशेष मको का न्यायालयामध्ये आज होत आहे. या सुनावणी मध्ये आरोपी वाल्मीक कराडच्या जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर वाल्मीक कराडचे प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी असा अर्ज करण्यात आला होता या संदर्भातही निर्णय आज देण्याची शक्यता आहे म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या दोन्ही महत्वाच्या विषयांवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील गेल्या आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाला या दमदार पावसामुळे बीड जिल्ह्यातील छोटे मोठे धरण झाले आहेत सिंदफणा नदीला पूर आल्यामुळे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणातील पाच हजार नऊशेखने विसर्ग सुरू करण्यात आला असून धरणालच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माजलगावच्या धरणामध्ये धरणामध्ये पंचवीस हजार क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरत असून. बीड शहरासह माजलगाव शहराची पिण्याची पाण्याची चिंता मिटली असून शेतीपाण्याची ही चिंता मिटली आहे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे ते पाणी आता पुढे सिंदफणा नदी पत्रास सोडण्यात आले आहे.
शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय.. बाप्पाची मूर्ती ही पूर्णतः शाडू मातीची आहे, तसेच जी आरास करण्यात आली आहे ती देखील पर्यावरण पूरक आहे.. आरासमध्ये कुठेही प्लस्टिकचा वापर नाही, विविध जातींची, विविध रंगांची फुलं, गवती फुलं, पानं यांचा वापर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जातेय. तसेच या ठिकाणी सहाशेहुन अधिक मंडळं येऊन भजन, जाखडी, टिपरी नृत्य सादर करतात. या सर्व मंडळांना ढोलकी, मृदुंग दिली जाते, कोकणची लोककला टिकावी यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येते..
ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात शहरातील नागरिकांनी आवाज उठवला आहे. यासाठी सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. पोलिसांकडूनही 9 मध्यवर्ती मंडळांना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. या अहवानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शहरात 'श्री' आगमनावेळी ध्वनिप्रदूषण कमी होते. आता विसर्जन मिरवणुकीतही 95 टक्के मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजणार असल्याचे सांगितल्याने सांगता मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न उद्भवणार नाही, असा विश्वास पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला.वर्षभरातील सर्वच जयंती आणि इतर उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वांसाठी समान निर्णय असणार आहे. मागच्या वर्षी श्रींच्या सांगता मिरवणुकीत 192 मंडळांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. यावर्षी जवळपास 200 मंडळांचा सहभाग असणार आहे.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे मुंबई येथे आज रात्री आगमन झाले. विमानतळ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृह मंत्री शाह हे 29 आणि 30 ऑगस्ट 2025 या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते लालबागच्या राजा आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन गणेशाचे दर्शन घेणार आहेत.
आजपासून राज्यातील 95 टक्के भागांतून पाऊस थांबणार
फक्त पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातील घाटमाथा आणि पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार
पुणे हवामान खात्याचा अंदाज
राज्यात 15 ऑगस्टपासून पाऊस सुरू आहे
हलका ते मध्यम आणि मुसळधार अशा स्वरूपाचा हा पाऊस होता
काल रात्रीपासून पुण्यात पावसाची विश्रांती
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर ओबीसी आक्रमक
लक्ष्मण हाके, एडवोकेट मंगेश ससाने त्याचबरोबर राज्यातील सर्व ओबीसी कार्यकर्ते बैठकीला येणार
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरागे उपोषणाला बसले आहेत तर मराठा ओबीसीत घेण्यास ओबीसींचा विरोध आहे
सरकार मनोज जरांगे यांची झुंडशाही पुढे झुकत असल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे
झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर द्यावं लागेल अशा प्रतिक्रिया ओबीसी बांधवांनी दिल्या आहेत यासाठी आंदोलनाची दिशा आज या बैठकीत ठरणार आहे
दुपारी पुण्यातील पत्रकार भवन च्या सभागृहामध्ये ओबीसींची बैठक सुरू होणार
तुळजाभवानी पुजारी मंडळाची मुदत संपुन सहा वर्षे लोटले आहेत त्यामुळे मंडळाची कार्यकारिणी बरखास्त करुन नव्याने निवडणुका घेण्याची मागणी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलीय.पुजारी मंडळाच्या कार्यकारिणीवर भट्राचाराचे आरोप करत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असुन धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात तुळजाभवानी पुजारी मंडळ हे नोंदणीकृत न्या असल्याचे तसेच विश्वस्त मंडळ संस्थेचा हिताविरुद्ध व उद्देशाविरूध्द लागुन संस्थेचे नुकसान करत आहे त्यामुळे गंगणे यांनी धर्मादायकडे ही मागणी केलीय गंगणे यांच्या तक्रारीमुळे आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वीच पुजारी मंडळाचा निवडणुक आखाडा रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा तालुक्यातील तीस गावांमधील 57 घरांची पडझड झाली. यामुळे अनेक जण उघड्यावर पडले असून अजूनही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.महागांव तालुक्यात चार बकऱ्या,पाच जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन मृत्यूमुखी पडल्या यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालाय.
मरावती जिल्ह्यातील हिंगणी गावंडगाव येथे झालेल्या ढगफुटीमुळे शेतकरी व शेतमजुरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक गावामध्ये पाणी साचल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले तर तूर, कपाशी, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक घरांना देखील या पावसाचा फटका बसल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने गावकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्तांची दखल घेऊन पंचनामे करावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी बुलढाणा परिवहन कार्यालय चर्चेत आलं होतं ते एका महिला परिवहन अधिकाऱ्याने केलेले अर्वाच्य शिवीगाळ बद्दल त्यावेळी महिला परिवहन अधिकाऱ्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता काल पुन्हा त्याच महिला परिवहन अधिकाऱ्याने एका आरटीओ एजंटला मारहाण करत पुन्हा चांगली शिवीगाळ केली व हाही व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने राज्यभरात बुलढाणा परिवहन विभागाचे वाभाडे निघत आहे याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरटीओ एजंट च्या तक्रारीवरून महिला परिवहन अधिकारी राजश्री चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर राजश्री चौधरी यांनी सुद्धा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरटीओ एजंट वर गुन्हा दाखल केला आहे. परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी येणारा जिल्हाभरातून नागरिकांना व आरटीओ एजंट ला या महिला परिवहन अधिकारी वारंवार शिवीगाळ व धमकावत असल्याचा तक्रारीही अनेकदा वरिष्ठांना प्राप्त झाल्या आहेत. मात्र या महिला परिवहन अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.