पोलिसांच्या संपर्कात 7 ते 8 महिला असल्याची माहिती
या महिलांचे प्रांजल खेवलकरने संबंध ठेवताना, सहमती नसताना, चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलेय.
त्याचं बरोबर अक्षेपार्य व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळून आलेत
आक्षेपार्य व्हिडिओ फोटोज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी 7 ते 8 महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती
सदर महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती
बारामती नगरपरिषद हद्दीतील रुई येथील तानाईनगर येथील अनधिकृत इमारत बांधकाम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भुसे यांच्या आदेशानुसार पाडण्यास सुरुवात झाली आहे . सदरची इमारत ही बेकायदेशीर असल्याचे मत नगरपालिकेचे असल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जातय..
आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत, जिल्ह्यातील जवळपास सातशे कर्मचारी अधिकारी संपर्क केल्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रभावी झाली आहे, मात्र अजूनही यांच्या मागण्या संदर्भात तोडगा निघाला नसल्याने आज जिल्ह्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले आहे.. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून बहुतांशी कर्मचारी हे आरोग्य विभागात सेवा देत आहेत, मात्र अजूनही त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आलेले नाही.. याच मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे.. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आल्याच पाहायला मिळत आहे...
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये खास महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी दहीहंडी च आयोजन करण्यात आलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. पूर्वी एक दिवस चालणारा दहीहंडी उत्सव आता हळूहळू आठवडाभर महाराष्ट्रभर साजरा करत असल्याचा चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.
राज्यातील सर्वात महत्ववाचा उत्सव म्हणजे गणेश उत्सव... हा उत्सव संपूर्ण राज्यात धुमधडक्यात साजरा करण्यात येतो, त्यातही गणेश उत्सव कोकणात सर्वात मोठा उत्सव मानल्या जातो , हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य भरातून लाखो भाविक जात असतात.. भाविकांना दलावं वळणाची सुविधा व्हावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 73 बसेस कोकणात रवांना झाल्या आहेत.. मात्र जिल्ह्यातील एसटी फेऱ्या वर कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती विभगीय नियंत्रक अधिकारी शुभांगी शिरसाठ यांनी दिली आहे..
बुलढाणा जिल्ह्याच्या किन्ही सवडत येथील शेतकरी प्रकाश धुरंदर हे 65 वर्षीय शेतकरी तलावात आपली शेती गेल्याने त्याचा मोबदला मिळावा ,म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यालयात मागील पाच वर्षांपासून चकरा मारत आहेत .. त्यांना त्यांच्या शेतीच मोबदला अद्याप मिळाला नाही .. मात्र, कार्यालयात अर्ज करण्यासाठी आणि चकरा मारण्यासाठी त्यांचे 50 हजार रुपयांचे वर पैसे खर्च झाले .. शेतकरी प्रकाश धुरंदर यांची वैरागड शिवारात शेती असून त्याठिकाणी तलावाचे काम सुरू आहे . या तलावाचे बाधित क्षेत्रात त्यांची 22 गुंठे शेती गेली आहे , विहीर गेली, सिताफळ ची झाडे गेलीय .. मात्र जलसंधारण चे अधिकारी त्यांना कधीं 8 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात तर कधी 12 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात.. तर शेतकरी धुरंदर आपल्या संपूर्ण शेतीचे पैसे द्यावे, अशी मागणी वेळोवेळी करत आले असून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळत आहेत.. शिवाय जलसंधारण अधिकारी कार्यालयात कधीच राहत नसल्याचे ही शेतकरी धुरंदर सांगताय . आता न्याय कोणाला मागायचा असाही प्रश्न त्यांनी केला असून शेतीच मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली ..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोडवरील ताहेरपूर येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय,रामदास बाजीराव वाघ असे मयताचे नाव आहे.पाटेगाव येथील रामदास बाजीराव वाघ हे डोंबाऱ्याचा खेळ व फूल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. काही कामानिमित्त दुचाकीने पैठणच्या दिशेने जात असताना ताहेरपूर येथे त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन बिडकीन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांस तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद बिडकीन पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
- अभिषेक लखनसिंग लोधी आणि आयुष अरविंद शर्मा अशी अटकेतील आरोपींचे नाव आहेय..
- जबलपूर मार्गावरून येत असलेल्या मोटरसायकला बसस्टँड चौकात थांबवले... त्यावेळी चालकाने चकमा देण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलं...
- तपासणीत बॅगेत 20 किलो गांजा (किंमत अंदाजे 5 लाख) आढळून आला. मध्यप्रदेशातून छत्तीसगडला विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली..
- दोघांना मोटरसायकल आणि मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास कामठी पोलीस करत आहे.
प्रमोद पाडसवान यांच्या हत्येत सोमवारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आणि कुटुंबाच्या जबाबानंतर सहा आरोपीं व्यतिरिक्त याप्रकरणात तीन आरोपी वाढवण्यात आले. यात मंडळाचा अध्यक्ष अरुण गव्हाड, मंगेश वाघ व हल्लेखोर निमोनेची बहीण जयश्री यांना आरोपी करण्यात आले. यापैकी अरुण व मंगेशला ताब्यात घेण्यात आले. तर आपल्याला आरोपी करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच जयश्री पसार झाली. तिघांवर हत्ये दरम्यान हल्लेखोरांना मारण्यापासून थांबवण्या ऐवजी मृत व जखमींना पकडून ठेवत हत्येसाठी अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील दोन महामार्गां बाबत रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपन्यांना इशारा दिला आहे अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा-कोल्हापूर आणि कराड-चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यामध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गाचे काम 26 मार्च 2026 पर्यंत तर कराड- चिपळूण मार्ग येत्या डिसेंबर 2025 पर्यंत दिलेल्या अवधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाविषयीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 दिवसाला बारचार्ट सादर करावा. अन्यथा दिलेल्या अवधित काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासनाचा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारवाई करणार प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणार असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचा प्रकरण चांगलंच तापले.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि तुळजापूरचे पराभूत उमेदवार यांनीही भाजपवर निशाणा साधलाय.तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरच आपला बोगस मतनोंदणी प्रकरणात संशय असल्याचं धीरज पाटील म्हणाले.विधानसभा निवडणुकीपूर्वी तुळजापूर मतदार संघात 6000 बोगस नोंदणीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आलं होतं. बोगस मतदार नोंदणी प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल असून नऊ महिने झाले तपास झाला नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याची धीरज पाटील यांनी सांगितलं दरम्यान ज्यांच्यावर आरोप होतायत त्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हायला हवी आणि तपास यंत्रणा त्या करतील असं मत व्यक्त केले.
बीडच्या गेवराई मध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून चपला फिरकवण्यात आल्या होत्या तर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते आणि यानंतर पोलिसांनी सुमोटो नुसार 14 आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही सहभाग आहे.
आपला गणपती आपण बनवूया" या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत धाराशिवच्या कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील ३०० मुलांनी स्वतःच्या हातांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या. मुलांचा प्रचंड उत्साह,निरागसता आणि पर्यावरण रक्षणाची लागलेली गोडी पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केलय.आपल्या लहानग्या हातांनी मातीचा गोळा घेऊन त्याला बाप्पाचा आकार देताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.मूर्ती कशी बनवावी,सोंड कशी लावावी, डोळे कसे काढावेत अशा असंख्य प्रश्नांनी मुलांनी प्रशिक्षकांना भंडावून सोडले. मुलांचा गोंधळ, मूर्ती पूर्ण करण्याचा त्यांचा अट्टाहास आणि शिकण्याची उत्सुकता पाहून प्रशिक्षकही काही काळ स्तब्ध झाले मात्र, त्यांनी अत्यंत संयमाने आणि शांतपणे प्रत्येक मुलाला मार्गदर्शन करत त्यांच्याकडून सुबक गणेशमूर्ती तयार करून घेतल्या.
- पाळीव कुत्र्यास बाहेर नेताना तोंडाला जाळी लावणे बंधनकारक, गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता आवश्यक,
- कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यास बंदी, फक्त मनपा घोषित ठिकाणीच परवानगी,
- पाळीव कुत्र्यांना नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर बसवल्यास लोकांना त्रास झाल्यास कारवाई होणार...
- पाळीव कुत्रा जाळीशिवाय आढळल्यास कुत्रा मोकाट समजून मालकावर कारवाई होणार,
- उपद्रव झाल्यास नागरिकांनी 112 वर संपर्क साधावा प्राणिप्रेमींनी अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
- अनेक मालक नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कुत्र्यांना आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये फिरवतात हे पाळीव श्वान इतरांना चावा घेतात. यावर कारवाई होणार.
- अनेकदा कुत्र्यांना अनधिकृतपणे खाऊ घालणारे लोक किंवा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला प्राणिप्रेमींकडून विरोध केल्यास कठोर कारवाई होणार..
- सायबर पोलीस, ड्रोन, CCTV च्या माध्यमातून पोलिसांचे असणार गणेशोत्सवावर लक्ष
- गुप्तचर यंत्रणा, एटीएस, बिडीडीएस विभागाची गर्दीवर असणार बारीक नजर
- नागपूर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे चौदाशे गणेश मंडळांना दिली आहे परवानगी...
- गणेश मंडळांना पोलीस विभागाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे करावे लागणार पालन...
- डीजेचे नियम मोडले तर होणार थेट जप्तीची कारवाई होणार...
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत तब्बल ७६ हजार दुबार नावे असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ऐरोली मतदारसंघात ४१,५५६ तर बेलापुरात ३५ हजारांच्या आसपास दुबार नावे आढळली आहेत. एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या मतदारसंघात असून मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा नियोजित घोळ असल्याचा आरोप करून सर्व दुबार नावे वगळावीत, अशी लेखी मागणी जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी, ठाणे यांच्याकडे केली.
लक्ष्मण हाके यांनी गेवराई मध्ये येऊन दंड थोपटले त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांकडून दंडके दाखवण्यात आले यानंतर आम्हीही गप्प बसणार का पोलिसांनी बागेची भूमिका घेतली आम्ही आमदार विजयसिंह पंडित यांच्या सोबत आहोत गेवराई मधील धनगर समाज देखील विजयसिंह पंडित यांच्या सोबत आहे लक्ष्मण हाके यांना ओपन चॅलेंज आहे की मी एक वंजारा म्हणून सांगतो की मी विजयसिंह पंडित यांच्या सोबत असून तुम्ही उद्या गेवराई मध्ये या तुम्हाला मी दाखवतो तुम्ही विदेशी पंडित यांना काय दांडक्याची भाषा करता असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे
गणेशोत्सवात सर्वाधिक कोकणवासीय कोकणाकडे जाताना पाहायला मिळतात मात्र कोकणवासी यांना हाच कोकणाचा प्रवास अनेक अडचणींचा सामना करत करावा लागत आहे ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असून मिळेल त्या जागेवर कोकणवासीय बसून आपला प्रवास करत आहेत एकंदरीतच मोठ्या प्रमाणात हाल कोकणवासियांचे प्रवासादरम्यान होताना पाहायला मिळत आहेत
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यंदा आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी मंडळांनी सामाजिक बांधिलकी परंपरा जोपासत पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी. असे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचे मूल्यांकन करून विविध प्रकारचे बक्षीस दिले जाणार आहेत जास्तीत जास्त मंडळांनी स्पर्धेत सहभागी नोंदवावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली. त्याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस कडून ओबीसी समाजासाठी काढलेल्या मंडल यात्रेतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी मांडली. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर मनोज जरांगेनी दिल्ली गाटावी आणि मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत चर्चा करून कायदा करावा असा सल्ला दिला. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी पूर्ण करायला राज्याचे मुख्यमंत्री अपुरे पडतायत असं राज राजापूरकर म्हणाले.मंडल यात्रा धाराशिव इथ आली असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली .
माथेरानच्या घाट रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जोरदार पावसादरम्यान पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पाण्याच्या वाहताळीमुळे रस्ता खड्डेमय झाला आहे. पडलेले खड्डे आणि रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे अपघाताची भिती वाढली आहे. नेरळ ते माथेरान दरम्यान सात किलो मिटरचा हा घाट रस्ता असून बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती करीत नसल्याचा आरोप टॅक्सी संघटनेकडून केला जात आहे. पदरमोड करीत टॅक्सी संघटना रस्त्याची तात्पुरती डागडुजी करीत असून माथेरानचे पर्यटनात्मक महत्व लक्षात घेऊन शासनाने याकडे लक्ष द्याव अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.